Nashik Marathon 2018 – साजरा करूया एका “कार्निव्हल” सारखा

‘नाशिक मॅरॅथॉन’ हा आपल्यातील कलागुणांना यथायोग्य संधी व सन्मान मिळवण्याचा आनंद सोहळा असल्याचे नाशिककरांच्या लक्षात आल्याने ‘सहभागाचा व मदतीचा’ ओघ वाढतच आहे, हे विशेष!

Nashik Marathin Volutiarमला चांगलंच आठवतंय की मागच्या वर्षी ‘नाशिक मॅरेथॉन’ या विषयाने फेब्रुवारी महिन्यात नाशिकवासियांना गुंतवून टाकले होते, आहे. जवळपास ८-१० दिवस याच्या आयोजनाच्या बातम्या वाचनात येत होत्या आणि लक्षात आले की या बातम्यांचा ‘कंटेंट, फॉर्म व प्रवास’ हा एखाद्या कार्पोरेट कंपनीच्या ‘प्रॉडक्ट लाँच किंवा मार्केटिंग कॅम्पेन’ प्रमाणे होता ज्यामुळे बहुतांशी नाशिककरांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कारण असा प्रोफेशनल अप्रोच प्रथमत:च बघायला मिळाला अशी चर्चा भेटीगाठी दरम्यान नाशिककरांमध्ये व्हायला लागली. परिणामस्वरूप यात सहभागी असलेल्या स्थानिक कलाकारांनी ‘कॉलर व मान’ बरीचशी ताठ करून अभिमानाने सांगतानाचे अनुभव अनेकांनी बोलून दाखवले होते. आपल्या शहरात नक्कीच वेगळं काहीतरी घडतंय हे आता आम्हा नाशिककरांना प्रकर्षाने जाणवायला लागलं होतं. ‘आनंद, उत्सुकता, आकर्षण व सोहळा’ याच्या ओढीने तमाम नाशिककर १२ तारखेची आतुरतेने वाट बघत होते. एवढा मोठा इव्हेंट म्हणजे काहीतरी पूर्वतयारी सुरु असणारच तेव्हा बघूया काय चाललंय ते म्हणुन शनिवार, दिनांक ११ फेब्रुवारीला रात्री ८ वाजताच बहुतेकजण ‘गोल्फ ग्राउंडवर दाखल झाल्याचे मला प्रकर्षाने जाणवले.

त्यानंतर दिनांक १२ फेब्रुवारी २०१७ रोजी जे काही घडलं, ते अभूतपूर्व होतं, ‘याची देही याची डोळा’ आम्ही बघितलं, अनुभवलं व त्याचा पुरेपूर आनंदही घेतला. या आनंद सोहळ्याचं सत्यपरिस्थिती कथन करणारं विस्तृत व रसभरीत वर्णन करण्यात सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी कोणतीही कसूर केली नाही. याशिवाय ‘नाशिक मॅरेथॉन’ च्या फेसबुकवरील अनेकांचे अभिप्राय शब्दांच्या पलीकडले सांगून गेले.

हे एवढ्यावरच थांबले नाही तर ‘समाज आणि पोलीस’ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या अभूतपूर्व सोहळ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा यथायोग्य सन्मान सोहळा ‘नाशिक पोलीस आयुक्तालयात’ पार पडला आणि हे नातं अधिकच दृढ झालं.

Nashik Marathin Volutiarया अभूतपूर्व यशाचा लेखाजोगा मांडतांना ‘नाशिक शहर पोलीस’ यांची इच्छा, संकल्पना, सक्षम नेतृत्व, कार्यप्रणाली, नाशिककरांना सहभागी करून घेण्याची कला, नियोजन हेच मुद्दे प्रकर्षाने पुढे आले व जाणवलेही. समाजाच्या प्रगतीमध्ये पोलीस अत्यावश्यक व महत्वाची भूमिका बजावत असतांना कर्तव्यपूर्तीच्या आनंदासोबतच समाजाला सोबत घेऊन डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा पार पाडण्याचं श्रेय्य अर्थातच पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंगल यांनाच जातं. कारण नाशिक मधील डॉक्टर्स, लेखक, खेळाडू, कलाकार अशा सर्वच स्तरातील मान्यवरांना एकत्र आणून हा सोहळा त्यांनी यशस्वी करून दाखवला. या त्यांच्या कृतीचा नाशिककरांना फार मोठा फायदा झाला तो असा की कालपर्यंत आपापल्या कोशात वावरणाऱ्या, एकत्र येऊन आपल्या शहरासाठी काहीतरी करण्याची कुवत व इच्छा असणाऱ्या आमच्यापैकी प्रत्येकाला योग्य ‘व्हेंन्ट’ मिळाला. या सोहळ्याच्या यशस्वितेसोबतच समाज व पोलीस यांच्यातील दरी आपसूकच कमी झाली आणि पोलीसदलाचा समाजस्वीकार व परस्परसंबंधांना दृढ करण्याच्या उद्देशाने सुरु केलेली ही ‘धाव’ नाशिककरांना ‘औत्सुक्याची व समाधानाची’ वाटल्यास नवल ते काय?

Nashik Marathon Volunteerहे एवढ्यावरच थांबले नाही तर ‘समाज आणि पोलीस’ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या अभूतपूर्व सोहळ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा यथायोग्य सन्मान सोहळा ‘नाशिक पोलीस आयुक्तालयात’ पार पडला आणि हे नातं अधिकच दृढ झालं. अर्थात याच वेळी मी, माझे मित्र डॉ. राजेंद नेहेते, अविनाश आव्हाड आणि सचिन जोशी यांच्या ‘संकल्पना, पुढाकार व हस्ते’ आमच्या टीमचे कप्तान, पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंगल, यांचाही नागरी सत्कार करतांना सर्वांनाच अतीव समाधान वाटले. मग यानंतरच्या वर्षभरात आम्ही सर्व या ना त्या निमित्ताने भेटतच होतो आणि अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले, हे फक्त आणि फक्त आपल्याच शहरात घडले, ही निश्चितपणे अभिमानाची बाब होय!

त्यानंतर मात्र अनेक नाशिककरांनी आम्हालाही यात सहभागी करून घ्यायची विनंती आमच्या टीम मधील प्रत्येकाला केल्याचा अनुभव आहे. मागच्या वर्षी किमान २०० जणांची असणारी ही टीम आता मात्र अगणित आहे, हे अत्यंत अभिमानाने सांगावेसे वाटते. ‘नाशिक मॅरॅथॉन’ हा आपल्यातील कलागुणांना यथायोग्य संधी व सन्मान मिळवण्याचा आनंद सोहळा असल्याचे नाशिककरांच्या लक्षात आल्याने ‘सहभागाचा व मदतीचा’ ओघ वाढतच आहे, हे विशेष!

म्हणजेच ‘नाशिक मॅरॅथॉन’ ही आम्हा नाशिककरांची आहे ही ‘भावना, विश्वास व जबाबदारी’ याची जाणीव प्रकर्षाने नाशिकवासियांना आता झाली आहे. मग अर्थातच त्या अंतर्गत या आनंद सोहळ्याच्या यशस्वीतेची जबाबदारी ओळखून समस्त नाशिककरांनी आपला सहभाग या ना त्या रूपाने नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. सोबतच आपलं नाशिक हे ‘स्मार्टसिटी’ च्या यादीत समाविष्ट झाल्याने नाशिककरांची जबाबदारी अधिकच वाढली आहे.

Nashik Marathon Volunteerतेव्हा आपण समस्त नाशिककर शपथ घेऊया की या वर्षीच्या ‘नाशिक मॅरेथॉन – २०१८’ ची जबाबदारी स्वीकारून आम्ही सर्व आपापल्या परीने आपला सहभाग नोंदवून या सोहळ्याचा जास्तीत जास्त आनंद घेऊ, त्याचबरोबर या निमित्ताने बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना आपल्या शहराची ‘एकी, शिस्त व सामाजिक सलोखा’ याचे अच्युतम दर्शन घडवू! हेच कदाचित स्मार्ट शहरांमध्ये नाशिकची निवड झाल्याचे प्रमाणपात्र ठरू शकेल!

नाशिक मॅरेथॉनसाठीचीPrizes

रेजिस्ट्रेशन साठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

4 thoughts on “Nashik Marathon 2018 – साजरा करूया एका “कार्निव्हल” सारखा”

  1. Thanks for information… I am planning to come at Nasik to visit Sula Weneyard.. I would definitely plan to attend this event.. How can we participate with our entire group of our Jim? Please inform?

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय