या लेखात वाचा स्टीव्ह जॉब्ज ला जगावेगळं बनवणाऱ्या सात सवयी! (प्रेरणादायी कहाणी)

स्टीव्ह जॉब्ज

एप्पल ह्या नावाला एक वलय प्राप्त आहे, ती कंपनी जगातली नंबर एकची कंपनी आहे.

त्यांचं एखादं नवं उपकरण आलं की जगभर आदल्या रात्रीपासुन लोक त्यांच्या आऊटलेट समोर रांगा लावतात.

ह्या प्रचंड यशाचं एक कारण आहे, एप्पलचा संस्थापक, स्टीव्ह जॉब्ज!

एका कॉलेज ड्रॉपआउट मुलापासुन गॅझेटसचा जागतिक सम्राट असा हया अवलियाचा प्रवास थक्क करणारा आहे.

अशातच मी त्याचं आत्मचरित्र वाचलं, मृत्युची चाहुल लागताच, मरण्याआधी थोडे दिवस, आपल्या पत्नीजवळ, त्याने आपलं आत्मचरित्र लिहले जावे अशी इच्छा व्यक्त केली होती.

जगातल्या उत्कृष्ट पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे हे!

स्टीव्ह जॉब्जच्या आयुष्यात सात सवयींनी त्याला जबरदस्त यशस्वी बनवलं, असं म्हणता येईल.

अशा कोणत्या होत्या त्याच्या सात जादुई सवयी?

१) ‘स्पेशल’ बना.

स्टीव्ह जॉब्ज हे एका विवाह न केलेल्या जोडप्याचं मुल होतं.

त्याला अनाथआश्रमातुन दत्तक घेतलं गेलं होतं. जॉना आणि जॉन जेंडाली एकमेकांवर प्रेम करायचे पण जॉना ख्रिश्चन होती, जॉन जेंडाली मुस्लिम होता, जॉना प्रेग्नंट राहीली तेव्हा जॉनजेंडाली ने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.

पुढे स्टीव्हला एका जोडप्याने दत्तक घेतलं, स्टीव्हच्या वयाच्या सातव्या वर्षी गल्लीतल्या मुलीने त्याला चिडवले की तो दत्तक आहे, स्टीव्हने त्याच्या आईवडीलांना अर्थ विचारला. तेव्हा स्टीव्हच्या आईवडीलांनी त्याला खरे खरे सांगितले आणि म्हणाले.

“तु साधारण मुलगा नाहीस, तु खुप ‘स्पेशल मुलगा’ आहेस, तुझे आयुष्य ‘असाधारण’ असणार आहे.”

त्यांचे हे वाक्य स्टीव्हच्या मनात आयुष्यभरासाठी कोरले गेले, त्याने स्वतःला कधीच साधारण मानले नाही, तो स्वतःला ‘स्पेशल’ मानायचा.

आपण प्रत्येक जण ‘स्पेशल’ असतो, पण आपण ते विसरुन जातो, आणि स्वतःला साधारण माणुस मानुन जगु लागतो.

प्रत्येक क्षणी आपणही लक्षात ठेवले की आपणही स्पेशल आहोत, तर आपणही महान लोकांच्या श्रेणीत जाऊन बसु शकतो.

कामाच्या बाबतीत त्यांना कसलीच हयगय चालायची नाही, गाडीचे आतले स्पेअरपार्ट सुद्धा, सुंदर देखणे असावेत, अस्ताव्यस्त नसावेत, असा त्यांचा आग्रह असायचा.

स्टीव्हची जडण घडण सुद्धा अशीच झाली. कामात ‘परफेक्शन’ आणा, म्हणुन, स्टीव्ह जोब्ज आपल्या टेक्नीकल टिमवर सतत रागवत असायचा.

जगातला पहिला पर्सनल कॉम्प्युटर ‘मॅकिंटोश’ बनवताना, कॉम्पुटरच्या आतल्या भागात असणाऱ्या, सर्किटची मांडणी थोडीशीही अस्ताव्यस्त त्याला चालायची नाही. ती नेटनेटकी, दिसायला सुरेख असावी, असा त्याचा आग्रह असायचा. त्याच्या असल्या वेडेपणाला कंटाळुन कित्येक हुशार हुशार माणसं त्याला सोडुन गेली.

एकदा त्याचा एक सहकारी त्याला विचारतो, “स्टीव्ह, हा कॉम्पूटर फक्त आपल्या सर्विस सेंटर मध्येच उघडला जाईल ना?!

ग्राहकाला कधीही माहीत होणार नाही की आतमधली डिझाईन किती सुंदर आहे तेव्हा असा वेडा हट्ट का?”

“खरयं तुझं! कदाचित त्याला कधीच माहीत नाही होणार, पण मला ते नेहमी माहीत असणार आहे,”

“ज्यावेळी मी जगाला ओरडुन सांगेन, माझं हे प्रॉडक्ट जगातलं बेस्ट आहे, तेव्हा माझ्या आवाजात वजन असेल.”

स्टिव्ह जॉब्जच्या अशा अफलातून तर्कांपुढे अनेकदा सगळे निरुत्तर व्हायचे.

३) प्रेरणा घ्या.

स्टीव्हच्या तरुणवयात त्याला आर्किटेक्ट ‘जोसेफ इचलर’ खुप आवडायचा.

कारण जोसेफ साधारण लोकांसाठी सुंदर सुंदर, टुमदार, देखणी घरं तयार करायचा, स्टीव्हने त्याला आपलं प्रेरणास्थान मानलं होतं.

साधारण लोकांसाठी जीवनौपयोगी ठरली अशी गॅझेटस, कॉम्पुटर, फोन, टॅबस बनवायची आयडीया त्याला तिथुनच मिळाली.

असंच स्टीव्हचं अजुन एक आवडतं व्यक्तिमत्व होतं, ‘रॉबर्ट फ्रेडलॅंड’! त्यांचा रुबाब, त्यांची श्रीमंती, वागणं, बोलणं, व्यक्तिमत्व सारंकाही स्टीव्हला भुरळ घालायचं.

आपल्या आत्मचरित्रात स्टीव्ह मनमोकळेपणे मान्य करतो की त्याने रॉबर्टकडुन कित्येक गोष्टी शिकल्या, यशस्वी व्यक्तिमत्व बनण्याचे धडे घेतले.

आपल्या आजुबाजुला अशा कित्येक यशस्वी व्यक्ती असतात, आपणही अशा माणसांच्या सहवासात येण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा!,

त्यांच्याकडुन प्रेरणा घेत राहीली पाहीजे, आयुष्यभर त्यांच्याकडुन शिकत राहिले पाहीजे.

मी अधुनमधुन अशा सक्सेसफुल व्यक्तिंवरचे पुस्तकं वाचतो, लेख लिहतो, त्याचं कारण प्रेरणा मिळवणं, हेच आहे.

४) चांगले आर्टिस्ट कॉपी करतात, महान आर्टिस्ट चोरी करतात.

खरंतर एंशीच्या दशाकाच्या आधी, कॉम्पुटर फारच बोजड आणि वापरायला किचकट होता, जगामध्ये सर्वप्रथम झेरॉक्स कंपनीने कॉम्पुटरची प्रणाली इंटरफेस देऊन आकर्षक आणि सुलभ केली होती.

झेरॉक्सचा कॉम्पुटर पाहुन स्टीव्ह आनंदाने अक्षरशः वेडापिसा झाला होता.

जणु काही झेरॉक्सपेक्षा जास्त आनंद त्यालाच झाला होता. कॉम्पुटरचा वापर, आणि येणारं भविष्य त्याने ओळखलं होतं.

त्याने झेरॉक्सला एप्पलचे लाखो शेअर्स देऊ केले व हे तंत्रज्ञान जाणुन घेतलं, झेरॉक्सने आनंदाने हा प्रस्ताव स्वीकारला, पण त्याचं तंत्रज्ञान वापरुन स्टीव्हने मार्केटमध्ये धुमाकुळ घातला. झेरॉक्स बघतच राहीली आणि कधीही एप्पलची बरोबरी करु शकला नाही.

५) कल्पनांच्या जगात जगणं!

स्टीव्ह जॉब्ज नावाचा प्राणी थोडासा मेंटल होता, त्याने स्वतःभवती एक स्वतःच्या कल्पनांचं जग बनवलं होतं.

वास्तविकतेच्या मर्यादांना त्याने कधीच, खरं मानलं नाही, कॅंसर झालेला असतानाही तो कधीच मरणाच्या भीतीने वावरला नाही, तो म्हणायचा, मी अजुन काही दशके जगणार आहे.

रागाच्या भरात त्याने दाखवायला आणलेले गॅझेट्स आपल्या एक्वेरियम मध्ये फेकुन दिले, आणि इंजिनीअर्सना पुन्हा नव्याने काम करायला सांगितले.

मरताना देखील स्टीव्ह जॉब्ज डिझाईनबद्द्ल किती चोखंदळ होता, ह्याचं एक उदाहरण आहे. अखेरच्या दिवसात त्याचं ऑपरेशन होणार होतं, तेव्हा ऑक्सीजन देण्यासाठी डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्यावर मास्क लावलं, तेव्हा स्टीव्ह जॉब्जने ते काढुन टाकलं,

कारण विचारल्यावर त्याने सांगीतलं, मला हे डिझाईन आवडलेलं नाही, दुसरा मास्क आणा, धावपळ करुन सात डिझाईनचे मास्क दाखवण्यात आले, आणि महत्प्रयासाने त्याने एक डिझाईन सिलेक्ट केला, आणि डॉक्टरांचा जीव भांड्यात पडला.

अशी वेडी माणसंच जगापेक्षा वेगळं काहीतरी काम करुन जगावर छाप सोडुन जातात.

६) आजुबाजुचे वातावरण

स्टीव्ह जॉब्ज जिथे वाढला, घडला, ते ठिकाण होतं, सिलिकॉन व्हॅली! तिथे अनेक स्टार्टअप होते.

लहानपणापासुन स्टीव्हने अनेक भव्य दिव्य उपकरणे बनवणाऱ्या कंपन्या पाहील्या अणि त्याला स्वतःही काहीतरी बनण्याची, जगप्रसिद्ध बनण्याची तीव्र इच्छा आपोआपच निर्माण झाली.

त्याच्या घराजवळ एक नासाचं रिसर्च सेंटर सुद्धा होते, अशा वातावरणाचा सकारात्मक परिणाम होतो.

लॅरी पेज जो एच. पी. कंपनीमध्ये काम करायचा, त्याने स्टीव्हला विश्वास दिला की तो ते प्रत्येक उपकरण बनवु शकतो, जे त्याला बनवायचे आहे.

आपणही अशा सर्जनशील, क्रिएटीव्ह आणि प्रोत्साहन देणाऱ्या लोकांशी अधिकाधिक मैत्री केली पाहीजे.

७) भविष्यवेत्ते बना.

काळाची गरज ओळखणारे, आणि त्याप्रमाणे आपल्या सेवा देणारे, जगावर राज्य करतात. स्टीव्ह जॉब्ज आपल्या स्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे होता.

आपल्या व्यवसायाचं भविष्य काय असेल, ह्यावर आपण विचार केला आहे का?

स्टीव्ह जॉब्जच्या ह्या विशेष सात सवयी आपणही आपल्या अंगी बाणवाव्यात आणि आपणही त्याच्यासारखं अनोखं जीवन जगावं.

अशा मनःपुर्वक शुभेच्छा!

धन्यवाद!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Shubham Kumbhar says:

    खूप खूप छान वाटले हा लेख वाचून… आपणही Steve jobs सरांसारखे नक्कीच वागू व त्यांच्या सवयी आत्मसात करून आपणही जगावेगळे वेडे बनावे असे वाटते… मस्तच असेच लेख पुन्हा वाचायला मला आवडतील…. लेखकांना त्यांच्या पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!