उत्तर अजूनही आलं नाही..

तुझ्या जगात प्रवेश झाला
विनाअडथळा श्वास घेतला
मोकळा श्वास लाभणार कधी
उत्तर अजूनही आलं नाही….
आईने बोबडे बोल सुधारले
बाबाने बोट धरून चालवले
जगण्याची धडपड थांबेल कधी
उत्तर अजूनही आलं नाही…..
शिकलो एक एक अक्षर लिलया
सतराशे साठ पदरी पदव्या
जगण्याची परि दिशा कोणती
उत्तर अजूनही आलं नाही….
अनुभव गाठीशी शिदोरी मोठी
हात असंख्य सच्चे आजही पाठी
अपेक्षांची यादी घटणार कधी
उत्तर अजूनही आलं नाही…..
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.