ब्रिटिश संसदेला पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पावले उचलायला लावणारी ‘ग्रेटा थनबर्ग’

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाशी निगडित विषय हे आपल्याकडे च्युइंगमसारखे चघळायचे विषय बनले आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याच्या गप्पा मारायच्या, पर्यावरण विषयक एखाद्या दिनाचं औचित्य साधून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी एखादी रॅली काढायची. फार तर फार, दोन-चार झाडेलावायची, पर्यावरण वाचविण्यासाठी विद्वत्तापूर्ण तर्कांचे फुगे फुगवून चर्चा करायच्या आणि सरकार नावाच्या यंत्रणेवर ठपका ठेवून हा विषय संपवायचा. ही आपल्याकडची पर्यावरण संवर्धनाची पद्धत.

यासंदर्भातील सरकारी शिरस्ता तर अधिक मजेशीर आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी दरसाल हजारो कोटी झाडे लावायचे उद्धिष्ट सरकार ठेवते आणि दरवर्षी त्याच खड्ड्यात वृक्षारोपण करण्याचा नवनवा विक्रम सरकारी फायलीत नोंदविल्या जातो.

प्रदूषण टाळण्यासाठीही सरकारडून पावले उचलल्या जातात. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना तंबी देण्यापासून ते प्लस्टिकबंदीसारखे लोकोपयोगी निर्णयही सरकार घेते. परंतु, दुर्दैवाने अमलबजावणीच्या पातळीवर त्यात हवे तसे यश दृष्टीक्षेपात येत नाही. ही चर्चा याठिकाणी करण्याचे कारण इतकेच कि, नुकतेच ब्रिटनने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि वाढते प्रदूषण रोखण्यासाठी ‘राष्ट्रीय पर्यावरण आणीबाणी’ जाहीर केली आहे. पर्यावरण आणि हवामानाला कर्बनवायूच्या उत्सर्जनाने निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन हे क्रांतिकारी पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कौतुकाची बाब म्हणजे एका सोळा वर्षीय स्वीडिश मुलीच्या प्रयत्नावर ब्रिटीश संसदेने ही संवेदनशीलता दाखवली आहे.

आकाश गंगेत असलेल्या असंख्य ग्रहांपैकी पृथ्वी हा एकमेव ग्रह सध्यातरी मानवजातीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या ग्रहाला जपण्याची जबाबदारी इथे राहणाऱ्या मानवाचीचं. हे सगळ्यांना कळतं पण, सहसा वळत कुणालाच नाही. अर्थात, पर्यावरण संवर्धनासाठी आपल्याकडे प्रयत्न होत नाहीत, असा याचा अर्थ नाही. प्रयत्न होतात. पण, हा विषय तितक्या गांभीर्याने घेतला जात नाही. मध्यंतरी प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी प्लस्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. दोन पाच महिने त्याची अमलबजावणीही करण्यात आली. परंतु, सध्या या बंदीची अवस्था काय? हे सगळ्यांनाच माहित आहे.

कार्बन वायूचे उत्सर्जन रोखण्यासाठीची उपाययोजना असो कि, पर्यावरण संवर्धनाचे विविध प्रयत्न असो, सगळ्यांची अवस्था सारखीच झाली आहे. अमलबजावणीत सातत्य आणि गांभीर्याचा अभाव असल्याने प्रत्येक निर्णय आणि धोरण कुचकामी ठरत असल्याचे नाईलाजाने नमूद करावे लागत आहे. याउलट ब्रिटनचे उदाहरण घेतले तर त्यांनी या विषयाला राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाइतके गांभीर्याने हाताळल्याचे दिसून येते.

ग्रेटा थनबर्ग या युवतीने काही दिवसांपूर्वी थेट ब्रिटिश संसदेत सरकारची या मुद्यावरून चांगली खरडपट्टी काढली. ब्रिटन पर्यावरण रक्षणासाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याची प्रखर टीका ग्रेटाने पुराव्यानिशी केली. वसुंधरा परिषदेला दिलेली वचनेही ब्रिटनने मोडली असल्याचा दावा ग्रेटाने यावेळी केला. महत्वाची गोष्ट म्हणजे, ब्रिटन सरकारमधील प्रतिनिधींनी ग्रेटाचे संपूर्ण युक्तिवाद गंभीरपणे ऐकून घेतले. पर्यावरण खात्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी तर ‘आम्ही खरोखर कमी पडतो आहोत,’ अशी कबुली सुद्धा देऊन टाकली. पर्यावरणाचा मुद्दा गंभीर असल्याचे सर्वांनी मान्य करत ग्रेटाच्या व्याख्यानानंतर अवघ्या आठ दिवसात ब्रिटन सरकारने ‘राष्ट्रीय पर्यावरण आणीबाणी’ ची घोषणा केली आहे.

पर्यावरण रक्षणाची हिरवी हाक देणारे ब्रिटन जगातील पहिले राष्ट्र बनले आहे. ब्रिटननें मांडलेल्या या ठरावात विविध पर्यावरणीय उद्दिष्टे मांडण्यात आली असून २०५० पर्यंत ‘निव्वळ शून्य कर्ब उत्सर्जना’चे ध्येय ठेवण्यात आले आहे. विकासाच्या वेडापायी पर्यावरणाची आणि पृथ्वीची पर्वा न करणाऱ्या जगासाठी हा निर्णय दिशादर्शक आणि अनुकरणीय आहे. प्रदूषणाच्याच्या समस्येने आज संपूर्ण जगाला वेढले आहे. दिवसेंदिवस हवामानात होत असलेला बदल संपूर्ण मानवजातीसाठी धोकादायक ठरू लागला आहे.

भारतही त्याला अपवाद नाही. लहरी हवामानाचा सर्वाधिक फटका आपल्या देशातील कृषी व्यवसायला दरवर्षी बसतो. त्यासोबत दुष्काळ, पूर, चक्रीवादळ आदी नसर्गिक संकटही सातत्याची. गेल्या वर्षी राजधानी दिल्लीचे ‘गॅस चेंबर’ झाल्याचे आपल्याला आठवत असेलच. वाढलेल्या प्रदूषणामुळे हवा दूषित झाली आणि दिल्लीकरांवर तोंडाला मास्क बांधून फिरण्याची वेळ आली होती. नुसती दिल्लीच नाही तर देशातील अनेक मोठी शहरे या प्रदूषित शहरांच्या यादीत सामील झाली आहेत. विषारी वायूचा धुकं अधिकाधिक गडद होऊ लागलं आहे. आजवर निसर्गाने आपल्याला भरभरुन दिल, पण आपण मात्र निसर्गाप्रती कृतघ्नच राहीलो. त्याचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने निसर्ग लहरी झाला आहे. ग्लोबल वार्मिंगच्या समस्येने अवघी मानवजात धोक्यात आली आहे. त्यामुळे आतातरी आपल्याला पर्यावरण संवर्धनाकडे गांभीर्याने बघावे लागेल.

विकास, प्रगती आणि सुखनिर्मितीच्या धुंदीत धुंद झाल्याने आज आपल्याला पर्यावरणाच्या ऱ्हासाचे किती विपरीत परिणाम होतील, हे कदाचित जाणवत नसावे. परंतु निसर्ग छोट्या-मोठ्या घटनांमधून त्याची जाणीव आपल्याला करून देत असतो. निर्सगाचा हा इशारा आपण वेळीच समजून घेतला पाहिजे. पर्यावरण संवर्धन हे इव्हेन्ट म्हणून करण्यासाठी नाही तर ते गरज म्हणून करण्याची वेळ आता आली आहे. एकेकाळी ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हता, त्या इंग्लडने समजूतदारी दाखवून पर्यावरणविषयी आपली बांधिलकी अधोरेखित केली…आता आपली वेळ आहे. इंग्लडने लोकशाहीची प्रणाली आणल्यानंतर संपूर्ण जगाला या व्यवस्थेने भुरळ घातली होती. आज पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ब्रिटनने एक साकारात्मक पाऊल उचलून पुन्हा एक नवी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.. जगाने याही व्यवस्थेला स्वीकारावे, ही काळची गरज म्हणावी लागेल…!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय