दुःख मिटविण्याचे सात सोपे उपाय – मराठी प्रेरणादायी लेख

मराठी प्रेरणादायी लेख

सर, मी एक सत्तावीस वर्षांची तरुणी आहे, सध्या गव्हरमेंट जॉबसाठी स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे, आमच्या घराची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे.

आई वडील, नातेवाईक लग्नासाठी मागे लागले आहेत, पण मनासारखे स्थळ मला अजुन आले नाही, पसंत पडले नाही, त्याचे टेंशन आहे.

अभ्यासात मन लागत नाही, एक मुलगा आवडु लागला आहे, पण तो अजुनही सेटल नाही, त्यामुळे तो माझ्याशी कमिटेमेंट करायला घाबरतोय.

कितीही कमी खाल्ले तरी दिवसेंदिवस माझे वजन वाढतच आहे.

ग्रुपमध्ये इतर मित्रमैत्रीणी माझी चेष्टा करतात, माझी आर्थिक परीस्थिती, माझा रंग, माझं वजन ह्यावरुन माझा मजाक उडवतात.

मला रडु येते. ह्या परिस्थितीला मी कशी हाताळु, सर?


XXX ताई, नमस्कार,

तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडवावा अशी तीव्र इच्छा झाली आहे, त्याबद्द्ल अभिनंदन!

तुमच्या जीवनातल्या आव्हानात्मक परिस्थितीची आम्ही फक्त कल्पनाच करु शकतो, आणि खुप हिंमतीने, धाडसाने, तुम्ही हे सगळे हाताळत आहात, आलेला प्रसंग निभावुन नेत आहात, ह्याबद्द्ल तुमचे खुप खुप कौतुक!

कमी अधिक प्रमाणात का असेना, पण आपण सगळेच जण आपल्या आयुष्यात कसल्या न कसल्या कठिण प्रसंगाना रोजच सामोरे जात असतो, कोणी दाखवतो, कोणी मनातल्या मनात ठेवतो, इतकचं!

कितीही वाईट प्रसंग असला तरी आपण आपला तोल ढळु न देता, आनंदी, हसतमुख राहु शकतो, त्यासाठी एक खास प्रकारचं ट्रेनिंग मनाला आवश्यक असतं.

१) फुटबॉल बनु नका

लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पहिला नियम आहे, इतरांच्या मताचा फुटबॉल बनु नका.

‘कोणीही यावे आणि टपली मारुन जावे’, आपण काय रस्त्यावर पडलेले आहोत काय?

लोकं तेच बोलतात, जे ते पाहतात, आणि कपडे बदलल्यासारखं, लोकं आपली मत बदलतात, आज जे लोक तुम्हाला नावं ठेवत आहेत, तेच उद्या तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.

त्यांची स्तुतीही खोटी आणि त्यांनी केलेली निंदाही निरर्थक!

आपल्याला मुद्दामहुन टारगेट करणाऱ्या लोकांकडे बघुन एक छानशी स्माईल द्या, आणि मनातल्या मनात जोरजोरात बोला! –

“तुम्ही कसेही वागा, कसेही बोला, मला काही फरकच पडत नाही!”

आपल्याच धुंदीत जगा,

They don’t exist for me! I don’t give dam attention towards them!

अशा एटीट्युडने जगल्यावर आपल्याला किंचित तरी त्रास होईल काय?

२) लहान मुलीसारखं निरागस बनुन जगा

ताई, लहान असताना तुम्हाला कधी टेंशन आल्याचं आठवतयं का?

मग मोठं झाल्यावर आपल्याला हे टेंशनफिंशन का येतं?

“अभ्यासात यश नाही, लग्नाला उशीर होतोय, बॉयफ्रेंड तयार नाही, घरात आर्थिक समस्या आहेत, वजन वाढत आहे,”

आयुष्यातल्या कटकटींना, फार जास्त गंभीरपणे घ्यायचंच नाही,

हे सगळं तुम्ही बदलु शकता,

In fact, तुम्ही ह्या सगळ्या समस्यांवर मात करावी आणि जगासमोर तुमची ओळख निर्माण करावी, म्हणुन तर ह्या समस्या आल्या नसतील?

तुमच्यामध्ये असलेल्या शक्तिसमोर ह्या सगळ्या समस्या चिल्लर आहेत.

कोणत्याही समस्येला आपल्यापेक्षा मोठं समजायचचं नाही हो!…

आपण मनःपुर्वक शंभर टक्के देऊन प्रयत्न करावेत, बाकी फालतु विचार करु नये!

असं समजायचं, की आपलं जीवन म्हणजे एक प्रकारचा मनोरंजक खेळ आहे. ह्या खेळात समरसुन भाग घ्यायचा,

खेळ कितीही रंगला, तरी हे अजिबात विसरायचं नाही, की इथे होणारी प्रत्येक हारजीत ही खोटीखोटीच आहे. प्रत्येक प्रसंगाकडे साक्षीभावानेच बघायचं, हे खुप गंमतीशीर आहे.

वकील पक्षकारचं अशीलपत्र स्वीकारतो आणि आपल्या अशीलाची बाजु कशी खरी आहे, हे पटवुन देण्यासाठी, न्यायालयात प्रचंड आटापिटा करतो. लोकांचे भांडण स्वतःचे असल्यासारखे प्राणपणाने लढतो.

पण जर का दुर्दैवाने तो केस हरला तर त्याला परिणामाचं सुख दुःख नसतं!

निकाल कुणाच्याही बाजुने आला तरी वकिलाला त्याची फी मिळते. तसंच आपणही वकील बनुन प्रामाणिकपणे आपली कर्तव्ये करावीत. नंतर व्यर्थ काळजी करु नये.

३) दुःखाला पोस्टपोन करा

ताई, तुम्ही दिवाळीच्या दिवशी आनंदी असता का, दुःखी असता! किंवा तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही चेहरा पाडून आणि टेंशन घेऊन कोपऱ्यात बसुन राहता का?

नाही! मग त्या दिवशी तुमच्या सगळ्या काळज्या कूठे पळुन जातात. त्या दिवशी सगळ्या समस्या सुटलेल्या नसतानाही आपण आनंदात का राहतो?

कारण आपण आपल्या प्रॉब्लेम्सना, दुःखाला, एक दिवसासाठी पोस्टपोन करतो. तो दिवस आनंदाचा असतो म्हणुन आपण मुक्तपणे बागडतो, खळखळुन हसतो, उत्सव साजरा करतो, मग मी म्हणतो, आपण दररोज असं का नाही जगु शकत?

रोजच असं बर्थडे सेलिब्रेशनच्या थाटात जगता का जगु नये?…..

बर्थ डे म्हणजे पहिला दिवस!

आणि आज आपल्या उरलेल्या आयुष्याचा पहिलाच दिवस आहे की!…

४) वाईट संगत सोडा

“ह्याने मला फसवले.”

“तिने माझा अपमान केला.”

“त्याने माझी मस्करी उडवली.”

“ती माझ्यावर हसली.”

ज्या लोकांचं तोंडही बघणं आवडत नाही, अशा लोकांना आपण, कित्येक दिवस, आपल्या मेंदुत फुकटात, जागा का देतो?

वाईट लोकांची संगत टाळा याचा अर्थ, जसं खराब लोकांची कंपनी टाळायची तसंच, आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांच्या आणि घटनांच्या आठवणींपासुनही चार हात लांबच रहायचे.

ह्या दरिद्री लोकांशी डायरेक्ट संभाषण टाळा,

पण ह्यांची नावं आपल्या मेंदुमध्ये कोरुन ठेवा,

स्वतःला सिद्ध करुन, आता तुम्हाला ह्यांच्या थोबाडीत मारायची आहे.

झालेल्या अपमानाला इंधन बनवा.

इतक्या मोठ्या व्हा की एके दिवशी हे लोक तुमच्यासमोर मान खाली घालतील.

५) भुतकाळ त्यागा!

मागे काय झालं हे सतत डोक्यात घोळवत बसु नये. एकदाच पंधरा मिनीटे घ्या, ओरडा, रडा, कागदं फाडा, काहीही करा, पण पुर्ण राग बाहेर काढा, आणि एकदाचे मोकळे व्हा. आतुन बाहेरुन निर्मळ व्हा, स्वच्छ व्हा, हलकं फुलकं व्हा, हेच तुमचं खरं रुप आहे.

रागराग करणं, द्वेष करणं, घृणा करणं हा आपला मुळ स्वभाव नाहीच.

भुतकाळात झालेल्या चुका सुधारा.

वर्तमानकाळात आनंदी रहा.

हे का झालं? कुणामुळे झालं? कशामुळे झालं? ह्यात दोषी कोण? त्याने असं का केलं? ती असं का वागली? असल्या फालतु गोष्टींमध्ये आपली मौल्यवान एनर्जी खर्च करु नका. घडलेल्या घटनांवर एन्क्वायरी कमिशन बसवणे सोडा.

डिलीट मारा आणि मोकळे व्हा!

फ्युचर प्लान्स बनवा. संपुर्ण लक्ष स्वप्नांवर केंद्रित करा.

६) दुःख, भीती आणि चिंता सोडा, कार्यमग्न आणि आनंदी राहुन ह्या सर्वांचं कंबरडं मोडा!

उद्या काय होईल ह्या भीतीने आपला आज खराब का करुन घ्यायचा?

उद्याबद्द्लचे विचार करण्यापेक्षा आताच्या क्षणी बिझी व्हा.

लहान मुलांना आनंद द्या. मोठ्या माणसांना आदर-सन्मान द्या.

आजुबाजुच्यांशी प्रसन्नतेने हसुन, गोड बोला, संधी मिळाली तशी सेवा करा, खुप काम करा, खुप पैसे मिळवा, धनाचा संग्रह वाढवा, कोणाचे मिंधे राहु नका, व्यवहारात दक्ष रहा. आपल्याकडुन कोणाचे अंतःकरण दुखवु नका.

दररोज न चुकता, शरीरातुन घामाच्या धारा निथळतील अशा पद्धतीचा कुठलाही व्यायाम करा. नित्यनेमाने ध्यान करा.

मनाला आनंद आणि उत्साह देतील अशे छंद जोपासा!

तुमच्या मनाच्या घरात घुसण्याची टेंशनची हिंमतच होते का बघा!..

७) कधीही विसरु नका, आपण भगवंताचे आहोत!

आपण त्या अगाध, अफाट शक्तिचा अंश आहोत, याचे सतत स्मरण ठेवा.

राम हेच समाधानाचं स्थान आहे, आणि भगवंताचं नाम हीच समाधानाची खाण आहे.

संगीताशी आणि पुस्तकांशी मैत्री करा.

सुंदर सुंदर डिव्होशनल सॉन्ज ऐका.

आकर्षणाच्या नियमाला बारकाईनं समजुन घ्या, रोजच्या छोटछोट्या गोष्टींमध्ये त्यांचा वापर करा.

तुमच्या जीवनातल्या सर्व समस्या छुमंतर होवुन, नवा जन्म घेऊन तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात होण्यासाठी, मनापासुन कोटी कोटी शुभेच्छा!…

धन्यवाद!

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.