नेप्च्यून आणि युरेनसवर पडणारा हिऱ्यांचा पाऊस आणि प्रयोगशाळेत हिरेनिर्मिती!!

Neptune Uranus

“हिरा है सदा के लिये” असं म्हणत आपण त्याची स्वप्न बघतो. हिऱ्यांचा पाउस खरे तर स्वप्नवत गोष्ट पण ती प्रत्यक्षात आपल्या सौरमालेत घडते हा शोध नक्कीच एक सुखद धक्का देणारा आहे.

हिऱ्यांचा पाउस असं वाचताच मनात येते की एखादी स्वप्नवत घटना. पण खरोखरच असं शक्य आहे आणि ते ही आपल्या सौरमालेत असं वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात सिद्ध झाल आहे. आपल्या सौरमालेतील आईस जायंट म्हणजेच Uranus आणि Neptune  ह्या ग्रहांवर हिऱ्यांचा पाउस पडत असेल असं संशोधनातून सिद्ध झाले आहे. हे कसं शक्य आहे? तर ते समजण्यासाठी ह्या ग्रहांची स्थिती, तिथलं वातावरण आणि एकूणच हिऱ्याची निर्मिती हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल.

हिरा हे कार्बनचे एक संयुग आहे. कार्बनचे अणु जेव्हा  facecentered cubic cristal  स्वरूपात जोडले जातात तेव्हा हिऱ्याचा जन्म होतो. पृथ्वीवर हिरे हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण १४० ते १९० किमी खोलवर बनतात. कार्बन असलेली खनिजे कार्बन चा पुरवठा करतात तर त्यावर दाब आणि तापमान पृथ्वीच्या भूगर्भात मिळाल्यावर जवळपास हिरा बनायला १ बिलियन ते ३.३ बिलियन वर्षांचा कालावधी लागतो. इतक्या प्रचंड उलथापालथ झाल्यावर हिऱ्याचा जन्म होतो. युरेनस आणि नेपच्यून ग्रहांच वातावरण हे वेगळ आहे. युरेनस आणि नेपच्यून अनुक्रमे १७ ते १५ पट वस्तुमानात पृथ्वीपेक्षा मोठे आहेत. युरेनस वर तुम्ही ६३ पृथ्वी बसवू शकता आणि तरी त्यावर जागा शिल्लक राहील.

ह्या दोन्ही ग्रहांना सॉलिड कोअर आहे. ह्यांच्या वातावरणात हायड्रोजन आणि हेलियम ह्याचं मिश्रण असून ह्यावर मुख्यतः पाण्याचे समुद्र असून त्यात अमोनिया आणि मिथेनच्या मॉलिक्युल्सचे मिश्रण आहे. ह्या ग्रहांच्या वातावरणाचा दाब प्रचंड असून त्यामुळे वातावरणातील कार्बन अणु दबून त्याचं रुपांतर हिऱ्या मध्ये होत असणार. हे हिरे वस्तुमानामुळे ह्याच्या मध्याभागाकडे जात असावेत असा संशोधकांचा तर्क होता. पण असं खरोखर होत असेल ह्याबाबत शास्त्रज्ञ सांशक होते. हिऱ्यांचा पाउस तयार करण्यासाठी संशोधकांनी पोलिस्टाईरीन ची शिट वापरली ज्यात त्याच गुणधर्माचा कार्बन होता. त्यावर दाब तयार करण्यासाठी त्यावर प्रचंड अश्या ध्वनीलहरी चा मारा केला. ह्या सर्वांचा परिणाम असा झाला की जवळपास सगळ्याच कार्बन अणुच रुपांतर हे हिऱ्या मध्ये झालेल आढळून आलं. हे तयार झालेले हिरे काही नॅनोमीटर लांबीचे होते. पण संशोधकांच्या मते नेप्च्यून आणि युरेनस वर तयार होणारे हिरे हे कित्येक मिलियन कॅरेट चे असतील. ह्या ग्रहांच्या आत आपण डोकावू शकत नसलो तरी हे हिरे ह्या ग्रहांच्या कोअर भोवती मोठ्या संखेने जमा झाले असावेत असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. ह्या ग्रहांवर असलेल वातावरण अतिशय टोकाचं आहे. सूर्यापासून लांब असल्याने येथील वरचं वातावरण शून्याच्या खाली शेकडो डिग्री आहे तर कोअर मध्ये हजारो डिग्री आहे. हा तापमानातील फरक आणि प्रचंड दाब ह्यामुळे हायड्रोजन आणि कार्बन ह्यांच्या संयोगातून हिऱ्यांची निर्मिती होत असावी.

शास्त्रज्ञांच मत असं आहे की ह्या संशोधनाची व्याप्ती खूप मोठी आहे. जरी आपण त्या ग्रहावर जाऊ शकलो नाही तरी अश्या पद्धतीने हिऱ्यांची निर्मिती करणे शक्य आहे, हे ही नसे थोडके. हिरा खरे तर एक कार्बन चा भाग पण अनेकांच्या गळ्यातला ताईत आणि कित्येक वर्ष माणसाला आकर्षित करत राहिला आहे. “हिरा है सदा के लिये” असं म्हणत आपण त्याची स्वप्न बघतो. हिऱ्यांचा पाउस खरे तर स्वप्नवत गोष्ट पण ती प्रत्यक्षात आपल्या सौरमालेत घडते हा शोध नक्कीच एक सुखद धक्का देणारा आहे.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!