मुकेश अंबानींबद्दलचे काही माहित नसलेले किस्से

मुकेश अंबानी

भारतातले सर्वात श्रीमंत म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी. सर्वांनाच कुठेतरी यांचा किंवा या कटुंबाचा सुप्त हेवा असतोच आणि कौतुकही असतं…

पण मुकेश अंबानींबद्दल आजही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला जास्त माहित नाहीत.

असेच काही किस्से…

मुकेश अंबानी

धीरूभाई अंबानींचा सर्वात मोठा मुलगा असलेले मुकेश लहानपणा पासूनच अभ्यासात हुशार होते. ते सांगतात कि त्यांचे स्वप्न हे कधीच जास्तीत जास्त पैसे कमावणे हे नव्हते तर चॅलेंजेस एक्सेप्ट करणे हे होते!!

यशस्वी लोक हे चांगले वाचक असतात असे म्हंटले जाते. मुकेश यांनाही वाचनाचा चांद आहे. नवनवीन तंत्रज्ञानाविषयीची माहिती ते वाचनातून घेत असतात.

मुकेश अंबानी यांचा जन्म यमन मध्ये झाला. त्यावेळी धीरूभाई तिथल्या एका फर्ममध्ये नोकरी करायचे. पुढे १९५८ मध्ये ते मुंबईत आले.

मुकेश अंबानी

धीरूभाईंचे मत होते कि मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे होणार नाही. म्हणून बरेच लोकांच्या इंटरव्यू घेऊन त्यांनी घरी मुलांसाठी एक ट्यूटर ठेवला. या ट्यूटरचं काम शालेय अभ्यास न शिकवता जनरल नॉलेज देण्याचं होतं. चालू घडामोडी, खेळ, व्यवहारज्ञान या गोष्टीतही मुलांचे ज्ञान वाढावे हा यामागचा उद्देश. लहान असताना ते दर वर्षी कुठल्या गावात जाऊन १०-१५ दिवस कॅम्पिंग करायचे.

मुकेश सांगतात कि त्यांची केमिकल इंजिनिअरिंग बद्दलची आवड निर्माण झाली होती ती त्या काळची गाजलेली फिल्म ‘दि ग्रेजुएट’ बघून. त्या सिनेमात सुद्धा पॉलिमर्स आणि प्लास्टिक बद्दल उल्लेख होताच. कॉलेजमध्ये शकत असतानाच त्यांनी रिलायन्समध्ये काम करणे सुरु केले होते. IIT Bombe नंतर त्यांनी स्टैनफोर्ड युनिव्हर्सिटी उच्च शिक्षणासाठी निवडली.

गुजराथी असलेल्या मुकेश अंबानींना साऊथ इंडियन डिशेश आवडतात. माटुंग्याच्या मैसूर कॅफेमधला इडली संभार मुकेश विशेष आवडीने खातात. याबद्दलची माहिती मैसूर कॅफे मोठ्या अभिमानाने नमूद करतं कि ‘UCDT चे विद्यार्थी असताना १९७३ ते १९७७ या काळात मैसूर कॅफेचा इडली संभार मुकेश याचा फेव्हरेट होता’

मुकेश यांचे घर ‘अँटिलीया’ हे साऊथ मुंबईच्या पेडर रोडवर जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. असं म्हंटल जात कि ब्रिटनच्या राणीचे सरकारी निवासस्थान असलेल्या ‘बकिंगहॅम पॅलेस’ नंतर दुसऱ्या नंबरची महाग असलेली वास्तू म्हणजे ‘अँटिलीया’.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!