नाशिकमध्ये अस्सल सी-फूड म्हणजे “सुग्रास”

कामासाठी आज सातपूर MIDC च्या भागात आले होते. असा औद्योगिक परिसर खवय्येगिरीसाठी काहीसा अरसिकच वाटतो आपल्याला…

कामासाठी आपण येथे आलो आणि सपाटून भूक लागली की एवढेच माहित असते की एखादा वडापाव, सॅन्डविच आणि चहा घ्यावा आणि पुढच्या कामाला लागावे. इथे आपल्या जिभेचे चोचले पुरवणारे काहीतरी भन्नाट खायला मिळेल अशी काही आशाच नसते आपली.

Pomfret Fry
Pomfret Fry

पण असेच बोलता बोलता कळले कि येथेच EPCOS TDK च्या थोडसं पुढे गेलं की एक साधंसं पण खूपच नीटनेटकं आणि जेवणासाठी छान ठिकाण “सुग्रास” आहे. म्हणून पत्ता शोधत असताना रस्त्यात उभ्या असलेल्या एका ग्रुपला EPCOS TDK चा लँडमार्क ठेऊन रास्ता विचारला तर त्यांनी “सुग्रास” ला लँडमार्क म्हणून सांगत EPCOS चा रस्ता सांगितला?

आणि अगदी सहजच हवं ते ठिकाण सापडलं. इथे चमकधमक असलेले वातावरण नाहीये… साधेसे ग्रॅनाइटचे टेबल, खुर्च्या पण अगदी उत्तम स्वच्छता आणि शांत वातावरण. “सुग्रास” ओळखले जाते ते मुख्यतः सीफूड साठी. इथली खासियत म्हणजे घरातल्या गृहिणीच्या देखरेखीखाली बनणारे सुग्रास जेवण.

special-mutton-thali
Special Mutton Thali

ट्रॅव्हल्सच्या व्यवसायातील श्री. शांताराम काळसेकर यांनी १९९० साली “अन्न हेच पूर्णब्रम्म्ह” या तत्वाने घरगुती जेवण देणाऱ्या सुग्रासची छोटीशी सुरुवात केली. त्यांच्या पत्नी सौ. विजया काळसेकर यांनी आपल्या हाताची सुगरणीची चव देऊन खवय्यांना इकडे आकर्षित केले आणि आता सुजित आणि साक्षी काळसेकर हे त्यांचे सून-मूल तितक्याच तन्मयतेने खवय्यांची आवड सांभाळतायेत.

Sugras Checken Thali
Sugras Chicken Curry

येथे चिकन/मटन/मासे उत्तम घरगुती मसाल्यात बनतात. तेलकटपणा काहीही न जाणवणारे सुग्रासचे वेगवेगळे फिश फ्राय हे कॅलरी कॉन्शस लोकांना सुद्धा चालून जात असेल हे “फ्राईड सुरमई” खाल्ल्यावर पटले.

चोखन्दळ खवय्यांना हवा तसा तिखटपणा तर इथल्या जेवणात मिळतोच पण प्रत्येक घासाला जाणवते ती खोबऱ्याच्या वाटणाची सुरेख चव. सहसा रेस्टोरंटमध्ये वापरली जाते तशी प्री-मेड ग्रेव्ही कधीही न वापरता ताजे जेवण हीच इथली खासियत! चपात्यांसाठी वापरले जाणारे गव्हाचे पीठसुद्धा रेडिमेड किंवा चक्कीतून दळून न आणता सुग्रासच्या किचनमध्ये असलेल्या घरगुती आटाचक्कीतच दळण्याचा शिरस्ता काळसेकर कुटूंबियांनी पाळला हे ही मोठं विशेष! अशा भरपोट जेवणानंतर अस्सल महाराष्ट्रीयन ड्रिंक म्हणजे “सोलकढी”.

Prawns Fry
Prawns Fry

सकाळी ९:३० ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ६:३० ते रात्री ९ पर्यंत आसपासच्या MIDC परिसरातीलच नाही तर नाशिकच्या मध्यवर्ती भागात राहणारे रसिक खवय्ये सुद्धा इथे येतात. नाशिकसारख्या हरतऱ्हेच्या रेस्टोरंन्टसने गजबजलेल्या शहरात १५०-२२० रुपये किमती दरम्यान सीफूड म्हणजे पैसे वसूल!! एक साधंसं पण पोटपूजा झाल्यांनतर “Amazing” वाटणारं “सुग्रास” ताज्या घरगुती जेवणासाठी शब्दशः लाजवाब आहे.

खवय्यांसाठी पत्ता !!

सुग्रास फूड्स & कॅन्टीन सर्विसेस,
Epcos TDK च्या पुढे,
ऋषिरूप मार्ग, MIDC,
सातपूर, नाशिक,
महाराष्ट्र- ४२२००७
फोन- ०२५३ २३५४९१२

सुटीचा दिवस- सोमवार

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

4 thoughts on “नाशिकमध्ये अस्सल सी-फूड म्हणजे “सुग्रास””

  1. मी नक्कीच जाणार आहे सिफूड खायला फक्त सुग्रास मधेच

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय