वाळवंटी जमीन असलेलं दुबई इतकं बलाढ्य कसं बनलं?…..

दुबई

मागे एका लेखात आपण इस्रायल हा देश कसा कठीण परिस्थितीतून तावून सुलाखून एक बलाढ्य देश बनला याची माहिती घेतली. आज आपण दुबई बद्दल बोलू.

दुबई हा देश इतका समृद्ध कसा झाला अवघ्या २० वर्षात… २० वर्षांपूर्वी केवळ वाळवंटाची भूमी असलेला हा देश एक जागतिक केंद्र कसा बनला?

दुबई हे पूर्ण जगातले तीन नंबरचे ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे.

इंटरनॅशनल पॅसेंजरच्या ट्राफिक चा विचार केला तर दुबईचे एअरपोर्ट हे जगातले सर्वात व्यस्त (world’s busiest airport by international passenger traffic) एअरपोर्ट आहे.

२० वर्षांपूर्वी दुबईकडे आपल्या देशाचं स्वतःच म्हणावं असं अन्न, पाणी, सोनं असं काहीही नव्हतं. मग इतक्या अल्प काळात दुबईकडे इतका पैसे आला कसा!!

या प्रवासाची लक्षात घ्यावी अशी सुरुवात होते हिज हायनेस ‘शेख मोहोम्मद बिन राशिद अल् मखतुम्’ यांच्यापासून. हे दुबईचे राजा, पंतप्रधान त्यापेक्षाही दूरदृष्टी ठेवणारे नेता आहेत.

असा दूरदृष्टी असणारा नेता देशाला लाभावा हे त्या देशाचे भाग्यच.

जगात सर्वांनाच काय वाटतं कि दुबईकडे पैसे येतो तो त्यांच्या तेलामुळे पण दुबईकडे पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसमुळे मिळणार रिव्हेन्यू हा ५ टक्क्यांपेक्षाहि कमी आहे.

राज्यकर्त्यांची दूरदृष्टी कामाला आली ती इथे. योग्य वेळ असतानाच त्यांनी आपली इकॉनॉमी पूर्णतः शिफ्ट केली.

ऑइल वर अवलंबून असलेल्या इकॉनॉमीला टुरिझम बेस्ड इकॉनॉमी बनवले, देशाला फायनान्शिअल हब बनवले. एवढेच नाही तर इथले इन्फ्रास्टक्चर असे बनवले कि ते एकतर जगातले नम्बर वन असेल नाहीतर एकमेव असेल.

दुबई मॉल, बुर्ज खलिफा, पाम आयलंड, अंडरवॉटर ब्रिज, अंडरवॉटर टेनिस खेळण्याचे स्टेडियम, जगात बोटावर मोजण्यासारखे असलेल्या सेव्हन स्टार हॉटेल मधले एक हॉटेल ‘बुर्ज अल् अरब’ इथे दुबईत आहे. असे सगळेच इथे काहीतरी वैशिष्ठय असलेले बेनवले गेले.

आपल्याकडे बरेचदा काही ठिकाणं असतात जिथे एखादी जुनी कार धूळ खात पडलेली असते. पण दुबईमध्ये अशी गाडी कुठे दिसली तर तिला लगेच दंड बसतो.

गाडी धुतली आणि जमिनीला खराब करून सोडून दिले हा प्रकारही तिथे होत नाही. यासाठी लोकांमधले अनुशासन महत्त्वाचे आहे.

वाळवंट असलेल्या या देशात आज जगातला पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा फुलांचा बगीचा ‘मिरॅकल गार्डन’ बनला.

२३ मे २०१६ ला हिज हायनेस ‘शेख मोहोम्मद बिन राशिद अल् मखतुम्’ यांच्या हस्ते जगातल्या सर्वात आद्ययावत असलेल्या 3D प्रिन्टिंग बिल्डिंगचं उदघाटन झालं.

१५० किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणाऱ्या पॅसेंजर ड्रोन बनवण्याची तयारी सुद्धा प्रगतीपथावर आहे. कमीत कमी ह्यूमन इंटरॅक्शन असलेलं ‘स्मार्ट पोलीस स्टेशन’ सुद्धा इथेच बनलं.

जमिनीची कमी असलेल्या दुबईत मानवनिर्मित आयलंड बनवले गेले. कच्च्या जमिनीत बांधकाम करणे शक्य होत नाही तर तंत्रज्ञानाच्या मदतीने तेही केले. म्हणजे कुठल्याही अशक्यप्राय गोष्टीला शक्य बनव्यामागे हा देश लागला.

हिज हायनेस ‘शेख मोहोम्मद बिन राशिद अल् मखतुम्’ यांनी दुबई 10 X प्रोग्रॅम लॉन्च केला. देशात होणारे सर्व काही १० पटींनी वेगवान, १० पटींनी मोठे, १० पटींनी सक्षम असावे यासाठी हा अभ्यासपूर्ण प्रोग्रॅम यांनी लॉन्च केला.

बघा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, नाहीतर आपल्याकडे मतपेटी भरण्यासाठी एक पार्टी सांगते आम्ही अकाउंट मध्ये पंधरा लाख टाकू, मग त्यावर दुसरी सांगते आम्ही पंच्याहत्तर हजार टाकू, हे सगळं का होतं कारण जशी प्रजा तसा राजा.

आपण जे ऐकून खुश होऊ ते आपले राज्यकर्ते आपल्याला सांगून मोकळे होतील. अशी दूरदृष्टी असणारे राजकर्ते हेच देशाचं भविष्य घडवणार!! बरोबर ना!!

दुबई- एका स्वप्ननगरीची निर्माणगाथा हे प्रणय गुप्ते लेखीत पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.