शेळ्या चारत मोठी झालेली नजत बेल्कासम वयाच्या ३७ व्या वर्षी शिक्षण मंत्री होते?

असं म्हणतात की गरिबीत जन्म घेणं हा गुन्हा नसतो पण गरिबीतच मरणं हा गुन्हा असू शकतो.

हलाखीच्या परिस्थितीतून माणसाला बाहेर येण्यासाठी त्याची इच्छाशक्ती मजबूत असावी लागते, हातपाय गाळून हतबल न होता, निग्रहाने उभं राहिलं, आशावादी राहिलं तर हवं ते मिळवता येतं.

नजत बेल्कासम, फ्रांस मधल्या एका गरीब कुटुंबातली मुलगी. शेळ्या मेंढ्या चारत नजत लहानाची मोठी झाली. गरिबीतही आई वडिलांनी शक्य तसे शिक्षण दिले. आणि आपला अभ्यास एकाग्रचित्त होऊन नजत करत गेली. आणि हीच नजत बेल्कासम मोठी होऊन फ्रान्सची शिक्षण मंत्री झाली.

१९७७ साली नजत बेल्कासम चा जन्म मोरक्कोला एका मुस्लिम परिवारात झाला. वडील मजुरी करत आणि घरातले इतर सदस्य बकऱ्यांचं दूध विकून घरखर्च चालवायचे. सात भावंडांमध्ये दोन नंबरची बहीण असल्याने जवाबदारीचे भान तिला लहानपणापासूनच होते. शिक्षण घेत असताना दिवसभर मेंढ्या चारून घरी येऊन अभ्यास करणे हा तिचा दिनक्रम होता. अभ्यासात नजत हुशार होती.

पुढे नजत चे वडील कामाच्या शोधत फ्रान्सचे शहर अनिया इथे गेले. आणि नजतला सुद्धा तिथेच बोलावून घेतले. पॅरिसच्या पोलिटिकल सायन्स इन्स्टिट्यूट मधून तिने पदवी मिळवली. गरीब घरातल्या मुलांना. राहणीमानावरून इतरांकडून चिडवलं जाण्याचा त्रास होतो तसा तो तिकडे फ्रान्समध्ये सुद्धा नजतला सहन करावा लागला.

नजत बेल्कासम

पदवीनंतर लगेचच ती सोशलिस्ट पार्टी मध्ये दाखल झाली. नागरी अधिकारांसाठी तिने लढा दिला. लवकरच फ्रान्समधली सर्वात कमी वयाची शिक्षणमंत्री होण्याचा मान नजतने मिळवला. २००८ साली ती अल्पाईन हुन कौन्सिल मेंबर म्हणून निवडली गेली. २०१२ साली ती महिला अधिकार मंत्री झाली. आणि २०१४ साली ती फ्रान्सची शक्षणमंत्री झाली.

राजकारणात टार्गेट होत राहणं हे तसं जगभरात सगळीकडेच होतं. फ्रांस सुद्धा त्याला अपवाद नाहीच. एक मोरक्कन मुस्लिम आणि गरिबीत वाढलेल्या परिवरातली महिला मंत्री या सगळ्याच गोष्टी विरोधकांच्या हातातलं आयतं कोलीत होत्या. तिच्या कपड्यांवरून, लिपस्टिकवरून तिला लांच्छनास्पद शब्दात बोलणे, नको तसे आरोप लावणे हा पॉलिटिक्स मधला डर्टी गेम तिनेही अनुभवला. नुसता अनुभवलाच नाही तर सगळे हल्ले परतवून लावायला सुद्धा ती कमी नाही पडली.

तरीहि नजतच्या कहाणीतला हा भाग, कि ती लहानपणी शेळ्या पाळत शिक्षण घेऊन मोठी झाली. याची सत्यता पडताळण्याचा आम्ही प्रयत्न केला तर विकिपीडिया सोडून इतर बऱ्याच नावाजलेल्या माध्यमांवर हि बाब खरी असल्याचे दिसले. परंतु तरीही कठीण परिस्थितीतून लहान वयातच यशाचा मोठा पल्ला गाठणारी नजत बेल्कासम खूप काही शिकवून जाते.

नजतमध्ये आशा कोणत्या गोष्टी होत्या ज्या तिला जगावेगळं बनवून गेल्या? २०११ च्या एका सर्व्हे नुसार जगात प्रत्येक सेकंदाला ४ जीव जन्म घेतात. पण प्रत्येक जण असं असामान्य आयुष्य जगतो का? तर नाही…

नजतने तिच्या गरीब परिस्थितीवर मात केली ती तिच्या असामान्य गुणांमुळे…..

तर असे कोणते गुण नजतला मोठं करून गेले, विरोधाला न जुमानता पाय रोउन उभं राहायचं बळ तिला देऊन गेले ते कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा…

धन्यवाद.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय