निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करण्याची ११ महत्त्वाची कारणे

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

एचएसबीसीने केलेल्या विस्तृत जागतिक संशोधनावर मी अभ्यास करत होते, विषय होता, सेवानिवृत्तीचे भविष्य! निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

त्यांनी भारतासह १७ देशांमधील १८,००० हून अधिक लोकांना सेवानिवृत्ती योजनेशी संबंधित माहिती विचारून सर्वेक्षणाचा आढावा घेतला.

या सर्वेक्षणातून निघालेल्या निष्कर्षाकडे मी स्वतः एक धोक्याची घंटा म्हणून पाहते. बहुतेक लोकांना ‘निवृत्ती नियोजन’ किती महत्वाचे आहे, हे कळतच नाही.

भारतातील ४७% लोक त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर च्या भविष्यासाठी बचत करण्यास सुरुवातच करत नाहीत किंवा केली तरी त्यांना बचत करताना अडचणी येतात.

मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. सेवानिवृत्ती नंतरच्या भविष्याची काय स्वप्न तुम्ही रंगवता?

“गोव्यात एका सुंदर पोर्तुगीज शैलीचा बंगला, ज्याचा अर्धा भाग कॅफे हाउसमध्ये रुपांतरीत केला आहे.

तिथे पुस्तकांचा संग्रह आहे आणि लज्जतदार पदार्थ तिथे मिळतात.” हे माझे निवृत्ती चे स्वप्न आहे. मग तुमचे काय आहे?

आपल्या बहुतेक स्वप्नांसाठी आर्थिक पाठबळ असणं गरजेच आहे. “आपल्याला निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करण्याची गरज का आहे?” याची ११ कारणे जाणून घ्या:

१. दीर्घ आयुष्य:

वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवांचे आयुष्यमान वाढत आहे. भारतात देखील ६० वर्षांच्या प्रौढ व्यक्तीची सरासरी आयुमर्यादा सुमारे ७८ पर्यंत वाढली आहे.

तुम्ही सेवानिवृत्त होताना म्हणजे साधारण १८-२० वर्षानंतर तुमच्या ओळखी मध्ये असणारी सर्वात प्रौढ व्यक्ती साधारण ८५ वर्षाची असेल. अशा वेळी तुम्हीही सरासरीपेक्षा ७८ वर्षापेक्षा जास्त काळ जगलात तर काय होईल?

२. सरकारी पेंशन आता लागू नाही:

आपल्या पैकी काहींचे पालक सरकारी नोकरी करतात. म्हणजे, थोडासा कमी पगार होता, परंतु निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पेंशनच्या सोयी त्यांना मिळायच्या.

सरकारने १ जानेवारी २००४ च्या पुढे रुजू झालेल्या नवीन कर्मचा-यांना निवृत्तीवेतन देण्याची योजना बंद केली आहे आणि आता एनपीएस (नॅशनल पेन्शन सिस्टम) ही नवी योजना सुरु केली आहे. आता आयुष्याच्या उत्तरार्धात आपला उत्पन्नाचा स्रोत काय आहे?

३. हेल्थकेअरसाठी वाढणारी किंमत:

तुम्ही एखाद्या चांगल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली असेल तरी ती पुरेशी असेलच असं नाही. कोणतीही आरोग्य विमा पॉलिसी १००% खर्च भरून काढत नाही.

लक्षात ठेवण्याची अजून एक गोष्ट म्हणजे, भारतात आरोग्यसेवा खर्च दरवर्षी १०% पेक्षा अधिक या आश्चर्यकारक दराने वाढत आहे.

याचा अर्थ की शस्त्रक्रियेसाठी आपल्याला आज १ लाख रुपये खर्च होत असेल, तर कंपाउंड इंटरेस्ट धरून तुम्हाला सुमारे रु. १७.५ लाख रुपयांचा भुरदंड बसणार आहे. याही साठी हवे निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

४. आपण कायम काम करू शकत नाही:

धकाधकीच्या आयुष्याची सवय झाली असताना कधी कधी असं वाटतं की मी आता कंटाळलो आहे. पण मी नोकरी सोडण्याचा विचारही नाही करू शकत.

हा विचार माझ्या मनात अनेक वेळा आला आहे. कारण सेवानिवृत्तीनंतर काय हा प्रश्न डोकावतो आणि आज काम केल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात येतं.

आजच्या स्पर्धात्मक आणि तरुण कामगारांच्या जगात, वृद्ध लोक प्राधान्य यादीत सर्वात शेवटी येतात. समजा नियोजित कार्यकाळापेक्षा जास्त काम करून आपण काम करणं थांबवू या विचाराने बचत केली आणि नंतर विचार बदलल्याने कामही सोडलं नाही तर मिळणारे अतिरिक्त पैसे कोणाला नकोसे आहेत का?

५. आपल्या मुलांवर अवलंबून असणे योग्य नाही:

बऱ्याच भारतीयांसाठी, त्यांचे सेवानिवृत्तीचे नियोजन हे त्यांची मुलं आहेत. मी संयुक्त कुटुंबांची कल्पना नाकारत नाही. पैशासाठी आपल्या मुलांवर अवलंबून राहणे निश्चितपणे अयोग्य आहे.

एका नवीन किंवा कमी वयाच्या जोडप्यावर ३ पिढ्यांची (ते स्वतः, पालकांची आणि त्यांच्या मुलांची) आर्थिक जबाबदारी टाकणे योग्यच नाही.

आपल्या सेवानिवृत्तीसाठी स्वतः जबाबदार व्हा आणि चांगले नियोजन करा जेणेकरून आपण कोणावरही अवलंबून नसाल. ही एक जुनी आणि प्रतिकात्मक जाहिरात आहे परंतु मला वाटले की ‘एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ’ सेवानिवृत्तीची योजना येथे योग्य आहे.

लेखन : अपर्णा अगरवाल

सौजन्य : arthasakshar

अमेझॉनवर उपलब्ध असलेले इन्व्हेस्टमेंट प्लांनिंग बद्दलचे मराठी पुस्तक

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!