जाणून घेऊ नाणेबाजार (Money Market ) बद्दल

वित्तीय बाजाराचे नाणेबाजार, भांडवल बाजार आणि विदेशी चलन बाजार हे महत्वाचे घटक आहेत. यांपैकी नाणेबाजार या घटकाची माहिती करून घेवूयात.

Structure Of Money Market
Structure Of Indian Money Market

सामन्यतः बाजार म्हटले की वस्तुची देवाण घेवाण होत असणारे मंडई सारखे ठिकाण डोळ्यासमोर येते. अर्थशास्त्राच्या दृष्टीने बाजार म्हणजे वस्तु आणि सेवा यांची देवाणघेवाण, यासाठी विशिष्ठ ठिकाण हवेच असे नाही. नाणेबाजार (Money Market) या शब्दावरून नाणे किंवा चलन यांची देवाण घेवाण होत असेल असे वाटणे साहजिकच आहे परंतु नाणेबाजारात प्रत्यक्ष चलनांची देवाण घेवाण होत नाही तर भांडवलाची देवाण घेवाण अल्प मुदतीच्या कर्जाच्या रूपात होते. अशा प्रकारच्या कर्जाची मुदत एक दिवस ते बारा महीने या कालावधीची असू शकते. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे ते आपल्याकडील पैसा ज्यांना पैशांची गरज आहे त्या॑ना अल्प मुदतीसाठी कर्ज म्हणून देवू करतात या बदल्यात कर्जदार व्याज देतात. यामुळे पैसे असणाऱ्यांना व्याज मिळते तर कर्जदाराची गरज भागते. शेतकरी, छोटे व्यापारी, लघुउद्योजक यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी पैशांची गरज लागते ही गरज नाणेबाजारातून भागवली जाते.

शेती ,उद्योग व सेवाक्षेत्र यामधे मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे त्यांची अल्पकालीन कर्जाची गरज सतत वाढतच आहे. आपल्या प्रमाणे सरकारला अल्पकालीन खर्च भागवण्यासाठी कर्जाची आवश्यकता पडते. हा खर्च भागवण्यासाठी सरकार रिझर्व बँकेला पैसे छापण्यास सांगू शकते परंतु त्यामुळे चलनवाढ होऊ शकते. त्यामुळे सरकार नाणे बाजारातून तात्पुरते कर्ज उचलते. व्यापारी / सहकारी बँका लोकांकडून ठेवी स्वीकारतात. बचत खात्यात पैसे ठेवून घेतात. यावर व्याज द्यावे लागते. त्याचप्रमाणे हे पैसे ठेवीदारांना त्यांच्या मागणीनुसार द्यावे लागतात त्यामुळे बँका अशी रक्कम जास्त कालावधीसाठी वापरू शकत नाहीत हे पैसे गुंतवण्याची गरज नाणे बाजारातून भागवली जाते. तसेच ठेवीदारांना पैसे परत करण्यास बँकेकडे नसतील तर त्यासाठी तात्पुरती सोय म्हणून नाणेबाजारातून कर्जे घेता येऊ शकतात. अशा प्रकारे गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्ति आणि संस्था यांना हमखास सुरक्षित फायदा मिळवून देण्याची संधी यामधून उपलब्ध होते. पतनियंत्रण करणे म्हणजेच गरजेपेक्षा जास्त अथवा कमी म्हणजेच पैश्यांचा समतोल साधने हे मध्यवर्ती बँकेचे महत्वाचे कार्य असून त्याकरिता वेगवेगळ्या पतपत्रांची निर्मिती तिच्याकडून केली जाते. वेगवेगळ्या पतपत्रांच्या निर्मीतीमुळे त्यांचे व्यवहार करणारे वेगवेगळे उपबाजार उदाहरणार्थ मागणी देय बाजार (Call Money Market ), बील /हूंडी बाजार (Bill Market), सरकारी अल्पमुदत कर्जरोखे (Tressary Bills ), तारण बाजार (Collataral Market) निर्माण झाले असून यांचे व्यवहार करण्यासाठी विविध स्वीकृतगृहे आणि वटवणूकगृहे यासारखी विशेष केंद्रे निर्माण झाली आहेत.

विकसित देशांपेक्षा इथला नाणेबाजार हा संघटित व असंघटित क्षेत्रात विभागला गेला आहे. संघटित क्षेत्रात रिझर्व बँक ,व्यापारी बँका ,खासगी बँका ,सहकारी बँका ,विनिमय बँका यांचा समावेश होतो यावर रिझर्व बँकेचे नियंत्रण असून तिच्याकडे चलन निर्मीतीची मक्तेदारी आहे. नाणेबाजारास प्रोत्साहन देण्याचे काम रिझर्व बँकेचेकडून केले जाते. सराफी पेढ्या आणि बँकेतर मध्यस्थ निधी, चिटफंड हे असंघटित क्षेत्रांत कार्यरत आहेत.

भारतीय नाणेबाजारात असंघटित क्षेत्रांचे अस्तित्व, एकसूत्रतेचा अभाव, व्याजदरांमधील विविधता यासारख्या उणिवा आहेत. त्या दूर करण्यासाठी रिजर्व बँकेने व्याजदर निर्बंध शिथिल करणे, विविध कोशागार पत्रांची निर्मीती, नवीन पतसाधने आणि नवीन संस्थांचा सहभाग, नाणेबाजार परस्पर निधीची स्थापना (Money Market Mutual Fund ), कर्ज पुर्नखरेदी (Repo), यासारख्या अनेक सुधारणा केल्या आहेत.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय