रॉकेट मधलं इंधन संपल्यावर काय होतं माहित आहे का?

येत्या २४ जानेवारी ला इस्रो अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन पुन्हा एकदा इतिहास घडवण्यासाठी सज्ज होत आहे. ह्या वेळेस इस्रो एका अश्या तंत्रज्ञानाचं परीक्षण करत आहे ज्याचा आजवर कोणी वापर तर सोडाच पण विचार हि केलेला नाही आहे. ह्या वेळेस इस्रो पी.एस.एल.व्ही. ह्या रॉकेट चं डी – ३ हे नवीन स्वरूप आकाशात प्रक्षेपित करत आहे. डी – ३ मध्ये असं काय आहे कि ज्यामुळे येणाऱ्या काळात रॉकेट क्षेत्रात अमुलाग्र बदल आणि एका नव्या तंत्रज्ञानाचा उदय अपेक्षित आहे.

कोणतंही रॉकेट आकाशात प्रक्षेपित करताना त्यात अनेक स्टेज वापरल्या जातात. रॉकेट मधील इंधन हे रॉकेट च्या वजनाच्या जवळपास ९०% पेक्षा जास्ती भाग असते. त्यामुळे इतकं इंधन साठवायला तितक्याच मोठ्या टाक्या लागतात. रॉकेट मधील इंधनाच प्रज्वलन होऊन ते इंधन संपून गेल्यावर राहिलेल्या टाक्यांचं वजन पुढे ओढत नेण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणून कार्य संपलेल्या टाक्या ह्या मुख्य रॉकेट पासून विलग होऊन पृथ्वीवर पडतात अथवा वातावरणात नष्ट होतात. जगातील जवळपास प्रत्येक रॉकेट ह्याच तत्वावर काम करते. ह्यातील प्रत्येक विलग झालेल्या टाक्यांना आपण स्टेज असं म्हणतो. रॉकेट हे स्टेज मध्ये काम करत आपल्यावर असलेल्या उपग्रहांना त्यांच्या योग्य कक्षेत प्रक्षेपित करते.

आजवर जगातील सगळेच देश प्रत्येक वेळी नवीन नवीन टाक्या प्रत्येक उड्डाणाला वापरत होते. पण जसजसे नवीन देशांकडे हे तंत्रज्ञान आलं तशी स्पर्धा वाढत गेली. मग सुरु झालं ते किमतीचं युद्ध. अमेरिकेच्या स्पेस एक्स ह्या कंपनीने पहिल्यांदा ह्या टाक्या पुन्हा जमिनीवर उतरवण्याची कल्पना मांडली आणि त्याला मूर्त स्वरूप हि दिलं. ह्यामुळे उपग्रह प्रक्षेपणाच्या खर्चात कमालीची बचत होणार आहे. आज उपग्रह प्रक्षेपण बाजाराची उलाढाल जवळपास ३९,००० हजार कोटी रुपये आहे. पुढल्या अवघ्या पाच वर्षात म्हणजे २०२४ पर्यंत ह्याची उलाढाल ५०,००० हजार कोटी पेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे. २००९ पर्यंत ०% वाटा असणारी स्पेस एक्स कंपनी आपल्या इंधन टाक्या (स्टेज) पुन्हा वापरणाच्या तंत्रज्ञानामुळे २०१८ साली बाजारातील ५०% वाटा राखून आहे. इंधन टाक्या किंवा स्टेज ह्याला पुन्हा कसं वापरता येईल अथवा त्याचा कसा योग्य वापर केला जातो ह्यावर बाजारातील वाटा अवलंबून असणार आहे.

भारत अर्थात इस्रो हि जगात किफायतशीररित्या कमी वजनाचे उपग्रह अवकाशात पाठवण्यात नावाजलेली स्पेस एजन्सी आहे. म्हणून पुन्हा वापरण्याच्या ह्या तंत्रज्ञानावर इस्रो काम करत आहे. आधी सांगितलं तसं इस्रो नेही अश्या पद्धतीच्या रॉकेट तंत्रज्ञानावर काम करण्यास सुरवात केली आहे. ज्यात प्रक्षेपित झालेले रॉकेट पुन्हा एकदा जमिनीवर उतरवलं जाणार आहे. इस्रो चं एडमायर व्ही.टी.व्ही.एल. (व्हर्टिकल टेक ऑफ व्हर्टिकल लँडिंग) हे रॉकेट सुपर सॉनिक रेट्रो प्रपोलशन वापरणार असून ह्याच्या रॉकेटला स्पेशली तयार केलेले पाय असणार आहेत. हे पाय रॉकेट ला परतीच्या प्रवासात योग्य दिशा दाखवणार आहेत. एडमायर व्ही.टी.व्ही.एल. रॉकेट मद्धे ह्याशिवाय इंटिग्रेटेड न्याव्हीगेशन सिस्टीम असणार आहे. तसेच लेझर अल्टीमीटर आणि भारताच्या जी.पी.एस. नाविक सिस्टीम द्वारे ह्याचं नियंत्रण केलं जाणार आहे.

इस्रो व्ही.टी.व्ही.एल. हे तंत्रज्ञान वापरून रॉकेट ची पहिली स्टेज तर आर.एल.व्ही. सारखं तंत्रज्ञान वापरून ज्यात दुसऱ्या टप्प्यातील स्टेज हि हवेत विमानाप्रमाणे ग्लाईड करून योग्य ठिकाणी उतरवणार आहे. ह्यापलीकडे जाऊन इस्रो असं एक तंत्रज्ञान ह्या वेळेच्या उड्डाणात वापरणार आहे ज्याने इतिहास घडणार आहे. इस्रो आपल्या डी – ३ ह्या नवीन स्वरूपात पी.एस.एल.व्ही. च्या चौथ्या टप्प्यातील स्टेज ला उपग्रहाला प्रक्षेपित केल्यावर पुन्हा सौर उर्जेच्या रूपाने जिवंत करणार आहे. ह्या स्टेज च्या पाठीवर भारतातील विद्यार्थ्यांनी बनवलेला डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांना समर्पित आणि त्यांच्या नावाचा कलामसॅट हा उपग्रह अवकाशात विहरत ठेवणार आहे. ह्या स्टेज मध्ये थोडं जास्त इंधन भरून ह्यातील बुस्टर च वापर करत त्याला त्याच्या कक्षेत नेणार आहे.

२४ जानेवारीच्या उड्डाणात मायक्रोसॅट आर हा प्रमुख उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. त्या सोबत कलामसॅट हा भारतातील विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रह चौथ्या टप्प्याच्या सोबत अवकाशात अजून वरच्या कक्षेत नेला जाणार आहे. अश्या तऱ्हेने प्रक्षेपित केला जाणारा कलामसॅट हा जगातील पहिला उपग्रह असणार आहे. तर अश्या तंत्रज्ञानाने उपग्रह प्रक्षेपित करणारी इस्रो हि जगातील पहिली स्पेस एजन्सी ठरणार आहे. हा इतिहास रचला गेल्यावर येणाऱ्या काळात इस्रो पी.एस.एल.व्ही. आणि जी.एस.ए.ल.व्ही. च्या सगळ्याच स्टेज पुन्हा वापरण्याचं तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक घेणार आहे. हे सगळं यशस्वी झाल्यास सुमारे ५०,००० हजार कोटी च्या बाजारपेठेचा मोठा हिस्सा भारताकडे चालून आल्यास आश्चर्य वाटणार नाही. ह्यामुळे ह्या क्षेत्रात खूप संधी उपलब्ध होणार आहेत हे नक्की. ह्या इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी आपल्या सर्वांनाच आहे. ह्या वेगळ्या प्रयोगासाठी इस्रो चे संशोधक आणि अभियंते ह्यांना शुभेच्छा.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय