डेट्सवर गेल्यावर कोण खर्च करणार? क्यूंकि दो रुपया भी बडी कामकी चीज होती है बाबू!

डेट्सवर

काही दिवसापासून मी डेटिंग जीवनात पैशांच्या अनेक पैलूंचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते. मला मान्य आहे की, डेटिंगबद्दल माझे विचार आणि वैयक्तिक अनुभव आज कदाचित कालबाह्य ठरतील. कारण जवळजवळ ७ वर्षांपूर्वी मी माझ्या पतीला डेट करण्यास सुरुवात केली होती आणि आता लग्नाला जवळपास ४ वर्ष झाली आहेत. आम्ही तरुण असताना टिंडरसारखे ॲप्स अस्तित्वात नव्हते (किमान भारतात). मला खात्री आहे की डेटिंगचे काही पैलू सदाहरित राहतील.

डेट्सवर गेल्यावर पैसे कोण खर्च करणार?

वैयक्तिकरित्या, मी पैसे खर्च करताना थोडी आडमुठी आहे. मी नेहमीच खात्री केली कि आम्ही तेव्हाच महागड्या ठिकाणी जाऊ जेव्हा त्याचा (पतीचा) खिसा गरम असेल आणि तोच खर्च करेल. त्याने पहिल्यांदा ही गोष्ट बोलून दाखवली. परंतु नंतर आमच्यात ही गोष्ट सवायीची झाली.

या लेखाबद्दल विचार करत असताना मी त्याला विचारलं की जेव्हा आपण महागड्या ठिकाणी डेटवर जायचो आणि तूच खर्च करायचास याचा तुला कधी त्रास झाला का? तेव्हा मला कळलं की खरंतर त्यालाच नेहमी पैसे भरावे असं वाटायचं. त्याला असं करून सद्गृहस्थ किवा आदर्श बॉयफ्रेंड असल्याची भावना यायची.

मग मी गुगल केलं, “डेट्सवर गेल्यावर कोण पैसे खर्च करते?” उत्तर गोंधळात टाकणारं होतं. हा खरंच किचकट प्रश्न आहे. ज्यामुळे समोर बिल आल्यावर प्रेमीयुगुलांचे काही क्षण संकोचलेल्या अवस्थेत जातात. पण साधारणत: जो डेटवर जाण्यासाठी पुढाकार घेतो किंवा विचारतो, तोच पैसे देतो.

माझ्या प्रमाणे तुम्हीही जर स्त्रीवादी असाल, तर सगळे पैसे मुलानेच द्यावेत ही गोष्ट साहजिकच खटकते. ही प्रथा स्त्रीदाक्षिण्य दाखवणारी आणि जेव्हा स्त्री कमावती नव्हती तेव्हाची आहे. ही कहाणी त्या काळातली आहे जेव्हा पुरुष पुरवणारा आणि स्त्री गृहिणी होती. आज जर तुम्ही नोकरी करून पुरेसे कमवत असाल तर तुमच्या वाट्याचे पैसे भरण्यात काहीच गैर नाहीये, असं मला वाटतं.

जर आपण समान रोजगाराच्या हक्कासाठी लढत असू, तर जेव्हा खर्च करायची वेळ येते तेव्हाही आपण मागे का हटावे? या वादावर एकांगी विचार म्हणजे दांभिकपणा आहे.

समोरच्याला (मुलाला) बरं वाटावं किंवा त्याला स्त्रीदाक्षिण्य दाखविण्याची संधी मिळावी म्हणून पहिल्या वेळी पैसे देऊ द्यावे, पण “पुढे जेव्हा केव्हा आपण बाहेर जाऊ तेव्हा समान खर्च करू”, असं ठरवून घेऊ शकतो. सोबतच्या मुलीने (स्त्रीने) पैसे दिल्याने मुलाला (पुरुषाला) अपराधी का वाटावं? तुम्ही एका आर्थिकदृष्ट्या जबाबदार असणाऱ्या स्त्रीला डेट करत आहात याचा हा स्पष्ट संकेत आहे आणि ते मान्य करा.

मॅथ्यू हसीने एका व्हिडिओमध्ये एका कार्यशाळेत विचारलेल्या प्रश्नाचे चांगलं उत्तर दिले आहे. “सर्वोत्तम संबंध कोणते आहेत?”… जेथे आपण आपल्या भागीदार/पती/पत्नीला आपल्या मित्रासारखे वागवता. आपल्या चांगल्या मित्रासोबत हा एकांगी संबंध असेल, तर तो टिकून राहील का? डेटिंग करताना बिल वाटून देणं याबद्दल आणखी एक चांगला भाग आहे, तो म्हणजे परस्पर सामंजस्याने आणि दोघांच्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण आणखी चांगल्या प्रकारे डेट करू शकता.

डेटिंग आणि क्रेडिट स्कोअर

मी जितका खोल व्यक्तिगत आर्थिक कुवतीचा विचार करते, तितकं मला जाणवतं की पाश्चिमात्यांच्या या विषयी दृष्टीकोन हा खूपच उपयुक्त आहे. यूएस मध्ये डेटींगचा एक प्रमुख क्रायटेरिया म्हणजे व्यक्तीचा ‘क्रेडीट स्कोअर’!🤑🤑 ज्याप्रमाणे एखादी बँक कर्ज देताना, “व्यक्ती परतफेड करण्याइतकी जबाबदार आहे का?” हे क्रेडीट स्कोअरने तपासते. त्याप्रमाणे अमेरिकेमध्ये ‘डेट’ करण्यापूर्वी आपल्या साथीदाराचा क्रेडीट स्कोअर तपासतात.

‘सीएनबीसी’ ने आपल्या लेखात म्हटले आहे, “५८ टक्के मुली म्हणतात की होणाऱ्या जोडीदाराचा चांगला क्रेडिट स्कोअर हा एखादी चांगली गाडी चालविण्यापेक्षा अधिक आनंददायक असतो. तर ५० टक्के लोकांनी सांगितले की, चांगला क्रेडीट स्कोअर एका प्रभावी नोकरीपेक्षा अधिक महत्वाचा आहे. तर ४० टक्के लोकांना शारीरिक तंदुरुस्तीपेक्षा 💪 क्रेडीट स्कोअर महत्वाचा वाटतो.”

‘डिस्कव्हर अँड मॅच मीडिया ग्रुप’ने केलेल्या २००० सालातील सर्वेक्षणासंदर्भात एका संयुक्त संशोधनात समाविष्ट झालेल्या ६९% लोकांनी, “उच्च क्रेडिट स्कोअरद्वारे व्यक्तीची आर्थिक कुवत समजते आणि ही गोष्ट अत्यंत आवश्यक आणि अत्यंत महत्वाची आहे” असे मत व्यक्त केले. या लेखातील माझ्याआवडती ओळ म्हणजे, “विनोद, आकर्षण, महत्वाकांक्षा, धैर्य आणि नम्रतेपेक्षा आर्थिक जबाबदारी घेण्याची तयारी जास्त महत्वाची आहे.” मजेशीर गोष्ट म्हणजे, मी डेट करत असताना, “क्रेडिट स्कोअर म्हणजे काय?” हे मला माहित नव्हते आणि माझ्या पतीमधील इतर सर्व गुणांसाठी मी त्याला निवडलं. क्रेडिट स्कोअरमध्ये मी अडकले नसल्यामुळे माझ्यासाठी गोष्टी सोप्या झाल्या. 🤩

आज परिस्थिती वेगळी आहे. ऑनलाइन डेटिंगच्या जगात आपल्या समोर कदाचित एका स्वाइपसह शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. ‘क्रेडिट स्कोअर’ चा आग्रह कदाचित त्या भल्या मोठ्या यादीला गाळणी लावण्याची एक सोपी पद्धत असू शकते. भारतीय विवाहसंस्थेमध्येही शॉर्टलिस्टिंग साठी दोन प्रमुख पर्याय आहेत – समुदाय आणि आर्थिक स्थिती. त्यामुळे आपल्यासाठी क्रेडीट स्कोअर पद्धत काही आश्चर्यचकित होण्याइतकी नवीन नाही.

डेटिंग आणि पैशाच्या सवयी

क्रेडिट स्कोअर फक्त एक छोटासा भाग आहे. जवळजवळ ३ वर्षापूर्वी ‘लव अँड मनी स्टडी’ या सर्वेमध्ये १००७ प्रौढांचा अभ्यास केला गेला तेव्हा असे लक्षात आले की ५५% लोकांना अशा व्यक्ती आकर्षित करतात, ज्या भक्कम आर्थिक नियोजन आणि सेव्हिंगचा विचार करतात. २१% लोकांना आकर्षित करणारे जोडीदार, एखादी गोष्ट कर्ज घेऊन खरेदी केल्यानंतर कर्ज फेडत बसणाऱ्यांपैकी नसून; तिथल्या तिथेच जमेल तेवढे पैसे देणारे आहेत. आपल्यासारखा जोडीदार शोधण्यासाठी पैशाच्या बाबतीत सारखं तत्त्वज्ञान असणाऱ्या लोकांना महत्त्व देणारे ७६% लोक आहेत.

क्रेडिटकार्ड्स.कॉम यांच्या ‘प्रेम आणि पैसा’ या सर्वेक्षणात आढळून आले की, कर्ज घेणाऱ्या पुरुषांना विशेषतः लपवून क्रेडिट कार्ड कर्ज घेणाऱ्यांना त्यांच्या जोडीदाराने सोडून देण्याची शक्यता अधिक आहे. डेट करताना आपल्याला बऱ्याच व्यक्तींना जवळून पाहण्याची संधी मिळते. तुम्हाला पैशाच्या विचारांसोबत गोंधळलेले किंवा असक्षम वाटत असल्यास, त्याबद्दल अधिक उघडपणे बोलण्याची वेळ आली आहे नाही का? चला तर मग, लग्नाआधी जोडीदाराबरोबर फिरायला जाताना म्हणजेच पाश्चिमात्य भाषेत डेटिंगसाठी जाताना खर्च कोण उचलायचं कि अगदी टि. टि. एम. एम. करायचे ते कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. क्यूंकि दो रुपया भी बडी कामकी चीज होती है बाबू!!

सौजन्य: अर्थसाक्षर.कॉम

लेखन: अपर्णा आगरवाल

वरील लेख ‘अपर्णा आगरवाल‘ यांच्या https://elementummoney.com/ या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

मनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया:

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.