टेलेपॅथी! खरंच होते का? आणि होते तर ती कशी करावी?

टेलेपॅथी खरंच होते का

मित्रांनो,

तुमच्यासोबत असं कधी होतं का की तुम्ही एखाद्या व्यक्तीची खुप आठवण काढता आणि नेमकी तीच व्यक्ती आपल्याला रस्त्यात भेटते, अवचित नजरेसमोर येते?

कधी असं होतं, की फोन बेल वाजते आणि तो फोन कुणाचा आहे, याचा आधीच एक अंदाज येतो आणि तो फोन त्याच व्यक्तीचा असतो?

ज्याच्या आपण अधिकाधिक संपर्कात असतो, त्या व्यक्तीच्या मनातल्या भावना राग, द्वेष, प्रेम आपल्याला नुसतं त्याच्या नजरेत बघुन, त्याने कितीही लपवलं तरी, न सांगता, आपोआपच कळु लागतात?

तर कधी प्रत्यक्ष न बोलता ही आपल्याला हव्या आहेत त्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला कळवता लागतात?

काय खरोखरच दुर असलेल्या व्यक्तीला केवळ मेंदुची उर्जा वापरुन संपर्क केला जावु शकतो?

हे खरचं शक्य आहे का? का ह्या भुलथापा आणि थोतांड आहे?

ह्या विषयातल्या तज्ञांनी ह्याला टेलेपॅथी असं नाव दिलं आहे.

टेले – म्हणजे दुरचे…. जसं की, टेले फोन – दुरचे ऐकणे, टेले व्हिजन – दुरचे चित्र पाहाणे,

पॅथी म्हणजे शास्त्र!

तसं टेले पॅथी म्हणजे दुर संवाद साधण्याचे शास्त्र!

लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि टेलेपॅथीचा खुप जवळचा संबंध आहे.

टेलेपॅथीचा वापर करुन आपल्या मनातला एखादा रंग किंवा आपल्या मनातली एखादी वस्तु, न बोलता, मुकपणे आपण समोरच्या व्यक्तीच्या मेंदुपर्यंत पोहचवु शकतो.

तुमच्या कल्पना आणि तुमचे विचार ह्यांचा वापर करुन तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रभावित करु शकता, त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेले गैरसमज दुर करुन जिव्हाळा, आपुलकी निर्माण करु शकता.

टेलेपॅथीवर प्रचंड विश्वास असणार्‍या माझ्या एका सिनिअर आर्किटेक्ट मित्राने तर दिवसरात्र ह्या टेक्निकचा वापर करुन नाव, गाव व पत्ता माहित नसलेल्या मुलीला शोधुन काढल्याचे गुपित माझ्याशी शेअर केले व मी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे.

खरतरं त्याची स्टोरी ऐकल्यापासुन माझी ह्याबद्द्लची उत्सुकता वाढली व मी अभ्यासाला सुरुवात केली. अनेक पुस्तके वाचली, व्हिडीओज पाहीले, व स्वतःवरच अनेक प्रयोग केले.

काही वेळा यश मिळाले, काही वेळा अपयशी झालो.

पण गेले सहा महिने सातत्याने, ह्या तंत्राचा वापर केल्यानंतर आजकाल मला भरपुर फायदा होत असल्याचे जाणवले.

जे लोक ध्यान करतात, ज्यांचे मन शांत असते, ज्यांच्या मनात कसलीही खळबळ नसते, ते उत्तम परीणाम साध्य करु शकतात.

Banner

उदा. मनातल्या मनात एका रंगाची किंवा एका वस्तुची कमीत कमी वीस सेकंद किंवा त्याहुन अधिक वेळ तुम्ही कल्पना करु शकलात तर टेलेपॅथीने दुसर्‍या व्यक्तीशी संपर्क साधणे, तुम्हाला सहज जमु शकेल.

एक छोटासा प्रयोग करा.

तुम्ही आणि अजुन एक व्यक्ती एका रुममध्ये समोरासमोर बसा.

दोघांपैकी एक सेंडर असेल आणि दुसरा रिसीव्हर असेल.

दोघांनीही मनाला शांत करण्यासाठी डोळे मिटुन, वीस वीस दिर्घ श्वास घ्या, मनाला एकदम रिलॅक्स सोडा, शरीराला शिथील सोडा.

तुम्हाला जे येतं, त्यापैकी कोणतंही मेडीटेशन करा, थर्ड आय मेडीटेशन, माईंडफुलनेस मेडीटेशन किंवा इतर कुठलेही!

मनातले सगळे विचार शांत झाल्यानंतर सेंडरने अशी कल्पना करायची आहे की आपल्या दोन भुवयांच्या आतमधुन निघालेली एक चांदीची जाड तार रिसीव्हरच्या दोन भुवयांच्या मध्ये जोडलेली आहे.

आता सेंडरने मनातल्या मनात एका ऑब्जेक्टची, एका वस्तुची कल्पना करायची आहे, जसं की लाल रंगाचं रसरशीत सफरचंद, किंवा गुलाबी रंगाचं चवदार स्ट्रॉबेरी आईस्क्रिम!

सेंडरने आपल्या पाचही इंद्रियांचा वापर करुन, म्हणजे डोळे, जीभ, कान, नाक, त्वचा ह्या पाच इंद्रियांनी त्या ऑब्जेक्टला फिल करावयाचे आहे.

आपलं संपुर्ण लक्ष बस्स, त्या एकाच पदार्थावर केंद्रित करायचं आहे, एकदम एकाग्र करायचं आहे.

त्या पदार्थामध्ये आपल्या भावना ओता.

त्या पदार्थाची माहिती दोघांना जोडलेल्या चांदीच्या तंतुद्वारे समोरच्या व्यक्तीच्या मेंदुपर्यंत पोहचत आहे अशी कल्पना करायची आहे.

रिसीव्हरचं मन एकदम शांत असलं पाहीजे. पोकळ असलेलं मन लवकर सिग्नल ग्रहण करतं.

रिसीव्हरने आपल्या मनात सर्वात आधी कोणता रंग दिसतो, त्याकडे लक्ष द्यायचं आहे.

एखाद्या वेळी तीनचार रंगही दिसतात, त्यापैकी जास्त वेळा कोणता रंग फ्लॅश होतो आहे, त्याकडे बारकाईनं बघावं.

चमकणार्‍या वीजेसारख्या काही सेकंदासाठी वस्तु दिसुन अदृष्य होतील.

त्यापैकी सर्वाधिक वेळा दिसलेली वस्तु गेस करावी.

सराव करत गेल्यास अचुक गेस येऊ लागतात.

काही महीने सराव केल्यास आता दुरवर असलेल्या व्यक्तीची प्रतिमा मनात आणुन तुम्ही हाच प्रयोग मन लावुन करु शकता, व हवा तो संदेश प्रक्षेपित करु शकता.

जणु काही ती व्यक्ती तुमच्या समोर बसली आहे, आणि प्रत्यक्ष संवाद होतो आहे अशी कल्पना करुन संवाद साधा.

मी स्वतः ह्याचे कित्येक मजेशीर अनुभव घेतले व माझ्या व्हॉटसएप कोर्समधल्या अनेक जणांनी पॉझीटीव्ह रिझल्ट मिळाल्याचे मान्य केले.

तर्क, शंका आणि लॉजीक हे डाव्या मेंदुचे काम आहे, तर कल्पनाविलास हे उजव्या मेंदुचे काम आहे, त्यामुळे असे कुठे असते का? अशी शंका घेऊन प्रयोगाला बसल्यास यश मिळत नाही.

तुम्हाला टेलेपॅथीचे काही अनुभव आले आहेत का?

तुमचा टॅलेपॅथी व लॉ ऑफ अट्रॅक्शनवर विश्वास आहे का ह्याला विरोध आहे?

तुमचे अनुभव व मते मला जाणुन घ्यायला आवडतील.

शुभेच्छा, धन्यवाद आणि मनःपुर्वक आभार!!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

5 Responses

  1. नमस्कार, टेलीपथी च्या WhatsApp course बद्दल माहिती मिळू शकेल का?

    • https://chat.whatsapp.com/I88xtjj261l9JZIzPsdgee

      मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स विनामूल्य मिळवण्यासाठी👆वरती दिलेले ग्रुप लिंक क्लिक करून त्यामध्ये जॉईन व्हा. या ग्रुपमध्ये फक्त ऍडमिन पोस्ट करू शकणार असल्याने ग्रुपमध्ये अपडेट्स शिवाय काही इतर असणार नाही.

    • Kaviraj gaikwae says:

      Ho

  2. Dipak nagam says:

    गुप फुल आहे. Join नाही करू शकत. नवीन लिंक द्यावी

    • मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी👆वरती दिलेले ग्रुप लिंक क्लिक करून त्यामध्ये जॉईन व्हा. या ग्रुपमध्ये फक्त ऍडमिन पोस्ट करू शकणार असल्याने ग्रुपमध्ये अपडेट्स शिवाय काही इतर असणार नाही.

      https://chat.whatsapp.com/IgXLJPfulkqHgJdDspr1sB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!