मोबाईल, डिटीएच कंपन्यांची वैधता वैध आहे का हे कोण तपासणार??

मोबाईल
मोबाईल

आज सकाळी सकाळी मोबाईल वर मेसेज वाचला. तुमच्या नंबरची आऊटगोईंग कॉलची वैधता उद्या समाप्त होत आहे. प्लॅन चालू ठेवण्यासाठी कमीतकमी XXX रकमेचा रिचार्ज करा…. मला समजेना, माझा बॅलन्स तर शिल्लक आहे मग वैधता कशी काय संपणार.? हे काय नवीन? मी रिचार्ज करायला गेलो. दुकानदाराने विचारताच सांगितले की ही नवीन भानगड आहे. तुम्ही दोन सिम वापरता का? एका फोनवरून जास्त प्रमाणात कॉल करता का? दुसरा क्रमांक फक्त इनकमींग साठी वापरता का? मी म्हणालो, तुला कसे माहिती? तो म्हणाला की, कंपन्या आपला तोटा भरून काढण्यासाठी असे करतात.. आता तर आपण एकदम तीन तीन महिन्याच्या कालावधी साठी रिचार्ज करतो. तेही अनलिमिटेड कॉल व इंटरनेट साठी. तेव्हा मोबाईल मधील दुसऱ्या कंपनीच्या कार्डचा वापर होत नाही. हा त्या कंपनीचा तोटा आहे. आणि आता तर ईतकी स्पर्धा आहे की, स्पर्धेत तरायचे की तोट्यात जायचे अशा परिस्थितीत ग्राहकांना वेठीस धरले तर? असाच काहीसा हा प्रकार आहे.

आपण जाहिराती पाहून डबल सिमचा मोबाईल वापरायला लागलो. आता दोन्ही सिमवर किती आणि कोणत्या कारणासाठी रिचार्ज मारायचा याचे स्वातंत्र्य ग्राहकांना हवे ना.? मी रिचार्ज करून घरी आलो आणि आईला फोन लावला तर फोन लागला नाही. पण सुचना मात्र ऐकू आली, ‘या नंबर वर येणारे सर्व ईनकमींग कॉल अडवण्यात आले आहेत. मला पुन्हा एक धक्का बसला. मी कस्टमर केअर सेंटरमध्ये फोन करून विचारले असता त्यांनी सांगितले की त्या नंबर वरून जास्त दिवसात मोठा रिचार्ज न केल्यामुळे त्यांची आऊठगोईंग व इनकमींग कॉलची वैधता समाप्त करण्यात आली आहे. पुन्हा चालू करण्यासाठी छोटा रिचार्ज मारा. एका महिन्यासाठी. त्याची वैधता २८ दिवस असेल.

मी घरी आलो. या वैधतेनं डोक्यावर केस उभे राहिले होते. जरा रिलॅक्स व्हायला हवे म्हणून टिव्ही लावला तर तो ही डिसप्लेवर मेसेज घेऊन. तुमच्या रिचार्ज ची वैधता संपली आहे. आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा….. कँलेडरवर २९ तारीख. अजून महिना संपायला ३ दिवस बाकी आहेत. आपण तर केबल वापरतो. पूर्ण महिना झाल्यावर पैसे दिले आहेत आपण आणि आता हे काय चालले आहे. मी केबल ऑपरेटरला विचारले तर त्याने ट्रायच्या नवीन नियमांचे सांगितले.. म्हणजे ईथेही वैधता.

या सर्व धक्यांनी मला प्रश्न पडले. त्याची उत्तरे कोण देणार?

  • पंधरा वर्षापूर्वी जवळपास सर्वच मोबाईल कंपन्यांंनी लाईफटाईम इनकमींग फ्री असे सागून मोठ्या रकमा भरून सिम कशासाठी दिले. लाईफटाईमचा अर्थ आणि कालावधी काय?
  • आपण ३०-३१ दिवसांचा महिना मोजतो तर मोबाईल, डिटीएच व केबल साठी वैधता २८/२६ दिवसांची का? अशा प्रत्येक महिन्यात उरलेल्या २-३ दिवसांचे वर्षभराचे किती अतिरिक्त उत्पन्न कंपन्या ग्राहकांच्या खिशातून लुटतात ते कळेल का?
  • ग्राहकाने मोबाईल व मनोरंजन स्वतःच्या ईच्छेने करायचे नाही का?
  • कंपन्या, ट्राय व ग्राहक यांमध्ये समन्वय साधण्यासाठी योग्य उपाययोजना का केल्या जात नाहीत?

लाइफटाइम फ्री इन्कमिंगच्या नावावर ग्राहकांची फसवणूक… ऎका या व्हिडिओत


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!