शेगाव संस्थानचे मॅनेजमेंट गुरु – शिवशंकर भाऊ पाटील

शेगाव संस्थान

श्री गजानन महाराज शेगाव संस्थानचे प्रमुख विश्वस्थ, मॅनेजमेंट गुरु शिवशंकर भाऊ पाटील यांचे आज वयाच्या ८२ व्या वर्षी दुख्खद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

२१ व्या शतकातील जगातील सगळ्यात आधुनिक देवस्थान असं ज्याच्याकडे बघितलं जाते, ज्या मंदिराच्या व्यवस्थापन कौशल्याची स्तुती भारतातील नव्हे तर अमेरिकेतील हार्वर्ड सारख्या विद्यापिठाने केलेली आहे. स्वच्छतेसाठी महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात आदर्श असणाऱ्या अश्या जागतिक कीर्तीच्या शेगाव संस्थानाची धुरा ज्यांनी समर्थपणे नुसती पेलली नाही तर “सेवा हीच साधना” हे संस्थेचे ब्रिदवाक्य आयुष्यात प्रत्येक क्षणाला जगलेले, संस्थेचे व्यवस्थापक शिवशंकर भाऊ पाटील ह्याचं पूर्ण आयुष्य आपल्या सर्वाना प्रेरणादायी आहे.

आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव संस्थानात आपली सेवा मंदिरात फरशी बसवण्यापासून सुरु करून त्याच संस्थेच्या व्यवस्थापक बनल्यानंतर भाऊंनी मागे वळून बघितलं नाही.

ज्यावेळी भाऊंनी संस्थेच्या कामाची सूत्रं घेतली तेव्हा संस्थेची उलाढाल अवघी ४५ लाख रुपयांची होती. आज शेगाव संस्थानाची वार्षिक उलाढाल १४० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

पण मंदिराला बिझनेस न बनवता भाऊंनी ज्या तऱ्हेने शेगाव संस्थांनाचं उदाहरण उभं केलं आहे त्याला तोड नाही.

हिशोबातला काटेकोरपणा, पारदर्शकता, निस्वार्थी सेवा आणि सगळ्यात महत्वाची असणारी स्वच्छता ह्याला आपल्या सोबत प्रत्येक सेवेकरी आणि तोच भाव इकडे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनात निर्माण करताना भाऊंनी एक आदर्श उदाहरण प्रत्येकासमोर ठेवलं आहे.

शेगाव संस्थानाला जागतिक नकाशावर नेण्यामागे तपश्चर्या आहे ती एका योगीची. तो योगी म्हणजेच ‘शिवशंकर भाऊ पाटील’.

कोणतंही मंदिर म्हंटल की त्यात श्रद्धाभाव येतो.

भाविक श्रद्धेने त्या शक्तीपुढे नमन करतात… पण सेवाभाव जागृत करायला लागते ती वृत्ती. ती निर्माण करण्याचं श्रेय शिवशंकर भाऊ पाटील ह्याचं आहे.

आज ११,००० पेक्षा जास्ती सेवेकरी प्रतीक्षा रांगेत उभे आहेत. सेवा ज्यात कोणतंही मानधन दिलं जात नाही तर सेवा संपल्यावर एक प्रसादाचा नारळ घेऊन सेवेकरी आपल्या पुढच्या मार्गाला प्रस्थान करतो. १७,००० पेक्षा जास्त सेवेकरी आज शेगाव संस्थानात अश्या प्रकारे निस्वार्थी सेवा देतात.

हा निस्वार्थी भाव प्रत्येक सेवा देणाऱ्याच्या मनात उत्पन केल्यामुळेच आज शेगाव हे देवस्थान केवळ भारतात नव्हे तर जगभरात आपलं वेगळेपण टिकवून आहे.

शेगाव देवस्थान प्रसिद्ध आहे ते सोन्या चांदीने मढवलेल्या मुर्त्यांनी नव्हे तर इथल्या स्वच्छतेमुळे. संस्थानाच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक ठिकाणची स्वच्छता ही सगळ्यांच्या नजरेत भरते.

श्री गजानन मंदिर असो वा भक्तनिवास, आनंदसागर सारखा ६५० एकर इतक्या प्रचंड जागेत वसलेला प्रकल्प असो वा महारष्ट्रातील सर्वोत्तम असणारं अभियांत्रिकी कॉलेज ह्या सगळ्याच ठिकाणी कागदाचा एक कपटा आणि झाडावरून गळलेलं पान मिळणं मुश्कील इतकी कमालीची स्वच्छता राखली जाते.

संत गजानन महाराजांचे निस्सीम भक्त असणारे जगातील अग्रगण्य बँक असणाऱ्या सिटीबँकेचे अध्यक्ष विक्रम पंडित, हे भाऊंचं काम पाहून इतके थक्क झाले की त्यांनी शेगाव संस्थानाला एक दोन नाही तर तब्बल ७०० कोटी रुपये दिले.

पण भाऊंनी ते नम्रपणे नाकारले. भाऊंनी हिशोब केला फक्त ७० कोटी रुपयांची गरज होती. तेवढेच घेऊन तब्बल ६३० कोटी रुपये शेगाव संस्थानाने सिटीबँकेला परत केले. घेतलेल्या त्या ७० कोटी रुपयांची ही सिटीबँकेला परतफेड केली.

पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अश्या खोल्या आणि सुविधा अतिशय कमी पैश्यात भक्तांसाठी वर्षभर उपलब्ध आहेत. अवघ्या १५ रुपयात आनंदसागर सारखा प्रकल्प आपण बघू शकतो.

आनंदसागर सारख्या प्रकल्पाची पूर्ण संकल्पना भाऊंची आहे. त्याचा पूर्ण प्लान पण भाऊंनी केलेला आहे. महाराष्ट्राच्या शिरपेचात धार्मिक पर्यटन केंद्र हा तुरा रोवण्यात आनंदसागर सगळ्यात वरती आहे.

आनंदसागर मध्ये आजही रोजचा जमाखर्च लिहून ठेवला जातो. इतकी शिस्त लावताना हे सगळं काम फक्त श्रद्धेने करण्यामागे शिवशंकर भाऊ पाटील ह्यांचा मोठा वाटा आहे.

आपलं कार्य फक्त तितकंच मर्यादित न ठेवता ४२ पेक्षा जास्त उपक्रम संस्थेच्या वतीने राबवले गेले आहेत. आजबाजूच्या १००० गावांपेक्षा जास्त गावांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवण्याची जबाबदारी संस्थेने उचलली आहे.

महाराष्ट्राचा विदर्भ हा भाग पाण्याच्या दुर्भिक्षाने नेहमीच ग्रासलेला असताना पूर्ण शेगाव शहराला पाणीपुरवठा असो वा आनंदसागर सारख्या प्रकल्पात लागणारं पाणी, इकडे असणाऱ्या निसर्गाच्या नंदनवनाला लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था ही संस्थानाने केली आहे.

इथे प्रत्येक गोष्टीचं आधुनिकीकरण अगदी २१ व्या शतकातल्या प्रमाणे केलं गेलं आहे. मग ते अगदी समान नेणाच्या ट्रोली पासून असो किंवा आग, नैसर्गिक आपत्तीच्या सुमारास आपातकालीन दिशादर्शक रस्ते बांधणीने असो.

दर्शनाच्या रांगेत उभं असताना पायाला चटका लागू नये म्हणून दिलेला स्पेशल रंगाचा लेप असो वा रांगेत प्रत्येक ठिकाणी बसण्याची व्यवस्था ते मातृरूम पासून २४ तास सेवेत असणारी वैद्यकीय मदत असो.

अश्या सगळ्या गोष्टी करताना पण संत गजानन महाराजांनी सांगितलेला सेवाभाव त्याच श्रद्धेने जपला जातो आणि ह्याचं सर्वच श्रेय शेगाव संस्थानासोबत शिवशंकर भाऊ पाटील ह्यांच्या नेतृत्वाला आहे.

सगळे पद्म पुरस्कार घेण्यासाठी लॉबिंग करत असताना ते सर्व पद्म पुरस्कार नम्रपणे नाकारताना आजही भाऊ १२ तासांपेक्षा जास्ती काम करतात. कोणतीही प्रसिद्धीची हाव नाही.

४२ उपक्रम आणि निर्माण केलेला आनंदसागर सारखा भव्यदिव्य प्रकल्प, सगळ्याचा हिशोब चोख आहे. प्रत्येक काम स्वच्छ आणि पारदर्शी आहे.

सगळी सुखं, पैसा, मानसन्मान समोर असताना सचोटीने, प्रामाणिकपणे, नम्रतेने आपली सेवा श्री गजाननाच्या प्रती अर्पण करताना शिवशंकर भाऊ पाटील ह्यांनी पूर्ण जगापुढे आपला आदर्श ठेवला आहे.

आयुष्यात माणूस म्हणून पैश्याशिवाय, पुरस्काराशिवाय आणि कोणत्याही पोझिशन शिवाय मोठं होता येतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवशंकर भाऊ पाटील. त्यांच्या ह्या कार्यापुढे मी नतमस्तक.

अमेझॉन वर उपलब्ध असलेली श्री. गजानन महाराज आणि काही इतर धार्मिक पुस्तके

Manachetalks

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

9 Responses

 1. Hemant urkude says:

  Chukiche aahe aamhi a
  Shegav la gelo tr tithe bhakt nivas navala aahe 4 da mi geloy pn 1da pn room midali nahi ithe pn lach dyavi lagte kay?

  • Vishal says:

   Nahi Tase mulich Nhi,
   Me tin vela gelo pratyekveli uttam soy zali. Bharlelya rakmechi pavti pn milte.
   4 vegveglya thikani ahet bhakt Niwas.
   Anand vihar ani anand sager visava ya Don thikani rooms mublak ahet.
   Yenajanyas Moffat bus service ahe.

  • Ankita Shelke says:

   Tuz futk nashib😂 ashya vicharan chya lokanna tithe jagach nahi😎 tuzya manat jr lach dyav lagte ka ha prshn pdla tr… vicharav pn lagt hott lach gheta ka… ka vicharl nahi nahi mg himmt nvti n tondavr bolnya chi mage comment vr lihito lach gheta ka tr…

  • सुनील पुरकर says:

   शेगाव संस्थान अन लाच?. अशक्य ! शेगांव संस्थान भक्तांन मध्ये देव शोधते. पारदर्शी कारभार कशाला म्हणतात ते शेगांव संस्थान ला भेट दिल्यावरच कळते.

   • Datta says:

    गण गण गणात बोते जय गजानन माऊली मी एक शेतकरी आहे माऊली मला माझी परिस्थिती आता खराब आहे त्यामुळे सर्वसामान्य गरीब शेतकरी असुन मला मदत पाहिजे पण उधार या स्वरुपात मी काही काळानंतर पर्यंत करेल एक शेतकरी खूप अवघड परिस्थिती आहे माझ्या नंबर आहे 9881243098 माझ्या अकाऊंट नंबर आहे 20270892296 SBIN0004818 काही चूक नाही तसेच मला अडचणी आहे माझे काही चुकलास मला माफ करावे जय गजानन माऊली

  • Vilas Rane says:

   Tumhi maybe bindok ahat hemant. Tumhi laach dydyla gelat tar sevekari premane tumhala bahercha rasta dakhvtil. Tumch nashib futak.

 2. अविनाश काळे says:

  असा अपप्रचार करणे योग्य नाही. माझं शिक्षण संस्थानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून झालेले असल्यामुळे शेगाव संस्थान शी माझा जवळून संबंध आलेला आहे. श्रीमंत लोक ॲडमिशन घेण्यासाठी लाखो रुपये द्यायला तयार असताना केवळ गुणवत्तेच्या जोरावर मेरिट लिस्ट मधून मॅनेजमेंट कोट्याचे ऍडमिशन होताना मी पाहिले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार होण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय जशी स्वच्छता आणि शिस्त मंदिरात किंवा आनंद नगर मध्ये दिसते तशीच शिस्त कॉलेजमध्ये पाहायला मिळते. शेगाव हे प्रसिद्ध तीर्थस्थळ असल्यामुळे भाविकांची बरीच गर्दी असते. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येकालाच रूम मिळेल याची शाश्वती देता येत नाही. तरी आपल्या मनातील गैरसमज दूर करून घ्यावा. शक्य असल्यास जाण्याअगोदर भक्त निवास च्या दूरध्वनी क्रमांकावर चौकशी करून घ्यावी, जेणेकरून गैरसोय टाळता येईल.

 3. अजित नारकर says:

  एकच शब्द द ग्रेट

 4. Saiprasad Prabhakar Panhalkar says:

  Mast 👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!