IQ लेव्हल म्हणजे बुध्यांक वाढवण्यासाठी करण्याचे सोपे ५ उपाय!!

IQ बद्दल आपण बरंच ऐकतो. आपल्या मुलांची लहान वयातच IQ टेस्ट करणं हे आता पालकांना सुद्धा गरजेचं वाटतं. IQ लेव्हल/ बुध्यांक म्हणजे आपल्या मेंदूची ती क्षमता जिच्याने आपण समजू शकतो, आकलन करू शकतो, काही साचेबद्ध विचारांपेक्षा वेगळे विचार आपण करू शकतो.

किंवा एखादी छोटीशी गोष्ट बघून त्यापासून काही अर्थ काढू शकतो, गोष्टी लक्षात ठेऊ शकतो. उदाहरण बघायचं झालं तर आयझॅक न्यूटनने सफरचंद झाडावरून पडताना पाहिलं.

पण त्यातून त्याने काही वेगळा विचार केला आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला.

काही लोक म्हणतात कि IQ हा जन्मतःच ठरलेला असतो. पण संशोधनातून असे सिद्ध झालेले आहे कि IQ वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो.

कमी तर आपल्याला करायचा नाहीच, बरोबर ना!! तर आज या लेखात आपण बघू कि IQ वाढवण्यासाठी काय केले पाहिजे. IQ लेव्हल उत्तम असलेल्या व्यक्तीचे विचार प्रभावी असतात, कुठलेही प्रश्न सोडवण्याची, आकलन करण्याची हातोटी त्यांची चांगली असते, निर्णय क्षमता चांगली असते, स्मरणशक्ती चांगली असते.

IQ लेव्हल कमी करण्याचं प्रशिक्षण आपण लेखात देणार नाही तरी एवढं आहे कि नवीन गोष्टी शिकणं सोडून द्या, काही नवीन करणं सोडून द्या, बसून राहा, वेळ घालवा…

बस हे असं केलं कि कालांतराने IQ लेव्हल कमी होत जाईल. पण आता आपण बघू अशा पाच गोष्टी ज्या आपली IQ लेव्हल वाढवू शकतात. आणि त्या पाच गोष्टी आचरणात आणण्यासाठी काय केले पाहिजे.

१) काम करण्याची पद्धत बदला- आपण सकाळी उठून ब्रश करताना उजव्या हाताने करत असू तर लक्षात ठेऊन ते काम काही दिवस डाव्या हाताने करा.

बूट सॉक्स घालताना जो पाय आणि हात आधी सक्रियपणे पुढे येतो त्याव्यतिरिक्त दुसरा वापरण्याची सवय सुद्धा करा. म्हणजे मेंदू जागरूक असू द्या कि आपल्याला कुठल्या हाताचा वापर करायचा आहे. मेंदू जागरूक असण्याने IQ लेव्हल वाढवली जाऊ शकते.

२) कल्पनाशक्ती वाढवा- यासाठी एक चांगला उपाय आहे वाचन वाढवण्याचा. आता बरेचदा असं होतं कि रोजच्या व्यस्त दिनक्रमात वाचायला वेळ नाही हि तक्रार असते.

पण आजकाल हातात असलेला स्मार्टफोनही आपल्या बुद्धीला चालना देईल अशा खूप गोष्टी आपल्यासमोर घेऊन येतो. तर शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त वाचन करा.

जे वाचाल त्याची कल्पना करा. म्हणजे एखादी गोष्ट वाचली ज्यात कोकणाचं वर्णन आहे. आता आपण कोकण प्रत्यक्ष पहिला नसला तरी आपण लहानपणी गोष्टींमध्ये, टीव्ही वर जे काही पहिले त्यावरून कल्पना करायची आधी आपण सवय लावून घ्या. आणि हो सवयीने हे शक्य आहे.

कल्पना केल्याने आपल्या मेंदूला जे समोर नाही त्याचा विचार करण्याची सवय होते. आणि आपल्याला तर माहीतच आहे, शोध कसे लागतात? थोड्या माहितीवरून केलेल्या कल्पनेनेच विचार पुढे येतात आणि मोठमोठे शोध लागतात.

३) स्वतःचे परीक्षण करा- स्कॉलरशिप सारख्या परीक्षेत चार पर्याय दिलेले प्रश्न आपण सोडवतो. तसे प्रश्न सोडवणे, शब्दकोडी सोडवणे, यातून स्वतःचे वारंवार परीक्षण करत राहा.

याने लक्षात ठेवण्याची क्षमता वाढेल. हवी ती माहिती योग्य वेळी उपयोगात आण्याची सवय मेंदूला लागेल.

४) शरीर आणि मेंदू यांचे आरोग्य चांगले राखा- मेंदू सशक्त असण्यासाठी सकाळचा नाश्ता प्रोटीनयुक्त असला पाहिजे. आपल्या खाण्यात व्हिटॅमिन बी चा समावेश असला पाहिजे.

व्हिटॅमिन बी मध्ये असलेले फॉलिक ऍसिड, रिबोफ्लाविन, थायमाईन हे आपल्या शरीरासाठी पॉवरहाऊस चे काम करतात. हिरव्या पालेभाज्या, अंडी, चीज यात प्रोटीन आणि व्हिटॅमिनची मात्र चांगल्या प्रमाणात असते.

सोयाबीन, वॉलनट मध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ऍसिड योग्य प्रमाणात असणे हे मेंदूच्या वाढीसाठी चांगले असते. आहाराबरोबरच व्यायाम सुद्धा मेंदूच्या आरोग्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे.

मेंदूला जास्त रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनचा पुरवठा मिळण्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते.

५) शरीर थकलेले असताना मेंदूला स्ट्रेस देणे टाळावे- एखादे कोडे सोडवणे, रुबिक क्यूब सोडवणे यांसारखे स्ट्रेस हे मेंदूला योग्य वेळी मेंदूच्या व्यायामासारखे दिले गेले पाहिजेत.

पण दिवसभराच्या थकव्यानंन्तर रात्री आराम करताना मोबाईलचे नोटिफिकेशन ऐकून झोप मोडून मेंदूला, डोळ्यांना दिलेला स्ट्रेस, यासारखे नकारात्मक स्ट्रेस देणे टाळले गेले पाहिजे.

याने आपली एकाग्रता शक्ती कमी होते. मेंदूला दिला गेलेला योग्य स्ट्रेस IQ वाढवण्यास कारणीभूत ठरतो.

तर या टिप्स सगळ्या तंतोतंत पाळणे जरी शक्य नसेल तरी जेवढे प्रयत्न आपण IQ लेव्हल वाढवण्यासाठी करणार असू त्यात सातत्य ठेवा.

सातत्य ठेवले तर मेंदूची कार्यक्षमता वाढून IQ वाढायला सुरुवात होईल याचा अनुभव घ्या. आपल्या लहान मुलांस]ठी तर त्यांना सवयी लावतानाच आपण या गोष्टींचा विचार केला तर पुढे नक्कीच याचा फायदा होईल.

फक्त त्या सवयी मारून मुटकून लावायच्या नाहीत एवढी काळजी आपण घ्यायची.

याचबरोबर तुम्हाला अनुभवातून कुठल्या सवयी मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी गरजेच्या वाटतात तेही कमेंटबॉक्स मध्ये लिहून कळवा.

धन्यवाद.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

5 thoughts on “IQ लेव्हल म्हणजे बुध्यांक वाढवण्यासाठी करण्याचे सोपे ५ उपाय!!”

  1. Dear sir, I’m reading your post on regular basis but I need information/guidance on some important topics so how can I contact you plz reply me and I’m already joined ur what’s up group

    Reply
  2. खुप सुरेख टीप दिल्या आहेत त्याबद्दल मनाचे talks टीम चे मनापासून आभार व खूप साऱ्या शुभेच्छा 🙏.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय