या लेखात वाचा तारण कर्ज घेण्याबद्दलची पूर्ण माहिती सोप्या भाषेत

तारण कर्ज हे सुरक्षित कर्ज असून ते बँक, बिगर बँकिंग संस्था, सहकारी संस्था, सावकार यांच्याकडून व्यक्ती अथवा संस्था यांना देण्यात येते. सहसा हे कर्ज जमीन, घर खरेदी करण्यासाठी कमी पडणाऱ्या पैशांची पूर्तता करण्यासाठी घेतले जाते. कर्ज घेणाऱ्याची मालमत्ता गहाण ठेवलेली असल्याने ते सुरक्षित असते. कर्जदार कराराने बांधला गेल्याने ठराविक मुदतीत ठरलेली रक्कम मुद्दल त्यावरील व्याजासह समान मासिक हप्त्यात (Equated monthly installments) देण्याचे बंधन कर्जदारावर असते. या मुदतीत कर्ज फेडले तर तारण ठेवलेल्या मालमत्तेची पूर्ण मालकी कर्जदाराकडे पुन्हा येते आणि यापुढे तिचे काहीही करण्याचे अधिकार मूळ मालकास परत प्राप्त होतात. तारण कर्ज हे मालमत्ता कर्ज, गहाण कर्ज या नावानेही ओळखले जाते. जर कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर कर्ज देणाऱ्यास तीची विक्री करून आपले पैसे परत मिळवण्याचा हक्क प्राप्त होतो. तारण कर्जावर मुद्दल (Principal), व्याज (Intrest), कर आणि विमा (Taxes and Insurance) या गोष्टीं प्रभाव पाडतात.

यातील तीन महत्त्वाच्या बाबी

मुद्दल: कर्जदाराने मालमत्ता तारण ठेवून घेतलेली रक्कम.

व्याज: हे कर्ज दिल्याबद्दल कर्ज देणाऱ्यास मिळालेला आर्थिक मोबदला. यावर प्रभाव पाडणारा महत्वाचा भाग म्हणजे व्याजदर होय.

कर आणि विमा: कर्ज घेणाऱ्यास यामुळे आयकरात सूट मिळू शकते तर त्याने संपादित केलेल्या मालमत्तेवर विविध कर द्यावे लागतात. त्याचप्रमाणे तारण मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी आणि कर्जफेडीसाठी स्वताचा विमा घ्यावा लागतो. यासर्वांच्या एकत्रितपणे होणाऱ्या परिणामांचा आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या आर्थिक तरतुदींचा कर्ज घेतांना अवश्य विचार करावा. त्यामुळे परतफेड सुलभ होते.

तारण कर्ज फेडण्यासाठी जे व्याज द्यावे लागते ते पूर्ण कालावधीसाठी एकसमान दराने (Fixed rate) द्यायचे की बदलत्या दराने (Adjustable rate) याची निवड कर्जदारास करता येते. बाजारातील कर्जाची मागणी आणि उपलब्ध कर्ज पुरवठा यावर व्याजदर निश्चित केले जात असून ते वेळोवेळी बदलत असतात. जर दीर्घकाळात व्याजदर वाढण्याची शक्यता असल्यास स्थिरदराने कर्ज घेणे फायद्याचे होते. व्याजदर कमी होत असतील तर बदलत्या दराने कर्ज घेणे अधिक फायदेशीर होते. यात कर्जदर जरी कमी / जास्त झाला तरी कर्जदाराच्या मासिक हप्त्यावर काही काही परिणाम होत नाही तर त्यांची संख्या कमी / जास्त होते. व्याजदर सतत बदलत असल्याने बहुदा दिर्घ कालावधीसाठी कर्ज घेताना अनेकजण बदलत्या व्याजदाराचा पर्याय निवडतात. मात्र व्याजदर वाढले की वित्तसंस्था ज्या तत्परतेने ते वाढवतात, त्यामानाने ते कमी झाल्यास त्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यात टाळाटाळ करतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे.

या दोन पद्धतींशीवाय अल्प प्रमाणात, कर्जावर फक्त व्याज (Intrest Only) आकारणी करायची या अटीवर देखील असे कर्ज दिले जाते. या पद्धतीत दरमहा फक्त व्याज घेतले जाते त्यामुळे मुद्दल रक्कम तीच रहाते. मुदत संपल्यावर कर्जदार एकरकमी मुद्दल रकमेची परतफेड करतो.

जरी हे कर्ज एकसमान हप्त्यात दरमहा द्यायचे असले तरी सुरुवातीच्या काळात मुद्दल जास्त असल्याने त्यावरील व्याज जास्त असते त्यामुळे यात व्याजाचा भाग जास्त आणि मुद्दलाचा भाग कमी असतो. जसजशी वर्षे वाढतात तशी व्याजाची रक्कम कमीकमी होऊन मुद्दलाची रक्कम वाढत जाते. जेव्हा मुद्दल संपून जाते त्यावेळी कर्ज पूर्णपणे फिटते.

मालमत्तेच्या सतत वाढत असलेल्या किमतींचा विचार करता कर्जाशिवाय मालमत्तेची खरेदी करणे बहुतेकजणांना अशक्य असते. हे हमीकर्ज असल्याने इतर कर्जाच्या तुलनेत सहज आणि कमी व्याजदराने उपलब्ध होते. तारण कर्जाची मागणी करणाऱ्याची पात्रता निश्चय करण्याचे प्रत्येक संस्थेचे निकष वेगवेगळे असले तरी काही सर्वसाधारण गोष्टींचा निश्चित विचार करण्यात येतो उदा.

व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न, ती पगारदार आहे की व्यावसायिक? हाती येणाऱ्या मासिक प्राप्तीच्या ६० पट रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. वय किमान २१ कमाल ६० याहून जास्त वयाच्या व्यक्तींना काही संस्था इतर गोष्टी विचारात घेऊन अधिक जोखीम स्वीकारून कर्ज देतात.

तारण मालमत्तेची बाजारातील किंमत (Market value). या किमतीच्या ८० % रक्कम तारणकर्ज मिळू शकते.

कर्ज फेडण्याची क्षमता यात व्यक्तीचा कर्ज इतिहास (Credit scores), त्यावर अवलंबित व्यक्ती, जबाबदाऱ्या यासारख्या गोष्टी विचारात घेतल्या जातात.

हे कर्ज मिळवण्यासाठी, रीतसर अर्ज, फोटो, ओळखीचा पुरावा, तारण मालमत्तेची कायदेशीर कागदपत्रे, उत्पन्नाचा पुरावा, अलीकडच्या ६ महिन्यांचा बँक खातेउतारा (Bank Statement) यासारख्या गोष्टी सादर कराव्या लागतात. याशिवाय काही रक्कम प्रक्रिया शुल्क (Processing Fees) म्हणून द्यावे लागते. बँकेकडून याची छाननी केली जाते. क्रेडिट स्कोर तपासला जातो. मालमत्तेचे मूल्यांकन (Valuations) केले जाते आणि त्यावर आलेल्या शिफारशींचा विचार करून कर्ज मंजुरी पत्र (Sanction letter) दिले जाते. त्यातील कायदेशीर अटींची पूर्तता केली की बँक कर्जदाराच्यावतीने त्याला मंजूर केलेली कर्जरक्कम एकरकमी अथवा ठराविक कालावधीत ज्याने मालमत्ता विकली, त्याच्या नावाने किंवा परस्पर त्याला देते.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप किंवाटेलिग्रामवर मिळवण्यासाठी८३०८२४७४८०या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप / टेलिग्राम मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय