विवाहानंतरचे आर्थिक नियोजन कसे करावे

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

विवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे 20 ते 35 या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो.

जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास सारखे असेल तरी तरी एक व्यक्ती म्हणून चुकून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तरी विवाहामुळे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन अधिक जागरूक राहणे जरुरीचे आहे.

या दृष्टीने या घटनेकडे पाहून सहज सुचलेल्या काही गोष्टी :

राखीव निधी : आपल्या मासिक खर्चाच्या 6 पट एवढी रक्कम कधीही आकस्मिकरित्या काढता येईल. अशा पर्यायांमध्ये असावी. याचा उपयोग अचानक आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी होऊ शकतो.

मुदतीचा विमा: आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 20 पट मुदतीचा विमा असणे गरजेचे आहे. यामुळे कमावत्या व्यक्तीच्या आकस्मिक मृत्यूमुळे निर्माण होणारी आर्थिक पोकळी भरण्यास मदत होते.

योग्य रकमेचा आणि दीर्घ मुदतीचा विमा लवकर घेतला तर तो अतिशय कमी हप्ता भरून मिळू शकतो. जर जोडीदार नोकरी व्यवसाय करीत नसेल तर त्याच्या श्रमाचे मूल्य आहे.

ते उणीव भासेल तेव्हाच जाणवते. तेव्हा जोडीदाराचाही योग्य रकमेचा मुदतीचा विमा काढणे जरुरीचे आहे. व्यक्ती येऊ शकत नाही परंतू आर्थिक भार कमी झाल्याने त्याची कमतरता काही प्रमाणात भरून येऊ शकते.

विमा पॉलिसीचा हप्ता किती आहे यापेक्षा आपल्याला किती रकमेचे विमा संरक्षण मिळते ते महत्वाचे.

आरोग्यविमा : वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे गंभीर आजारामुळे एखाद्या कुटूंबाची आर्थिक घडी पुर्णतः विस्कटू शकते त्यामुळे जर आपल्याला आपल्या मालकाकडून आरोग्यविमाछत्र नसेल तर कुटूंबाचा आरोग्य विमा काढणे गरजेचे आहे हे विमाछत्र आपल्या वार्षिक उत्पन्नच्या 2 ते 3 पट असणे गरजेचे आहे.

आधुनिक गुंतवणूक साधनांची माहिती : परंपरागत गुंतवणूक साधने ही खरीखुरी गुंतवणूक नसून त्या निव्वळ बचत योजना आहेत. यात गुंतवणूक सुरक्षित राहात असली तरी वाढत्या महागाईमुळे त्याचे मूल्य कमी होत असल्याने त्यातून मिळणारा उतारा हा अत्यल्प असतो या उलट आधुनिक गुंतवणूक साधनातील गुंतवणुकीत जोखीम असली तरी त्यातून महागाईवर मात करणारा परतावा मिळत असल्याने अशा साधनांची ओळख करून घेऊन आपल्या क्षमतेप्रमाणे त्यात जास्तीतजास्त गुंतवणूक करावी.

यामुळे आपल्या भविष्यातील गरजांची पूर्तता लवकर करता येईल. दीर्घकालीन योजनांसाठी म्युच्युअल फंडाच्या एस आय पी चा पर्याय निवडावा. आपल्या गरजेनुसार अपघात विमा, मौल्यवान वस्तूचा विमा, गंभीर आजाराचा विमा उतरवून घ्यावा.

याशिवाय काही गोष्टींवर विचार करून यातून एकमेकांच्या सहमतीने योग्य तो निर्णय घ्यावा.

1) आजकाल व्यक्ती एक आणि खाती अनेक अशी परिस्थिती झाली आहे. यामध्ये अनावश्यक रक्कम गुंतून राहात असल्याने अनावश्यक खाती त्वरित बंद करावीत.

2) जी खाती चालू ठेवायची आहेत ती संयुक्त करून घ्यावी आणि दोघांनाही स्वतंत्रपणे वापरता येतील असा पर्याय स्वीकारावा.

3) क्रेडिट कार्डाचा सुयोग्य वापर करावा कार्ड आहे म्हणून खरेदी केलीच पाहिजे असे नाही. यावर व्याज द्यावे लागल्यास त्याचा दर सर्वाधिक असतो.

4) सर्व प्रकारच्या गुंतवणुकीची अद्ययावत नोंद ठेवावी आणि आवश्यकता असल्यास वारस नोंद बदलावी.

7) नवीन गुंतवणूक एकमेकांना सांगून करावी तिची माहिती जपून ठेवावी. शक्य असल्यास दोघांच्या नावावर ,शक्य नसेल तर एकाच्या नावावर गुंतवणूक आणि जोडीदार वारस अशीच व्यवस्था ठेवावी.

8) घरगुती खर्चाचा वेळोवेळी आढावा घ्यावा आणि अनावश्यक खर्च कमी करावा. जो याचे नीट व्यवस्थापन करू शकतो त्याने शक्यतो गुंतवणुकीचे निर्णय घ्यावेत आणि ते पारदर्शी असावेत.

9) गुंतवणुकीचा विचार करताना सध्याच्या कररचनेचा विचार करावा. कर वाचवणे आणि अधिक परतावा मिळवणे यासाठी इ एल एस एस चा पर्याय निवडावा.

10) मालकाकडून जोडीदारास काही सुविधा मिळत असतील तर त्याची माहिती द्यावी. आवश्यक ते बदल करण्यास विनंती अर्ज द्यावेत.

11) कोणतीही गोष्ट घेण्याची घाई न करता त्याच्या परिणामांचा अंदाज घ्यावा, आपले उत्पन्न वैध मार्गाने वाढत कसे राहील याचा विचार करावा.

12) एखाद्या गुंतवणुकीतून तोटा होत असेल तर वेळीच त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा. चुकीचे कारण शोधावे. एकमेकांवर दोषारोप न करता भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची पुरेशी काळजी घ्यावी.

लग्नानंतरची सुरुवातीची काही वर्षे ही गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्वाची असून याच काळात जबाबदाऱ्या कमी असल्याने सर्वाधिक गुंतवणूक होऊ शकते. त्याचा उपयोग भविष्यात मुलांचे शिक्षण आणि निवृत्तीनंतर सुखमय आयुष्य घालवण्यासाठी होतो. तेव्हा सुरुवातीपासून त्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे.

महिलांसाठी आर्थिक नियोजनाच्या ५ सोप्या स्टेप्स

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करण्याची ११ महत्त्वाची कारणे

आर्थिक नियोजनाबद्दलची मराठी पुस्तके

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!