या वर्षी बाजारात कोणते 5G स्मार्टफोन्स दाखल होणार आहेत आणि त्यांचे फीचर्स काय?

वाचकहो, आज मनाचेTalks थोड्या वेगळ्या विषयाकडे तुमचे लक्ष वेधणार आहे. तंत्रज्ञानात रोज नवनवीन प्रगती होताना आपण पाहतो आहोत.

अगदी बेसिक फोन पासून फोर्थ जनरेशन, म्हणजेच 4G स्मार्टफोन्स पर्यंत झालेली प्रगती आपणा सर्वांसमोर आहेच. आज प्रत्येकाकडे 4G मोबाईल फोन आहे आणि प्रत्येकजण त्याचा वापर करतोय.

पण जसं की तुम्ही जाणताच, तंत्रज्ञान काही एका ठिकाणी येऊन थांबत नाही. आज 4G पुढील 5G तंत्रज्ञान सुद्धा विकसित झाले आहे आणि त्याच्या यशस्वी चाचण्या सुद्धा भारतात घेतल्या गेल्या आहेत.

असा काय फरक आहे 4G आणि 5G मध्ये? तर डेटा वाहून नेण्याची क्षमता 5G तंत्रज्ञानात प्रचंड प्रमाणात वाढवली गेली आहे. अगदी 10 Gbps पर्यंत याचा वेग आहे.

म्हणजेच सध्याच्या वेगापेक्षा शंभर पटींनी तुम्ही माहितीचे आदानप्रदान करू शकता. आजकाल व्हिडीओ असो वा व्हिडीओ गेम्स असो, प्रत्येकालाच वाटत असते की ते न थांबता, न अडखळता चालवेत.

पूर्वी युट्यूब वर एक गाणे लोड होण्यासाठी कितीतरी वेळ वाट बघणारे आपण आज एक सेकंदासाठी बफर झाले तर अस्वस्थ होतो. आता 5G मुळे ही अस्वस्थता पूर्णतः नाहीशी होणार आहे.

चला तर मग एक नजर टाकूया या वर्षी कोणत्या कंपन्यांचे 5G स्मार्टफोन्स बाजारात दाखल होणार आहेत आणि त्यांचे फीचर्स काय आहेत…

5G स्मार्टफोन्स
सॅमसंग गॅलक्सी S10 5G

१ . सॅमसंग गॅलक्सी S10 5G सध्या सर्वाधिक चर्चा होणारा हा फोन आहे. सॅमसंगने गॅलक्सी S10 सिरीज नुकतीच लाँच केली असून याच सिरीज मधील पुढचे मॉडेल म्हणजेच S10 5G हे लवकरच लाँच करण्याची शक्यता आहे.

आपल्या 5G मोडेम ची म्हणजेच Exynos 5100 ची घोषणा सॅमसंगने पूर्वीच केली असून आता तेच मोडेम या मोबाईल मध्ये वापरण्यात येणार आहे.

बहुधा S सिरीजच्या दहाव्या वर्धापनदिनी या फोनला सादर करण्यात येईल. या फोनमध्ये 8 GB रॅम, 256 GB इंटर्नल मेमरी असेल.

याची स्क्रीन साईझ 6.7 इंच असून प्रोसेसर ऑक्टाकोअर 2.7 गिगाहर्ट्झ, मुख्य कॅमेरा 12+12+15 मेगापिक्सल ट्रिपल स्वरूपाचा असेल. यात बॅटरी 4500 mAH असणार आहे.

5G स्मार्टफोन्स
ह्युवाई Mate X

२. ह्युवाई Mate X नुकत्याच पार पडलेल्या जागतिक मोबाईल काँग्रेस मध्ये ह्युवाई कंपनीने आपल्या असंख्य उत्पादनांची घोषणा केली.

त्यात सर्वात महत्वाची घोषणा होती ती मेट एक्स या मोबाईल फोनची. हा 5G स्मार्टफोन तर असणारच आहे, पण त्यासोबतच हा ह्युवाईचा पहिला घडी घालता येणारा (फोल्डेबल) फोन सुद्धा असणार आहे.

घडी घातल्यानंतर याची समोरची बाजू 6.6 इंच असणार असून त्यावर नॉच किंवा कॅमेरा दिला जाणार नाही. त्याचे कारण म्हणजे एकदा अनफोल्ड केले की 8 इंच स्क्रीन होईल आणि त्याचे रिझोल्युशन तब्बल 2480 X 2200 इतके असणार आहे.

या फोनच्या बाजू एर्गोनॉमीकली डिझाइन केल्या आहेत जेणेकरून याला हाताळणे सोपे जावे. कॅमेराची जेव्हा गोष्ट येते तेव्हा याचा ट्रिपल कॅमेरा अचंबित करणारा ठरतो.

40 मेगापिक्सल वाईड अँगल लेन्स + 16 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड लेन्स + 8 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स असणारा ट्रिपल कॅमेरा यात आहे.

आणि हे सर्व 11 मिमी. जाडीच्या जागेत बसवण्यात आले आहे. 4500 mAH कॅपसीटीची बॅटरी हे ही एक महत्त्वपूर्ण फिचर यात आहे. हा फोन जवळपास दीड लाख रुपयांच्या घरात असू शकतो.

5G स्मार्टफोन्स
एलजी V50 ThinQ

३. एलजी V50 ThinQ इतर कंपन्या घडी होणारे फोन बाजारात आणत असताना एलजी तरी कशी मागे राहणार? एलजीचा हा फोन 5G तंत्रज्ञानाने युक्त असण्यासोबतच फोल्डेबल सुद्धा असणार आहे.

एलजीच्याच जुन्या V40 मॉडेलची ही सुधारित आवृत्ती असून यात 4000 mAH कॅपसीटीची बॅटरी देण्यात आली आहे. या मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर आणि त्याच्या जोडीला 6 GB रॅम दिली जाणार आहे.

फोनचा मुख्य डिस्प्ले 6.4 इंची OLED सोबत QHD+ रिझोल्युशन वाला असणार आहे. या मोबाईल मध्येही 12 मेगापिक्सल + 16 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल असा ट्रिपल कॅमेरा आहे.

एलजीच्या म्हणण्यानुसार बाजारात इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आम्ही नवीन फोन तयार न करता जुन्याच फोनला नवीन स्वरूपात आणणार आहोत.

5G स्मार्टफोन्स
शाओमी Mi Mix 3 5G

४. शाओमी Mi Mix 3 5G अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या शाओमी कंपनीनेही स्वतःचा 5G स्मार्टफोन लवकरच आणण्याची घोषणा केली आहे.

हा फोन या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहिमध्ये येण्याची शक्यता आहे. शाओमीचे अध्यक्ष लियु जून यांनी नुकतेच या फोनचे संकल्पचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या फोनमध्ये लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट असणार असून 6 GB रॅम सपोर्ट असणार आहे. याच फोनचे दुसरे 10 GB रॅमचे व्हॅरीएन्ट आणण्याचाही कंपनीचा मानस आहे.

यात तब्बल 256 GB इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. 12 + 12 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि 24 + 2 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा यात असणार आहे.

बॅटरी 3800 mAH आणि स्क्रीन साईज 6.39 इंच देण्यात आली आहे.

5G स्मार्टफोन्स
वनप्लस 5G

५. वनप्लस 5G वनप्लस ही एक प्रीमियम मोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाते. उत्कृष्ट दर्जाचे फोन बनवणे ही या कंपनीची खासियत आहे.

येणारा वनप्लस 7 हा या कंपनीचा पहिला 5G फोन असण्याची शक्यता इंडस्ट्रीमध्ये व्यक्त केली जात आहे. मात्र या कंपनीच्या अधिकृत प्रवक्त्याने केलेल्या घोषणेनुसार आपल्या पहिल्या 5G फोनसाठी कंपनीने काही स्पेशल प्लॅन केल्याचा अंदाज बांधता येतो.

पहिला वनप्लस 5G फोन या वर्षीच्या मध्यावधी काळात लाँच होईल असे अपेक्षित आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे वनप्लस कंपनी आपल्या मोबाईलच्या किमती वाढीव ठेवत असल्याने हा फोन सुद्धा अतिशय महाग असू शकतो.

अर्थात महाग असला तरी कंपनी दर्जाच्या बाबतीत कुठेही कमी पडत नाही हे ही तितकेच सत्य आहे. येणाऱ्या फोनमध्ये 6 GB रॅम, 64 GB इंटर्नल मेमरी, 24 + 12 + 8 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा, 24 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, 4150 mAH बॅटरी देण्यात येणार आहे.

तर वाचकहो, तुम्ही तयार आहात ना या तंत्रज्ञानातील नवीन क्रांतीला सामोरे जायला? ही माहिती कशी वाटली ते जरूर कळवा. जर तुम्हाला तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखी कुठल्या विषयावर जाणून घ्यायचे असेल तर कमेंटबॉक्स मध्ये जरूर लिहा.

लेखन: अनुप कुलकर्णी

मनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया…


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय