नेटवर्क मार्केटींगमध्ये यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स!

नेटवर्क मार्केटींग

सर, मी एकवीस वर्षांचा तरुण आहे, माझ्या घरामध्ये अनेक आर्थिक अडचणी आहेत, वडीलांची तब्येत चांगली नसते, आमच्या घरात नेहमी आर्थिक तंगी असते, पैसे कमवणे माझ्यासाठी अत्यावश्यक आहे.

अशातच मी एक नेटवर्क मार्केटींग कंपनी जॉईन केली आहे, मला त्यात यशस्वी व्हायचे आहे, मला खुप पैसे कमवायचे आहे, घरातल्या, परीवारातल्या सर्व सदस्यांना सुखी ठेवायचे आहे, नेटवर्क मार्केटींगमध्ये यशस्वी होण्यासाठी मला मार्गदर्शन करा, सर!

XXX, मागच्या काही दिवसात तु किती मानसिक संघर्षातुन जात आहेस, याची मला पुर्ण कल्पना आहे.

पण हिंमतीने तु आपल्या कुटुंबीयांसाठी उभा आहेस, ह्याचे मला खरोखरचं मनापासुन खुप कौतुक ही वाटते.

जगातले नव्वद टक्के लोक एका सरळ धोपट आयुष्याचा मार्ग स्वीकारतात, रुळलेल्या वाटेने चालत राहतात, तर दहा टक्के लोकं नव्या वाटा तयार करतात, त्यासाठी ते प्रसंगी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याची हिंमत दाखवतात.

नेटवर्क मार्केटींग हा असाच एक व्यवसाय आहे, नेटवर्क मार्केटींग मध्ये यशस्वी होण्यासाठी खरचं दम लागतो, अनेक नकार पचवावे लागतात, वेडं बनुन, झपाटुन आयुष्य जगावं लागतं.

लाज, भीड, कमकुवतपणा यांना मनातुन हद्द्पार करावं लागतं, सतत उत्साही आणि आनंदी राहण्याचं, नवनवे मित्र जोडण्याचं तंत्र शिकुन घ्यावं लागतं.

वास्तव काहीही असो, एका कल्पनामय, आभासी जगामध्ये मनाला रमवुन ठेवणारा माणुस नेटवर्क मार्केटींग मध्ये यशस्वी होतो.

ह्या व्यवसायाकडे लोक शंकेने बघतात, कारण बराचश्या कंपन्यानी ग्राहकांना भुरळ पाडुन त्यांना लुटले आहे, फसवणुक केली आहे.

पण हा व्यवसाय शिकलेले लोक एक्स्ट्रा ऑर्डीनरी झाले आहेत, हे ही एक सत्य आहे.

आपल्या सर्वांचा लाडला मोटीव्हेटर, संदीप महेश्वरीने आपल्या स्ट्रगलींगच्या काळात दिड-दोन वर्ष नेटवर्क मार्केटींग जॉईन करुन अनेक भलेबुरे अनुभव घेतल्याचे जाहीरपणे अनेकदा सांगितलेले आहे. आज तो जो काही आहे, त्याचं श्रेय तो त्या अनुभवांना देतो.

रीच डॅडची थेअरी मांडणारा रॉबर्ट कियोसोकी असो, वा मायक्रोसॉफ्टचा संस्थापक बिल गेटस दोघांनीही नेटवर्क मार्केटींगची स्तुती केली आहे.

माझा आवडता प्रेरणादायी वक्ता, नेसवीझ कंपनीचा प्रमोटर, सध्या देशविदेशात ज्याचे व्हिडीओज धुमाकुळ घालत आहेत, गाजत आहेत, तो सोनु शर्मा हाही नेटवर्क मार्केटींगचा गुरु आहे.

चार-पाच वर्षांपुर्वी मी एका कंपनीला डिस्ट्रीब्युटर म्हणुन जॉईन झालो, जवळजवळ वर्षभर मी त्या कंपनीचा, त्यांच्या प्रॉडक्टचा आणि त्यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीचा मन लावुन अभ्यास केला. त्या एक वर्षाच्या काळात मी खुप अभ्यास केला.

पण, सुदैव म्हण किंवा दुर्दैव, त्या एका वर्षात मी एकाही ग्राहकाला माल विकला नाही.

तिथे शिकलेल्या मार्केटींगच्या ज्ञानाचा, त्या तंत्राचा मला, पुढे माझ्या व्यवसायात प्रचंड फायदा झाला.

त्या ज्ञानाच्या बळावर मी अनेक नवे मित्र जोडले आणि पैसेही कमवले. मला जे काही समजले, उमगले ते मी तुला आज सांगणार आहे.

त्याआधी मी तुला नेटवर्क मार्केटींगचे फायदे व ह्या व्यवसायाच्या मर्यादा सांगतो.

नेटवर्क मार्केटींगचे फायदे

श्रीमंत लोक नेटवर्कची उभारणी करतात. नेटवर्कची उभारणी करणारे लोक लवकर श्रीमंत होतात.

नेटवर्क मार्केटींग हा निष्क्रीय उत्पन्नाचा स्त्रोत आहे. आपण काम करायचं थांबवलं तरी पैशाचा ओघ आपल्याकडे अखंड येत राहतो.

ह्या व्यवसायात सुरुवातीला भलंमोठं भांडवल लागत नाही, किरकोळ वस्तु खरेदी करुन एजन्सी, फ्रॅंचाईजी सुरु करता येते.

ह्या व्यवसायात पडल्यावर आपोआपच तुमच्या व्यक्तीमत्वाला बहार येतो, पर्सनॅलिटी कमालीची आकर्षक बनते, माणसं जोडायचा छंद लागतो, इतरांवर छाप टाकण्याची कला साध्य होते. आपण आपोआपच आपल्या वर्तुळात लोकप्रिय होवु लागतो.

जो जितके जास्त परिश्रम घेईल, तितक्या जास्त संध्या त्याला उपलब्ध होतील, ह्या मंत्रामुळे हा एक उगवता आणि क्रांतीकारी व्यवसाय आहे.

ज्याचे विचार जितके मजबुत, नकार पचवण्याची क्षमता जितकी जास्त, तितकं जास्त यश त्याच्या पदरात पडतं!

शरीर आणि मन दोन्ही कणखर असणार्‍या अनेक उत्साही व्यक्तींच्या आयुष्याचं ह्या व्यवसायाने सोनं केलं आहे.

नेटवर्क मार्केटींगच्या मर्यादा

छोट्या छोट्या अपयशांनी खचुन हार माननार्‍या, लोकांचे टोमणे मनाला लावुन घेणार्‍या लोकांसाठी हा व्यवसाय नाही.

आजकाल बाजारात अनेक कंपन्यांचं पीक आलं आहे, तेव्हा कंपनी निवडताना आपण अतिशय जागरुक आणि दक्ष असायला हवं, नाहीतर कसलाही दगाफटका झाल्यास, आपल्या जवळच्या लोकांना फसवल्याचं पाप आपल्या माथी लागतं.

इथे आपण आपलं नाव, प्रतिष्ठा, इज्जत, आपला बहुमुल्य वेळ सगळंच डावावर लावत असतो, हे व्यवसाय निवडताना लक्षात ठेवावं!

माझ्या मते नेटवर्क मार्केटींग हा सुरुवातीला साईड बिजनेस म्हणुन स्वीकारावा, तीन ते पाच वर्ष जर आपण त्या व्यवसायात टिकुन राहीलो, गोडी कायम राहीली तर आणि तरच त्यात पुर्णवेळ उतरण्याचा विचार करावा.

इथे लोक प्रॉडक्ट्ला नाही, तुम्हाला जोखतात. थोडक्यात तुमच्या तोंडाकडे, तुमच्या कर्तुत्वाकडे पाहुन बिजनेस जॉईन करतात, तुम्ही प्रामाणिक आणि यशस्वी असाल तर तुमचा व्यवसाय लवकर नावारुपाला येईल.

इथे नुसतं पुस्तकी ज्ञान कामाचं नाही, संभाषण आणि व्यवसाय कौशल्य फिल्डवर गेल्याशिवाय, धक्के खाल्ल्याशिवाय डेव्हलप होत नाहीत.

सुरुवातीला सक्सेस रेशो दहास एक धरुन चालावा.

म्हणजे दहा कॉल केल्यानंतर एका व्यक्तीने जॉईन केले तरी यशस्वी झालो असे मानुन यश साजरे करावे.

पहीले शंभर कॉल झाल्यानंतर पाचास एक पर्यंत सक्सेस रेशो नक्की मिळु लागतो.

कंपनीने मान्य करो किंवा न करो, नेटवर्क कंपन्याचे प्रॉडक्ट फार दर्जेदार असले तरी फार महागही असतात.

चेन मध्ये टॉपला असणारे लोक खालच्या थरातल्या लोकांच्या मेहनतीवर जास्तीत जास्त श्रीमंत होत राहतात, आणि तुम्हीही माझ्याएवढे श्रीमंत सहज बनु शकता, असे आपल्याला आयुष्यभर गाजर दाखवत राहतात, हेही उघड गुपित आहे.

नेटवर्क मार्केटींगच्या व्यवसायात स्वतःला समर्पित करण्यासाठी काय काय करावे?

प्युअर कॉलींगचा वेळ, म्हणजे आपण कस्टमरच्या समोर बसुन डेमो दाखवतो, तो वेळ दिवसातुन एक तास असावा.

मार्केटींग, व्यक्तीमत्व विकास, सॉफ्टस्किल्स ह्या विषयांवरील पुस्तकांचे अखंड वाचन ठेवावे.

एकदा विक्री करण्याचं कौशल्य शिकलं की माणसाने मातीलाही स्पर्श केला तर तिचं सोनं होतं!

दिवसभरात भेटणारा प्रत्येक व्यक्ती माझा संभावित ग्राहक आहे, ह्या मानसिकतेनेच जगावे.

प्रामाणिकपणे जगावे, माल विकण्यासाठी कसल्याही खोट्याचा आधार घेऊ नये.

सतत नकार आले तरी निराश होवु नये, ग्राहकासमोर चेहर्‍यावरचे हास्य कधीही गायब होवु देऊ नये, कोणी कितीही टर उडवली तरी, हार न मानता, पुन्हा एका नव्या जिद्दीने नव्या अपॉईंटमेंटला सामोरे जावे.

यश मिळु लागताच हेच जग आपला हेवा करु लागते, आपल्याला सॅल्युट करु लागते.

नेटवर्क मार्केटींग हे एकट्या दुकट्याचे काम नव्हे, एक चांगली टीम बांधावी, तिचे सळसळत्या उत्साहाने नेतृत्व करावे. त्यांना सतत चार्जड अप ठेवावे.

भीतीने आपल्या आयुष्याचा ताबा घेण्याआधी आपणच भीतीला आपल्या जीवनातुन हद्द्पार करुन टाकावं.

तात्काळ होणार्‍या लाभासाठी, पैशासाठी हा व्यवसाय कधीही निवडु नये, कमीत कमी तीन वर्ष कसलाही नफा झाला नाही तरी मी तितक्याच उत्साहाने काम करत राहीन अशी पक्की खुणगाठ बांधावी म्हणजे दडपण नाहीसं होतं!

जे लहान स्वप्न पाहतात, ते लहानच राहतात, जे मोठी स्वप्नं पाहतात, तेच महान होतात.

यशस्वी होण्यासाठी खुप खुप मनःपुर्वक शुभेच्छा, मनःपुर्वक आभार!

नेटवर्क मार्केटींग बद्दलची काही मराठी पुस्तके

नेटवर्क मार्केटिंग ‘बिलेनिअर व्हा’ मराठी पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

मल्टी लेव्हल मार्केटिंग मराठी पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!