पुण्यातल्या लक्ष्मीरोडवरची “आबाची थाळी”

सहज नजरेत भरेल अश्या नवीन जागी (अर्थात पुण्यातल्या सु-प्रसिद्ध लक्ष्मी रोडवर) आणि विशेषतः थाळी सिस्टीम मध्ये सुरु झाल्यामुळे (अर्थात खिशाला परवडणाऱ्या किमतीत) काही दिवसांपूर्वी घरी परतताना हे ठिकाण हेरून ठेवले होते.
शनिवार संध्याकाळ जुळून आली. आणि कित्येक दिवस प्रतीक्षा यादीत असलेल्या आबाच्या थाळीची मनसोक्त लज्जत चाखता आली. ती सुद्धा खिशाला एकदम परवडेल अश्या किमतीत… हो म्हणजे चिकन थाळी फक्त १८० रुपयात !!
व्व्वा व्वा !! क्या बात मजा आला.. !!

धनगरी चिकन थाळी
धनगरी चिकन थाळी मागवली होती.
पुरेशी तिखट, पुरेश्या प्रमाणात तेल. नीट भाजलेल्या चपात्या, व्यवस्थित शिजलेलं चिकन, तांबडा-पांढरा रस्सा तर, आहाहाहा !!! लाजवाब !!!! आणि दह्यात मिक्स केलेला कांदा.
एकूण जिभेवर रेंगाळणारी चव. !!! जरूर आस्वाद घ्या!
माझ्या अल्पस्वल्प माती प्रमाणे चिकन थाळी असेल तर दोन धोके मी नेहमी खाल्ले आहेत. एक म्हणजे चिकन शिळं-वातड असणं, आणि दुसरं म्हणजे उकडून ठेवलेलं चिकन मसाल्यात मिक्स करून देणं, (त्यामुळे मसाल्याची चव वेगळी आणि चिकनच्या पिसेसची वेगळी अशी विचित्र चव तयार होते.)
माझ्या समजुती प्रमाणे असे उद्योग अनेक ठिकाणी केले जात असावेत.
म्हणून जरा साशंक मानाने थाळी मागवली. थाळी टेबलवर येताक्षणी धनगरी चिकनने भरलेल्या छोट्या डिशवर दरवळणाऱ्या सुगंधाने दिल खुश केलं. आणि पहिली खात्री पटली की अगदीच काही अंदाज चुकलेला नाहीये..
चिकनचे अस्सल घरगुती प्रकार खाल्लेले असल्यामुळे हॉटेलमध्ये चिकन खाण्याची वेळ आली की साधारण माझी एक भुवई वर चढते.. तर ते असो.
मी फारसा फुडी, फूड फ्रिक वगैरे नाही. पण रसिक आणि आस्वादक आहे. त्यामुळे मला नेहमीच समोर आलेली थाळी प्रेक्षणीय असावी असा आग्रह वाटत राहतो. आणि या कसोटीवर आबाच्या थाळीने बाजी जिंकली!!
खडा मसाला घालून छान शिवलेल्या सुक्क्या धनगरी चिकनला नेमका मातकट लाल थोडक्यात मला अपेक्षित असा रंग चढलेला होता. टेस्ट साठी म्हणून जेमतेम अर्धी वाटी तांबडा आणि पांढरा ठेवण्यात आला.
(सुरवातीला नाराज झालो पण लगेचच वेटर रस्सा घेऊन हजर झाल्यामुळे स्वारी खुश झाली. कारण साधरण एक दोन वाट्या रस्सा ओरपल्या शिवाय अस्मादिकांच्या घशाला शांती मिळत नाही.)
शेजारी दहीमिक्स कांदा ! आणि कौतुक म्हणजे नीट भाजलेल्या पुरेश्या जाड आणि नेमक्या आकाराच्या छान दोन पोळ्या.
आता पाळी भाताची होती!!
तव्यावर परतलेला कांदा शिवरून फोडणीच्या भातासारखा पदार्थ समोर आला. तो मात्र काही फारसा रुचकर नाही लागला (fried riceसारखा प्रकार ) हा एक किरकोळ हिरमोड सोडता बाकी थाळी उत्तम!
एवढं छान जेवण झाल्यानंतर एक माफक अपेक्षा होती ती म्हणजे सोलकढीची. लवकरच तीही मिळेल अशी आशा…
अश्या धनगरी चिकन थाळीचा यथास्थित आनंद लुटल्या नंतर छानसं पान लाऊन जिभेवर रेंगाळणारीचव घोळवत घरी आगमन करून निद्रादेवीच्या कुशीत विसावण्या सारखे सुख नाही !!
पत्ता: ३ बेडेकर हाऊस,
लक्ष्मी रोड,
नारायण पेठ, पुणे
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या क्रमांकावर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज पाठवा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचून तोंडाला पाणी सुटलं.. Next weekend आबाची थाळी
thank you so much !!
नक्की भेट द्या.. तुम्हाला आवडेल!!