Stress म्हणजे तणाव दूर करून रोजच्या जगण्यात उत्साह कसा आणावा?

तणाव

तणावात राहिल्याने होणारे दुष्परिणाम म्हणजे त्याने तुमची प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे कार्यक्षमता कमी होते. आणि परफॉर्मन्सवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.

आपल्याला तणाव कुठल्या गोष्टींचा येतो?….

तणाव हा आपल्या एखाद्या वैयक्तिक कारणावरून असू शकतो, ऑफिस किंवा व्यावसायिक कारणामुळे असू शकतो किंवा अगदी एखादी डिस्टर्ब करणारी बातमी मिळाल्याने सुद्धा असू शकतो.

कारण काही का असेना पण एवढं नक्की कि तणाव हि आपल्या मनाचीच एक अवस्था असते आणि केवळ आपणच त्याच्याशी मुकाबला करू शकतो.

तुम्ही जर तुमच्या तणावावर कंट्रोल नाही ठेवला तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो किंवा तणावाचं कारण जर व्यक्तिगत आयुष्याशी निगडित असेल तर त्याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधांवर सुद्धा होऊ शकतो.

तणावाला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करता?

टीव्ही बघता? पिक्चर बघता? मोबाईलवर गेम खेळता? किंवा अगदी बिछान्यावर आडवे पडून घेता….

पण त्याने होतं असं कि हे झाल्यांनतर यातून मोकळे झाल्यावर पुन्हा तेच विचार घोंगावायला लागतात. आणि वेळ हि वाया गेल्याने तणाव आणखी वाढू शकतो. हे असं कुठे तरी स्वतःला गुंतवून घेणं हा तात्पुरता उपाय ठरतो.

तर आता आपण तणाव दूर करण्यासाठी काही नामी उपाय बघू…

जर तुम्ही कामाच्या व्यापामुळे तणावात असाल तर आपल्या दिवसभराच्या कामाचे व्यवस्थापन नीट करा. एक टू डू लिस्ट बनवा. आणि त्यानुसार सगळी कामे. पूर्ण करा. याने आपल्या आवश्यक त्या कामांवर तुमचे लक्ष पण राहील.

आणि एक एक काम पूर्ण झाल्याचा आनंद मिळून कामांचा योग्य तो निपटारा झाल्याने सकारात्मकता पण येईल.

ताण तणावामुळे बरेचदा आत्मविश्वास डळमळीत होतो. जगण्यात रस वाटत नाही. काही करण्याची इच्छा सुद्धा राहत नाही. अशा वेळी बाहेर जा आणि एका अश्या सुहृदाला, मित्र, मैत्रिणीला भेटा जो तुमचा आदर करतो, तुमच्यावर विश्वास ठेवतो एवढंच नाही तर योग्य त्या वेळी तुमची प्रशंसा सुद्धा करतो.

याने तुम्ही मोटिव्हेट व्हाल. आणि स्वतःला त्या दृष्टिकोनातून बघितले तर तुमच्या आतमधला आत्मविश्वास पण वाढण्यास मदत होईल.

तणावाला घालवण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे सगळे काम बाजूला ठेऊन फुरसतीच्या वेळात करण्यासारख्या काही ऍक्टिव्हिटीज करा छंद जोपासा.

पण या ऍक्टिव्हिटीज अश्या असाव्यात ज्यात तुमचा सक्रिय सहभाग असेल. म्हणजे टीव्ही बघणे, मोबाईल स्क्रोल करणे हे न करता अगदी डान्स, चत्रकला असे आपल्या आवडीचे छंद जोपासा आणि त्यात काही वेळ मन रमवून ताजे तवाने होऊन कामाला लागा.

याशिवाय तुम्हीही तुमच्या रोजच्या जगण्यात तणाव घालवण्यासाठी काही उपाय करून बघितले असतील. कमेंट्स मध्ये तणाव घालवून रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही कुठले उपाय करतात ते सांगायला विसरू नका.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

4 thoughts on “Stress म्हणजे तणाव दूर करून रोजच्या जगण्यात उत्साह कसा आणावा?”

 1. मी ग्रामिण भागात काम करणारा एक प्राथमिक शिक्षक आहे. वय ५६. माझेकडे कायमच इ.६ ते ८ या वर्गांचे विज्ञान आणि मराठी हे विषय असतात, अगदी सेवेत रुजू झाल्यापासून. पगारही भरपूर आहे. पण….
  आमच्या जिल्हा परिषदांच्या शाळांतील इ. ६,७,८ वीच्या निम्मे विद्यार्थ्यांना वाचण्याचा प्राॕब्लेम असतो. म्हणजेच जेव्हा दुसऱ्या शिक्षकाच्या हाताखालील पाचवी पास होऊन ती बॕच जेव्हा सहावीत माझ्या हाताखाली येते आणि शाळा उघडल्यावर पहिल्या दिवशी मी चाचपणी करतो तेव्हा असं लक्षात येतं की ३५ पैकी २५ मुलांना तर मराठीही वाचता येत नाही. तेव्हा मनावर प्रचंड तणाव येतो. हे दरवर्षीचेच आहे. शाळेतील इतर सहकार्यांना जेव्हा मनावर आलेल्या तणावाचे कारण सांगतो तेव्हा ते हसण्यावारी नेतात. मुलांना वाचता येवो अथवा न येवो त्याने आपल्या पगारावर काही फरक पडतो का असा प्रश्न मलाच पडतो. थोडावेळासाठी फ्रस्टेशन येतं. पण घरी जाऊन स्वेट मार्डेनची दोन तीन पुस्तके वाचून काढतो, जीवतोड मेहनत घेणाऱ्या शिक्षकांशी शेअर करतो, एखाद्या उमद्या अधिका-याशी चर्चा करतो. एक पक्के लक्षात ठेवतो-आपल्याला ७७ हजार रू. पगार आहे. समवयीन काॕन्व्हेंट शिक्षकाला १५ हजार रू. पगार आहे. म्हणजे मला त्याच्यापेक्षा ५ पट अधिक. आता मनाला थोडी उभारी येते. येणाऱ्या शनिवारी तुळजापूरला जातो दरवर्षीच. आई भवानीला शरण जातो आणि तिच्या पायाशी एकच मागणं मागतो, “आई, मी तुझां लेकरू. प्रयत्नांची पराकाष्ठा मी करिन. तू फक्त कृपा असू दे.”
  परत येऊन नव्या ऊर्जेने असा भिडतो, शाळेत दररोज ९-१० तास न थकता काम करण्याची ऊर्जा आई भवानी देते. पाहता पाहता मेहनत फळाला येते.
  ज्यावेळी ती बॕच सहावी पास होऊन सातवीत जाते त्यावेळी ती अंतर्बाह्य बदललेली असतात. वाचता येत नाही म्हणून सदा हिरमूसलेला राहणारा माझा प्रविण आता खाडखाड वाचतो. सदैव मागच्या कोपर्यातील बेंचवर बसणारी आणि वाचायला लावलं की वाचता येत नाही म्हणून केविलवाण्या नजरेने पाहणारी माझी सीमा आता आत्मविश्वासाने ओथंबलेली असते.
  माझ्या हाताखाली ज्यावेळी ही बॕच आठवा वर्ग पास करून बाहेर पडते तोपर्यंत त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये पारितोषकं पटकावलेली असतात. फिजिकली आणि मेन्टली पोलाद झालेली असतात. इतकी की-त्यांना नववीपासून शिक्षणासाठी शहरात येणेजाणे करावे लागते. मजनू मुलींची छेड काढतात. त्या मला येऊन सांगतात. मी टग्यांचे समुपदेशन करतो. काही जबर असतात. मी माझ्या मुलींना परवानगी देतो. दहा बारा जणी मिळून अशी धुलाई करतात की तो चिडीमारी विसरूनच जातो. मी या मुला-मुलींना कमांडो ट्रेनिंग देत असतो.
  अनेक माजी विद्यार्थी बायकोला-नवर्याला घेऊन भेटीसाठी येतात. आशिर्वाद घेतात. सर मी या गावचा. अमुक वर्गात अमुक वर्षी मी तुमच्या हाताखाली होतो, आता या पदावर आहे. हे सांगतात तेव्हा आनंदाश्रुंनी दोघांचेही डोळे पाणावतात. सगळा कामाचा तणाव निवळतो. पुन्हा सहावीची निरक्षर बॕच ताब्यात घेण्यासाठी नव्या उमेदीने तयार होतो.
  .

  1. सरं!अगदी वास्तविकता मांडली तुम्ही ग्रामीण भागात सगळीकडेच ही परिस्थिती आहे. पण तुमच्यासारखे शिक्षक आत्मियतेने विद्यार्थी घडवतात.व विद्यार्थ्यांवर प्रेम करता. अभिनंदन सरं !

   1. नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

    मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

    #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

    व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

    https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

    टेलिग्राम चॅनल👇

    https://t.me/manachetalksdotcom

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.