अपमान पचवण्याचे पाच उपाय!!

आमच्या व्हॉट्सएप कोर्समध्ये एका ताईंनी आपली समस्या शेअर केली.

मी एक ३० वर्षांची विवाहीत गृहीणी आहे, मी माझे पती, दोन मुले, सासु, नणंद, जाऊ-दिर, असं आमचं कुटूंब आहे.

माझ्या सासुबाईंचा स्वभाव अत्यंत विचित्र आहे, लग्नाला सात वर्षे झाली तेव्हापासुन क्षुल्लक गोष्टींवरुन टोमणे मारणं, घालुन पाडुन बोलणं, माहेरच्या माणसांचा उद्धार करणं, खोटं बोलणं, भांडणे लावणं अशा गोष्टी सहन करत आहे.

आजकाल कामापुरतं गोड बोलतात आणि वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतात. अशा वागण्यामुळे घरात कुणाचीही प्रगती होत नाही, त्यांच्या अशा वागण्यामुळे मी मागची काही वर्ष डीप्रेशनमध्ये गेले होते.

आता मी धक्क्यातुन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे, मला माझं करीअर घडवायचे आहे. खुप मोठ्ठं बनायचं आहे.

माझी मदत करा, परिस्थिती हाताळण्याचे उपाय सांगा. प्लिज!!!!!

ताई, तुमच्या धीराला आणि हिमतीला सलाम!

मागची काही वर्षे तुम्ही कोणत्या त्रासात काढली असतील, याची आम्ही फक्त कल्पनाच करु शकतो, पण हे वार झेलुन आणि अपमान पचवुन तुम्ही आता पुर्वीपेक्षा अधिक मजबुत आणि कणखर झाला आहात! आता तुम्ही पुर्वीसारख्या भाऊक आणि दुबळ्या राहीलेल्या नसुन स्वतःच्या शक्तीची तुम्हाला जाणीव झाली आहे, त्याबद्द्ल अभिनंदन!

एकत्र कुटुंबामध्ये राहत असताना, घरातली जेष्ठ माणसे, सगळ्या घराला, त्यातल्या नव्या सुनेला, आपल्या ताब्यात, ठेवायला बघतात, तेव्हा संघर्ष अटळ असतो.

कुठल्याही मानसिक युद्धामध्ये, तिच व्यक्ती जिंकते, जी शत्रुपेक्षा मनाने अधिक शक्तीशाली, जास्त संयमी आणि तेवढीच बेफिकीर असते. जे लोक छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावुन घेतात.

आपोआपच त्यांचा फोकस आपल्या ध्येयावरुन, आपल्या स्वप्नांवरुन, हरवतो, आणि सततच्या ताणतणावाने त्यांच्या जीवनातला आनंदही ते गमावुन बसतात.

ही काही तुमची एकटीची समस्या नाही, आज आधुनिक भारतातल्या, त्यातही स्पेशली मध्यमवर्गीयातल्या, लाखो-करोडो तरुण स्त्रिया ‘कौटुंबिक धुसफुस आणि कुरबुरी’ ह्या मानसिक तणावात जगत आहेत.

यावर काही उपाय आहेत का? निश्चितच आहे्त, कारण.

हर ‘समस्या का हल’ और हर ‘मेहनत का फल’ जरुर मिलता है!

ही आपल्या ग्रुपची टॅगलाईन आहे.

१) कडु गोळ्यांचा डोस

आपण जेव्हा आजारी पडतो, तेव्हा आपल्याला वेगवेगळी औषधे दिली जातात, त्यातल्या काही गोळ्या अत्यंत कडु असतात, आपल्याला त्यांचा तिटकारा येतो, पण बरे होण्यासाठी ते घेणेही आवश्यक असते. आपण ती गोळी गटकन गिळुन टाकतो. तसचं दुःखाचंही आहे.

अहंकाराच्या रोगातुन बरे होण्यासाठी आपल्या प्रत्येकाला कसल्या ना कसल्या दुःखाची कडू गोळी दिली जाते, तेव्हा ती चघळत बसण्याऐवजी गटकन गिळुन ते दुःख विसरुन जाणारे, व्यावहारीक शहाणे असतात.

माझ्या वाट्याला हे दुःख का आले असा जेवढा त्रागा करु, तेवढा त्या दुःखाचा परिणाम वाढत जातो. स्वेच्छेने नाही घेतली तर जबरदस्तीने ते औषध आपल्याला घ्यावेच लागते.

आणि हसत हसत त्या दुःखाचा स्वीकार केला की त्याची तीव्रता एकदम कमी होवुन जाते.

२) बहिरे व्हा!

आपला द्वेष करणाऱ्या व्यक्तींचा आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही, त्यासाठी अशा व्यक्तींना दुखवु नका, पण त्यांच्याशी जास्त संपर्क, वादविवाद टाळा.

घरातल्या वडीलधाऱ्यांची सेवा अवश्य करा पण जेवढ्यास तेवढे बोला.

त्यांचा अनादर किंवा अपमान अजिबात करुन नका, कारण आपण जे देतो ते फिरुन परत आपल्याकडे येते, हा सृष्टीचा नियम आहे, पण त्यासोबतच स्वतःच्या आत्मसन्मानालाही जपा.

आपल्याला जाणीवपुर्वक त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्तिंपासुन चार हात दुर रहा. कमी बोला. जेवढं बोलाल तेवढं मात्र हसुन खेळुन बोला. मुकपणेच त्यांची अधिकची सेवा करा.

कर्तव्यात अजिबात कसुर करु नका पण त्यासोबतच, त्यांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनामध्ये अजिबात स्थान देऊ नका, असं समजा, ते तुमच्यासाठी आस्तित्वातच नाहीत.

जोपर्यंत आपण आधिकार देत नाही तोपर्यंत कोणीही आपल्याला हर्ट करु शकत नाही.

३) मन करा रे प्रसन्न

तुम्हाला काय करायला आवडते? तुमचा फेव्हरेट टाईमपास काय आहे? आपलं संपुर्ण लक्ष त्या गोष्टींकडे वळवा. संगीत, एखादी कला जोपासणं, रांगोळी, स्वयंपाक, झाडं लावणं, चांगली पुस्तकं, चालायला जाणं, यातलं काहीही चालेल, टी. व्ही. पासुन तेवढं दुर रहा. लवकर उठा, लवकर झोपा. स्वतःच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्या.

नवनवीन मैत्रीणी जोडा, लोकांमध्ये मिसळा, जुना नात्यांना फ्रेश करा, एका दिवसाच्या सहलीवर जा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्यात रंग भरतील.

४) अफर्मेशन म्हणा!

सर्वात महत्वाचे रोज सकाळ संध्याकाळ न चुकता ध्यान करा, आणि आठवलं तेव्हा, दिवसातुन, शक्य तितक्या जास्त वेळा, शक्य असल्यास मोठ्याने मनःपुर्वक प्रार्थना करा.

“माझे इच्छित शिक्षण सहज पुर्ण झाले आहे, माझे उत्पन्न दहापटीने वाढले आहे, माझे व्यकिमत्व दिवसेंदिवस अधिकधिक आनंदी, प्रसन्न आणि आकर्षक होत आहे, मी कुटुंबातील सर्वांवर प्रेम करते, सगळे माझ्यावर प्रेम करतात, मी सुखी आहे, मी निरोगी आहे, माझी सर्व स्वप्ने पुर्ण झाली आहेत.

५) मला वचन द्या!

मी तुम्हाला सर्व प्रॉब्लेम्समधुन बाहेर काढेन, त्याबदल्यात मी काही मागितले तर मला काही द्याल का?

आज मला एक वचन पाहीजे आहे.

  • येणारे एकवीस दिवस, म्हणजे दहा फेब्रुवारी पर्यंत, कितीही वाईटात वाईट परिस्थिती आली तरी तुम्ही हसत हसत त्याचा सामना करणार आहात.
  • येणारे एकवीस दिवस तुम्ही कोणाशीही भांडणार नाही.
  • येणारे एकवीस दिवस तुम्ही कोणीही हिरमुसणार नाही, रडणार नाही, त्रागा करणार नाही.
  • येणारे एकवीस दिवस तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ आनंदी असल्याचं नाटक कराल.
  • येणारे एकवीस दिवस प्रत्येक कुटुंबीयाला कसलं ना कसलं सरप्राईज द्याल, कधी त्यांना छोटीशी भेटवस्तु द्या, कधी त्यांना घेऊन
  • बाहेर फिरायला जाल, म्युझीक लावुन डान्स करण्यामध्ये एक वेगळीच मजा असते.
  • जास्तीत जास्त मौन पाळा, शब्दांपेक्षा स्पर्शांची भाषा बोला.

आपल्या प्रत्येकाच्या मनातली प्रेम करण्याची शक्ती जागृत होवुन, सर्वांचं आयुष्य सुख, समृद्धी आणि समाधानाने भरुन जावे, अशा शुभेच्छा!

धन्यवाद!

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “अपमान पचवण्याचे पाच उपाय!!”

  1. Mala ha lekh khup avadla.sarani changli mandani keleli ahe .asech navnabin lekh apan post karal ashi asha karto.dhanyawad

    Reply
  2. अपमान पचवण्यासाठी खुप रामबाण उपाय सांगितले आहेत.
    रोज करावयाची प्रार्थना, स्वयंसूचना, व वचन या संकल्पना खुप आवडल्या नक्कीच अंगीकारू.
    मनापासून आभार, धन्यवाद

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय