माझ्या भारत देशाच्या अशा किती सैनिकांचा बळी स्वस्तात जाणार आहे ?

सैनिकांचा बळी

कमालीचा अवास्तव संयम आणि मवाळ सशाच्या काळजागत दयाळू वृत्तीच्या देशात आपला जन्म झालाय. गझनीच्या महम्मदाने केलेल्या १७ स्वाऱ्या, डच-पोर्तुगालांनी केलेलं आक्रमण, पुढे १५० वर्षे ईंग्रजांनी केलेला कब्जा… हे सगळं आपल्या कमजोर मानसिकतेचं लक्षण.

ज्या देशाचे २ पंतप्रधान मारले जातात, ज्या देशात पाकिस्तान झिंदाबाद चे नारे लागतात, जिथे वंदे मातरम् म्हणायला सांगावं लागतं. त्या भारत देशात जन्मलोय आपण.. तिकडे उत्तरकोरिया सारख्या छोट्या राष्ट्राच्या कीम जोंग नामक हुकुमशहाने बलाढ्य अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पच्या नाकी नऊ आणले आणि ईकडे आपण चतकोर पाकिस्तानचे लाड करीत बसलोय. सारं जग पहातय, काही आतंकवादी आपल्याला कसे खेळवताहेत ते.. काय संदेश जात असेल आपला जगात?

आपल्या ईथे फक्त आणि फक्त राजकारण चालतं.. राजकारणाच्या भट्टीवर देश भाजून निघतोय. लाखोंच्या संख्येने रोहींग्यांचा लोंढा घुसलाय घरात पण यावरही राजकारण करून देश दावणीला बांधलाय. तिकडे जवान सीमेवर जीवाची बाजी लावत असताना, आम्ही आमच्या पिढ्या समृद्ध करण्यासाठी झगडत आहोत कारण आमची नजर भारतमातेच्या कपाळावर गेलीच नाहि.. त्या जखमेला आम्ही आजवर कुंकू समजत होतो.

उंदरांच्या शिकारीवर जेव्हा आपले वाघ बळी जातात ना तेव्हा वाटते चुलीत घालावा हा संयम आणि फुकाची उदारता… क्षणात संपावा पाकिस्तान आणि त्या घुसखोर आतंकी घुशी… पण काय करणार आपण अशा देशात रहातोय जिथे संयम दुथडी भरुन वाहतो.. दिवसां मागून दिवस जातील, क्षणिक देशप्रेम उफाळून येईल पण या प्रश्नाचं उत्तर कधी मिळेल…

महासत्ता होऊ पाहणाऱ्या माझ्या भारत देशाच्या अशा किती सैनिकांचा बळी स्वस्तात जाणार आहे ?

शहीदांच्या चीते वरील राखही तैसीच असेल अजून आणि लोकं रमलीत आपापल्या पक्षांची दुकानं चालवण्यात. प्रचाराची रणधुमाळी सुरू झालीय.. ईथे सत्तेची गादी खुणावतेय आणि शेजारी रचतोय चिता आपल्या कोवळ्या पोरांची… खूपदा वाटतं, आपण सईद हाफीज आणि मसूद अझहर ला घुसून मारावं पण साला तो काळजावर घाव घालणारा थेरडा दाऊद आम्हाला अजून सापडेना तर ही कुत्री कशी सापडणार?


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप किंवा टेलिग्राम वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप / टेलिग्राम मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!