या लेखात वाचा काय आहे जगप्रसिद्ध दि सिक्रेट मूव्हीचा सारांश

दि सिक्रेट

लेखिका ‘ह्रोंडा बार्ने’ (Rhonda Byrne ) यांचं “The secret” दि सिक्रेट हे पुस्तक मी निदान तीन वेळा वाचलंय. मी सप्टेंबर २०१६ मध्ये हे पुस्तक खरेदी केलं होत. त्या आधी माझ्या एका मित्राकडून मला त्या मुव्हीबद्दल माहीती कळाली आणि ती मुव्हीही बऱ्याचदा पाहीली.

खूपच छान आहे त्यातल्या संकल्पना!

या पुस्तकामध्ये / मूव्ही मध्ये positive thinking (सकारात्मक विचार) करण्यावर खूप भर दिलाय. आणि खरोखर संपूर्ण जीवन बदलू शकतील असे ते विचार आपण आचरणात आणले तर. बरीच पुस्तके आहेत उपलब्ध जी positive thinking, जीवनशैली बद्दल माहिती देतात पण शेवटी वाचलेलं आचरणात आणलं तरच खरा फरक पडतो. तर या मूव्ही मधले काही मुद्दे मी सारांश स्वरुपात नोट करतो आहे.

काय आहे सिक्रेट (रहस्य )?

(Law of Attraction) आकर्षणाचा सिद्धांत हे रहस्य आहे. (Law of Attraction) आकर्षणाचा सिद्धांत हा देखील अगदी गुरुत्वाकर्षण सिद्धांताएवढा (Law of Gravity) खरा आहे आणि लागू होतो.

आकर्षणाचा सिद्धांत हा आपल्या सर्वांवर समान लागू होतो. अगदी सारांशात सांगायचं झालं तर आपण जे विचार करतो ते आपल्या जवळ आकर्षित होतात आणि आपल्या विचारांप्रमाणे आपले आयुष्य घडते.

सतत च्या विचारांशिवाय (चांगले अथवा वाईट) तुमच्या आयुष्यात कोणताही अनुभव येऊ शकत नाही. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अनुभवला अथवा गोष्टीला तुम्ही तुमच्या विचारांद्वारे आकर्षित केलेले असते.

तुमची सद्यस्थिती ही तुमच्या पूर्वीच्या (भूतकाळातील) विचारांचं फळ आहे. आपण जे विचार करतो तेच खरं होतं कारण नियती (सृष्टी) म्हणते “तुमची इच्छा पूर्ण करण माझं कर्तव्य आहे” मग विचार चांगले (positive) असो व वाईट (negative) नियती ते पूर्ण करते. जीवन विचारांनीच बनते.

इथे असं सांगितलंय कि तुम्हाला तोपर्यंत एक विश्व मिळू शकत नाही जोपर्यंत तुम्ही मनाने (कल्पनेने) त्यात दाखल होत नाहीत.

विचार हे चुंबक (magnet) सारखे असतात. प्रत्येक विचाराची एक frequency / तरंग असतो. आणि हे विचार सृष्टीकडे पाठवले जातात. आणि हे विचार समान तरंगांना आकर्षित करतात. आणि आपली कल्पना प्रत्यक्षात अवतरते.

सकारात्मक (Positive) विचार हे नकारात्मक (Negative) विचारापेक्षा जास्त शक्तिशाली आणि प्रभावशाली असतात. आणि प्रत्येक विचार सत्यात यायला वेळ लागतो.

तुमच्या जीवनातल्या सर्व गोष्टी या तुम्ही तुमच्या विचारांनी आकर्षित केलेल्या आहेत (उदा. पैसे, designation, नातेसंबध, मित्र मैत्रिणी, स्वास्थ्य इत्यादी)

आपल्या प्रत्येकात प्रचंड उर्जा आहे. आणि आपण सृष्टीचाच भाग आहोत. तुम्ही मनात ठरवलेलं सर्व काही प्राप्त करू शकता, (याचं उदाहरण म्हणजे आज आपण आकाशात अवकाश यान पाठवतो, electricity चा वापर करतो, या सर्व देखील पहिल्यांदा कल्पनेच्या स्वरुपातच होत्या).

मनात इच्छिलेले म्हणजे इच्छित संपत्ती, पैसे, पद, स्वास्थ्य, चांगले नातेसंबध इत्यादी आपण प्राप्त करू शकतो ते देखील तुम्ही कोण आहात, तुमची सद्यस्थिती काय आहे याचा विचार न करता. आता चालू करून देखील तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकता.

लेखिका सांगते, तुमच्या इच्छित ध्येयाला प्राप्त करण्यासाठी तीन बाबी महत्वाच्या आहेत.

प्राप्त करणे

 • जेंव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो तेंव्हा ती गोष्ट मिळवून देण्यासाठी सृष्टी देखील मदत करते. यासाठी मला ओम शांती ओम पिकचर मधला डायलॉग आठवतो आणि आवडतो तो असा कि “अगर किसी चीज को दिलसे चाहो तो पुरी कायनात, उसे तुम्हे मिलाने कि कोशिश में लग जाती है !”
 • कधी तरी आपल्याला अचानक पणे आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळते अथवा आपल्याला येणाऱ्या अडचणीतून मोकळा व्हायचा मार्ग सापडतो. आणि अंततः आपल्याला ती गोष्ट प्राप्त होतेच.
 • आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी योग्य वेळ शोधत राहू नका तर त्वरित कृती करा. कधीही मनात शंका बाळगू नका कि मी जे विचार करतेय/करतोय हे शक्य होईल का?
 • तुम्हाला मिळालेल्या सर्व गोष्टींसाठी देवाचे आभारी राहा. तुमच्याकडे काय नाहीये त्यापेक्षा काय आहे यावर लक्ष द्या आणि तुम्हाला तुमच्या कडे नसलेल्या गोष्टी पण मिळवता येतील.
 • तुमच्या आयुष्यातले चांगले प्रसंग लिहा. चांगल्या भावनांवर भर द्या. ते करा ज्याने तुम्हाला आनंदाचा अनुभव होतो. सतत आनंदी असणं फार महत्वाचं आहे.
 • चांगल्या भविष्याच्या कल्पना करा. तुम्हाला काय हवं आहे त्याची मनात प्रतिमा बनवा. तुम्ही vision बोर्ड बनवू शकता ज्यावर तुम्हाला काय हवंय त्याची चित्र लावू शकत. रोज दिवसाचा थोडा वेळ ह्यावर घालवल्यास ध्येय साध्य होण्यास मदत होईल.
 • तुम्हाला जे हवंय त्यावर फोकस करा जे तुम्हाला नकोय त्याचा अजिबात विचार करू नका (त्याबाबतीत तुम्हाला जे नकोय त्याच्या opposite विचार करा.)
 • आपले विचार निवडा. चांगल्या आणि सकारात्मक विचारावर भर द्या.
 • सदैव आनंदी आणि प्रसन्न राहा आणि बघा तुमचं जीवन बदलू लागेल.
 • सृष्टीत कोणत्याही गोष्टींची कमी नाही सर्वकाही अमाप उपलब्ध आहे. निसर्ग आपलं काम कोणत्याही कष्टाशिवाय सतत करत असतो. निसर्गाला गती आवडते म्हणून विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.
 • योग्य संधी मिळत असल्यास तिचा फायदा करून घ्या. कारण निसर्गाच्या (गतीबरोबर) प्रवाहा सोबत राहणे हेच आपलं काम आहे.

दीड तासाची ही मूव्ही नक्की पाहण्यासारखी आहे. यात सर्व रहस्य (स्वास्थ्याचं रहस्य, पैशाचं रहस्य, नातेसंबंधांच रहस्य, सृष्टीचं रहस्य, जीवनाचं रहस्य आणि एकूणच आपलं रहस्य) सांगितली आहेत.

सुंदर मांडणी, मुद्देसूद रचना, योग्य उदाहरणे असा हा पि्क्चर आहे. कमी वेळात जवळ पास सगळं सांगितलं आहे. ऑफकोर्स ह्याला आचरणात आणलं तरचं फरक पडेल.

पण तो फरक नक्की खूप मोठा असेल.

ही मूव्ही हिंदी अनुवादित असून ती online देखील पाहता येऊ शकते.

दि सिक्रेट (रहस्य) मराठी पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!