सायकलच्या दुकानापासून सुरु झालेली होंडा कम्पनीच्या यशाची कहाणी

होंडा

येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देत पुढे जाणारा, गिव्ह अप न करणारा माणूस यशाच्या शिखर पर्यंत पोहोचतोच पोहोचतो हे सांगणारी होंडा मोटर्स च्या यशाची कहाणी आम्ही तुम्हाला आज या लेखात सांगणार आहोत.

Honda Motor Pvt. Ltd. Company चे संस्थापक सोइचीरो (Soichiro) होंडा यांचा जन्म जपानमध्ये १९०६ ला झाला. सोइचीरो यांचे वडील लोहारकीचं काम करायचे आणि त्याबरोबर त्यांचं सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं. छोटा सोइचीरो वडिलांना सायकल रिपेअरिंगच्या कामात मदत करायचा. सायकल, गाड्या यांमध्ये त्याला लहानपणापासूनच आवड होती. त्याने ठराविक साच्यातलं शिक्षण असं जास्त घेतलंच नाही. वयाच्या पंधराव्या वर्षीच तो कामाच्या शोधात टोकिओला गेला. तिथे काही काम करून तो १९२८ साली गाड्यांच्या रिपेअरचा बिजनेस करण्यासाठी टोकॅटोहुन पुन्हा आपल्या घरी आला.

१९३७ साली सोइचीरोने छोट्या एंजिनांसाठी पिस्टन रिंग बनवण्याचे काम सुरु केले. या पिस्टन रिंग टोयोटाला विकण्याचा त्याचा प्लॅन होता. आणि झालेही तसेच, त्याला लवकरच टोयोटाला पिस्टन रिंग सप्लाय करण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. पण पुढे गुणवत्तेत काही अडचणी आल्याने मिळालेले कॉन्ट्रॅक्ट हातचे सोडावे लागले. पण सोइचीरोने प्रयत्न सोडले नाहीत.

आपल्या पिस्टन रिंगमध्ये आवश्यक ती गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये भेटी दिल्या आणि लवकरच गुणवत्तापूर्ण पिस्टनरिंग्स बनवायला सुरुवात केली. १९४१ साली टोयोटाने हे प्रॉडक्ट खरेदी केले. आणि आपले प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणात बनवून विकण्यासाठी सोइचीरोने ‘तोकाई सेकी’ नावाची कंपनी सुरु केली. कामाची गुणवत्ता आणि कम्पनीची प्रगती यामुळे टोयोटाने लवकरच यातील ४० टक्के शेअर्स खरेदी केले. टोयोटा आणि तोकाई सेकी म्हणजेच भविष्यातली होंडा यांमध्ये व्यापारी संबंध सुरु झाले. पण नेहिमी येणाऱ्या संकटांची मालिका काही थांबली नाही

हा काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. यामध्ये जपान नुसते हरलेच नाही तर नेस्तनाबूत होणं म्हणजे काय याचा प्रत्यय या देशाने घेतला. या काळात अमेरिकी सैनिकांनी फेकलेल्या गॅसोलीन कॅन्स सोइचीरोने कच्चा माल म्हणून वापरल्या. पुढे १९४५ मध्ये आलेल्या भूकंपामुळे प्लांट पूर्ण जमीनदोस्त झाल्याने त्याने कंपनी ¥ ४५०,००० मध्ये टोयोटाला विकली.

पुढे युद्धामुळे आलेल्या संकटांनी जपानची घडी विस्कटली. आणि लोकांना पायी चालणे किंवा सायकल चालवणे यावरच भर द्यावा लागला. खरा उद्योजक तोच असतो जो गरज ओळखून तशी निर्मिती करायला सुरु करतो. यावेळी सोइचीरोने छोटे इंजिन बनवून ते सायकलला लावून motorized bicycles बनवण्याची सुरुवात केली. या इंजिनांची मागणी वाढली तसे सोइचीरोने Tohatsu engine मार्केटमध्ये आणले. पुढे १९४९ मध्ये पहिली पूर्ण मोटरसायकल असलेले D – टाईप मॉडेल बाजारात आणले. लवकरच याची मागणी वाढली आणि १९६४ पर्यंत होंडा, मोटारसायकल बनवणारी जगातली सर्वात मोठी कम्पनी बनली. आणि पुढे होंडाने कार बनवायला सुरुवात केली.

आज रस्त्याने चालताना आपल्याला कित्येक होंडाची वाहने दिसतात. पण या मागे एका माणसाची जिद्द, अपार मेहेनत, कितीही संकटं आली तरी गिव्ह अप न करण्याची वृत्ती आहे हे माहित नसते. सायकलच्या दुकानापासून आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत जगातली बलाढ्य कम्पनी बनवण्याचा सोइचीरोचा हा प्रवास!!! अशीच तुमचीही काही स्वप्न असतील.. ती साकार करणं अशक्य न समजता त्या दिशेने काम करा… यश नक्की हाती येईल.

धन्यवाद..


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

1 COMMENT

  1. Sir mala Maza chota business kraicha ahe kaich Marg nai sapdt ahe 25 to 40,000 prynt ASA kuthla business krta yeil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.