प्रजासत्ताक दिनाला नारीशक्तीचे दिमाखदार संचलन

प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिन

आजचा २६ जानेवारी हा खऱ्या अर्थाने भारतीय स्त्री साठी प्रजासत्ताक दिन असणार आहे. २०१९ चा प्रजासत्ताक दिन “नारी शक्ती” ह्या संकल्पनेवर आधारित असणार आहे. त्यामुळेच ह्या वर्षीचं राजपथावर होणारं संचलन कोणीही चुकवू नये.

भारतीय स्त्री जरी चूल आणि मूल ह्यात अडकलेली असली तरी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून देशाचं संरक्षण करण्याची हिंमत तिच्यात असते हा खूप मोठा विचार राजपथावर होणाऱ्या संचालनात दिसून येणार आहे.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदा पूर्ण महिलांची तुकडी राजपथावर संचलन करणार आहे. ह्या तुकडीचं नेतृत्त्व मेजर ‘खुशबू कंवर’ करणार आहे. ‘आसाम रायफल’ ह्या भारतातल्या सगळ्यात जुन्या पॅरामिलिटरी फोर्सच्या तुकडीचं नेतृत्त्व करायला मिळणे हा माझा खूप मोठा सन्मान आहे असं मेजर खुशबू ने सांगितलेलं आहे. तिच्या शब्दात,

Leading an all-women contingent of the Assam Rifles is a matter of great honour and pride for me. We have practised very hard…I am a daughter of a bus conductor from Rajasthan and if I can accomplish this, then any girl can fulfil her dream.

मेजर ‘खुशबू कंवर’ एका मुलाची आई असून आपल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत एक इतिहास त्या राजपथावर घडवणार आहे.

ह्या शिवाय कॅप्टन ‘शिखा सुरभी’ मोटारबाईक वर श्वास रोखणारं प्रात्यक्षिक करणार आहे. भारतीय सेनेच्या जगभर प्रसिद्ध असणाऱ्या ‘डेवरडेविल्स’ ह्या ग्रुप ची ती पहिली महिला सदस्य आहे. (डेवरडेविल्स ह्या ग्रुप ची प्रात्यक्षिकं पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा इतके भारावलेले होते कि ह्याचा उल्लेख हि त्यांनी आपल्या भाषणात केला होता.) कॅप्टन ‘शिखा सुरभी’ ने हा बहुमान आणि क्षण आपल्यासाठी खूप स्पेशल असल्याचं म्हंटल आहे. तिच्या शब्दात,

I am the first woman to be part of daredevils segment of the parade. It took a lot of practice to perfect the stunts. But I am proud of this accomplishment. Women can do anything, I will perform a standing salute on a bike.

ह्या शिवाय लेफ्टनंट ‘अंबिका सुधाकरन’ भारतीय नौदलाच्या १४४ खलाशांचं नेतृत्व करणार आहे. तिच्या मते,

Men and women are marching shoulder-to-shoulder to serve the nation.

ह्या शिवाय लेफ्टनंट ‘भावना कस्तुरी’ इंडियन आर्मी सर्विस कॉर्पचं नेतृत्त्व तर कॅप्टन ‘भावना स्याल’ transportable satellite terminal’s च नेतृत्त्व करणार आहे.

ह्या वर्षी महिलांचा सहभाग हा राजपथावर सगळ्यात जास्त असणार आहे. भारताच्या बदलत्या नारी शक्तीला बघण्याची संधी ह्या नारी शक्ती प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देशवासीयांना मिळणार आहे.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!