अत्याचार झालेल्या स्त्रियांना जीवनदान देणारे ‘डॉक्टर डेनिस मुकवेगे’…

जगाच्या इतिहासात सगळ्यात जास्त नरसंहार झालेल्या युद्धात ‘काँगो’ युद्धाचा समावेश होतो. जवळपास ५.४ मिलियन लोकांचा ह्यात जीव गेला आहे. ह्याला ‘आफ्रिकेचं वर्ल्ड वॉर’ असंही म्हंटलं जातं. ह्या युद्धात स्त्रीचा युद्धाचं शस्त्र म्हणून उपयोग केला गेला. इथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराचं स्वरूप इतकं मोठं होतं की ‘युनायटेड नेशन’ च्या काही अधिकाऱ्यांच्या मते काँगो हे जगात होणाऱ्या अत्याचाराचं केंद्रबिंदू होतं. अत्याचार करताना पण त्यात आपण विचार करू शकत नाही इतकी कौर्याची सीमा गाठली जायची. झाडाला बांधून सगळ्यांनी एकदा, दोनदा नव्हे तर चार पाच दिवस केलेला अत्याचार असो वा स्त्रियांच्या जननेन्द्रियांना चटके देणं ते जाळणे असो वा बंदुकीच्या गोळ्यांनी जखमी करणं असो अत्याचाराच्या घटनांमध्ये पुरुषाच्या अमानुषता गाठलेल्या कौर्याने पूर्ण जग हादरून गेलं होतं.

ह्या सर्व घटना काँगो सारख्या देशात घडत असताना पूर्ण जग मूग गिळून गप्प होतं. लढाईत स्त्रीचा शस्त्र म्हणून केलेला वापर दिसत असतानासुद्धा जगाने डोळे मिटून घेतले होते. काँगो मधल्या क्रूरतेने माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टींनाही लाज वाटेल इतकी मजल गाठली होती. काँगो मधल्या स्त्रियांना कोणीच वाली नव्हता; पण त्यांच्या ह्या अमानुष अत्याचाराला वैद्यकीय मापदंडातून, माणुसकीच्या दृष्टीकोनातून ज्यांनी वाचवलं ते म्हणजेच ज्यांना डॉक्टर काँगो म्हंटल जातं ते, अर्थात डॉक्टर ‘डेनिस मुकवेगे’.

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी काँगो युद्धात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या ५०,००० हून अधिक स्त्रियांना नुसतं वाचवलं नाही, तर त्यांना आयुष्याची एक नवीन पहाट दाखवली. डॉक्टर मुकवेगे हे इथवर थांबले नाहीत तर स्त्रियांवर होणाऱ्या ह्या अमानुष अत्याचाराला त्यांनी जागतिक पटलावर वाचा फोडली. स्त्रियांचा युद्धात शस्त्र म्हणून होणारा वापर त्यांनी युनायटेड नेशन ते इतर मार्गाने जगापुढे मांडला. हा वापर रोखण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी जगापुढे जेव्हा आपले अनुभव सांगितले तेव्हा माणूस इतक्या नीच पातळीला जाऊ शकतो हे सिद्ध झालं. डॉक्टर मुकवेगे यांनी काँगो मधील स्त्रियांवरील अत्याचार जगासमोर मांडताना म्हंटल होतं,

There used to be a lot of gorillas in there, but now they’ve been replaced by much more savage beasts.

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांचा जन्म १ मार्च १९५५ साली काँगो इथल्या ‘बुकावू’ इथे झाला. आपल्या नऊ भावंडाच्या मोठ्या कुटुंबात लहानपणीच ‘डेनिस मुकवेगे’ ह्यांनी आपल्या वडिलांकडून स्फूर्ती घेऊन डॉक्टर बनायचं ठरवलं होतं. आपल्या गावाच्या बाजूला असणाऱ्या ‘बुरांडी’ मधून त्यांनी मेडिसिन ची पदवी घेतली. पुढील पदवी त्यांनी फ्रान्स मधून गायनेकॉलॉजी मध्ये घेतली. १९९८ ला दुसरं काँगो युद्ध सुरु झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या देशाची वाट धरली. ‘बुकावू’ मध्ये परत आल्यावर स्त्रियांवर झालेले अत्याचार बघून त्यांनी तिकडे ‘पांझी हॉस्पिटल’ ची स्थापना १९९९ साली केली. दिवसाला १७ तास काम करून ते दिवसाला १० पेक्षा जास्ती शस्त्रक्रिया अशा स्त्रियांवर करत होते ,ज्या तिथल्या पुरुषांच्या क्रूरतेच्या अत्याचाराला पाशवी लैंगिक अत्याचाराला बळी पडत होत्या. ह्या अमानुष अत्याचाराची पातळी इतकी खालची होती की ह्या स्त्रिया हॉस्पिटलमध्ये येताना विवस्त्र येत असतं तर कधी कधी अक्षरशः त्यांच्या जननेन्द्रियांतून रक्ताची धार वहात असे. डॉक्टर डेनिस मुकवेगे सांगतात की एकदा तर एका ३ वर्षाच्या मुलीवर केलेले अत्याचार बघून त्याचं मन विषण्ण झालं!

पांझी हॉस्पिटल हे नावाला हॉस्पिटल होतं. खाट, जमीन, व्हरांडा जिकडे मिळेल तशी जागा पकडून शस्त्रक्रिया होत होत्या. रक्त, लघवी, पसरलेली असताना त्या अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांचा आक्रोश!! ह्या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी आपलं माणुसकीचं काम सुरु ठेवलं. ज्या ठिकाणचं वर्णन वाचून आपल्याला शब्द नकोसे वाटतील, भावना गोठ्तील त्या परिस्थितीत डॉक्टर डेनिस मुकवेगे दिवसाला १० पेक्षा जास्त अशा अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांवर शस्त्रक्रिया करत होते. समोरचं मन विषण्ण करणारं दृश्य बघून कोणता डॉक्टर शांत डोक्याने आपल्याला उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये शस्त्रक्रिया करू शकेल ह्याचा विचार करताना मी निशब्द झालो.

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर,

When the victims come, you can tell by the wounds where it happened, In Bunyakiri, they burn the women’s bottoms. In Fizi-Baraka, they are shot in the genitals. In Shabunda, it’s bayonets.

Some of these girls whose insides have been destroyed are so young that they don’t understand what happened to them. Why would you ever r—- a 3-year-old?

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांच्या कामाची व्याप्ती वाढत जात होती. आजूबाजूच्या शहरातून ही ह्या अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रिया आता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये यायला लागल्या. अत्याचार करणाऱ्या लोकांना हे सहन झालं नाही. त्यांनी डॉक्टर मुकवेगे ह्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या मुलीला बंधक बनवून त्यांनी डॉक्टर मुकवेगे ह्यांच्यावर गोळी झाडली. जमिनीवर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यानंतर त्यांनी काही काळासाठी युरोप मध्ये आश्रय घेतला. पण ह्या सगळ्याचा परिणाम पांझी इथल्या हॉस्पिटल वर झाला. तिथल्या स्त्रियांना कोणी वाली उरला नाही. पण बुकावू इथल्या स्त्रियांनी एकत्र येऊन त्यांना परत येण्यासाठी साद घातली. सगळ्या स्त्रियांनी अननस आणि कांदे विकून त्या पैशातून त्यांच्या तिकिटाचा खर्च उचलला.

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरवात केली. आता फक्त उपचारांवर न थांबता त्यांनी ह्या अन्यायाला आंतरराष्ट्रीय मंचावर वाचा फोडली. त्यांच्या ह्या माणुसकीच्या कार्याची दखल आंतराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. २००८ ला त्यांना ‘यु.एन. ह्युमन राईट्स’ तर २००९ मध्ये आफ्रिकन ऑफ दी इअर ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. २०१६ ला ‘टाईम’ अंकाने जगातील सगळ्यात प्रभावशाली पहिल्या १०० व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला. तर २०१८ साली त्यांना सर्वोच्च मानाच्या नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आलं. २०१८ ला नोबेल शांती पुरस्काराची घोषणा झाली तेव्हा पण ते एका शस्त्रक्रियेत व्यस्त होते. त्यांच्या पांझी हॉस्पिटल मधून आजवर ८२,००० पेक्षा जास्त स्त्रियांवर उपचार केले गेले आहेत.

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी ज्या परिस्थितीत स्त्रियांवर उपचार केले आहेत त्याचा विचारदेखील आपण करू शकत नाही. उपचार करणं इतकं भयावह असेल तर त्या स्त्रियांना ज्या अमानुषतेला बळी पडावं लागलं असेल ते शब्दांपलीकडचं आहे. त्याचं कार्य वाचताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी अशी अवस्था होते; तर ज्यांनी ते भोगलं असेल त्या स्त्रियांच्या त्रासाची कल्पनाही करवत नाही. युद्धात बंदुकीतल्या गोळ्यांना पण पैसे लागतात, पण स्त्री ही फुकट असते ह्या पद्धतीने काँगोच्या युद्धात स्त्री चा वापर केला गेला. आज डॉक्टर मुकवेगे सारखे लोक तिकडे नसते तर ह्यात मृत्युमुखी पडलेल्या स्त्रियांची संख्या कैक पटीने वाढली तर असतीच पण हा अमानुष अत्याचार त्या देशात लपून राहिला असता. कोणतीही अपेक्षा न करता लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांना माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत करून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या ‘डॉक्टर काँगो’ अर्थात डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांना माझा साष्टांग नमस्कार!!!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय