एखाद्याने जर आपल्याला प्रश्न केला, की तु आनंदी केव्हा होणार? तर तात्काळ आपल्या आतुन काही उत्तरे येतील,
XXXXXXXXXX रक्कम मिळाल्यानंतर…
चांगली नौकरी/व्यवसाय, एक मस्त बंगला, शानदार गाडी, मिळाल्यानंतर…
सुंदर जीवनसाथी, गोंडस मुले, सुदृढ शरीर, मिळाल्यानंतर…
समाजात मानसन्मान मिळाल्यानंतर.
मित्रांनो, काहीतरी मिळाल्यावर आनंदी होणार, याचाच अर्थ आत्ता या क्षणी आपण आनंदी नाही.
निशंकपणे सारी स्वप्ने पुर्ण करायचीच आहेत, स्वप्नपुर्ती आणि ध्येयप्राप्तीच्या दिशेने, १००% प्रयत्न करायचेच आहेत.
पण खरा आनंद तर मनाच्या एकाग्रतेमध्ये लपलेला आहे. खेळ खेळताना, तल्लीन होवुन एखादं सुरेख गाणं ऐकताना, मन लावुन एखादं काम पुर्ण करताना, पुर्णत्वाचा, तृप्तीचा खरा आनंद मिळतो.
जरा वेळ रिकामं बसलं, की आपलं मन, चटकन भुतकाळातल्या ‘कडुगोड’ आठवणींकडे धावतं, किंवा…भविष्यात काय होईल ह्या स्वप्नरंजनांकडे किंवा भीतीकडे धावतं…
भुत भविष्याच्या विचारांचं ओझं असलेलं मन, हलकं फुलकं, चिंतामुक्त आणि आनंदी राहु शकेल का?
आपण स्वतःच ‘बिनकामाचा’, आणि ‘गरजेपेक्षा जास्त’ विचार करुन आपल्या जगण्याचा निर्भेळ आनंद हिरावुन घेत नाहीयेत ना?
केवळ ‘ध्येयप्राप्ती’ म्हणजे सुख नाही, ‘ध्येयाकडे जातानाचा प्रवास’ हा देखील काही कमी ‘मजेशीर’ आणि ‘आनंददायक’ नाही.
तो रस्ताच एंज्यॉय करायचाय, आणि त्यावर येणारे अडथळे, स्पीडब्रेकर आणि ‘खाचखळगे’ देखील एंज्यॉय करायचे!…
कारण मित्रांनो, ‘हा’ गेलेला ‘अनमोल क्षण’ पुन्हा येणार नाही.तेव्हा खरा आनंद वर्तमान क्षणात आहे.तो पुर्णपणे जगा, त्याचा पुरेपुर आनंद घ्या.
सारी दुःखं, चिंता, उद्विग्नता चुटकीसरशी ‘छुमंतर’ होतील.
आठवणींचे आणि चिंता-काळजीचे गाठेडे फेकुन हलकं हलकं व्हा!..
बघा, आयुष्य किती सुंदर आहे ते!
आजचा दिवस ‘अक्षय्य तृतीये’चा पवित्र दिवस!, वर्तमान क्षणात जगण्याची कला ज्याला जमली, त्याच्या जीवनात ‘आनंदाचा क्षय’ कधीच होणार नाही.
जीवन अधिकाधिक ‘आनंदी’, ‘खेळकर’ आणि ‘रुचकर’ बनण्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा