अनपेक्षित

एकतर बनेश्वरला जायचा कोणताही प्लान आमचा नव्हता. पण गुगलच्या गोंधळाने म्हणा किंवा कृपेने, पण आम्ही बनेश्वर कडे निघालो.
कधी कधी आपल्याला असे अनुभव येतात कि जे अनेकदा अनपेक्षित असतात. एकदा मी आणि काही सहकाऱ्यांनी सिंहगडावर जायचा प्लान केला.
पुण्यातील भूलभुलैयात आपण अडकू नये म्हणून गुगल च्या भरवश्यावर गाडी सिंहगडाच्या दिशेने रेपाटत होतो. गुगल ने आम्हाला कात्रज बोगद्यापाशी आणल्यावर मात्र गुगलचा गोंधळ किंवा नक्की काहीतरी प्रोब्लेम झाला असा विचार करून काय करावे? अश्या विचारात असताना अचानक बनेश्वरच नाव पुढे आल.
अनेक वर्षापूर्वी ह्या मंदिराला भेट दिली होती. तेव्हापासून ह्या मंदिराने तिथल्या परिसराने मनात घर केल होत. आणि आता गुगलने आणलेच आहे तर मंदिरात जाऊन दर्शन घेऊ याविचाराने कात्रज वरून बनेश्वरकडे प्रयाण केले.
साधारण दुपारच्या १:२० ला मंदिरात पोहचलो. दुपारी १२ ते २ ह्या वेळात खरे तर मंदिर बंद असते. पण तरीही कुतुहलाने मंदिरापाशी जाताच कुणा एका भल्या गृहस्थाने त्यांच्या मागे येण्याची खुण केली.
आत जाताच त्यांनी शिवपिंडी समोरील गेट उघडून गाभाऱ्यात प्रवेश केला. आम्हालाहि आत येण्याची खुण केली. आरामात दर्शन घेऊन आम्ही बाहेर येताच गाभारा पुन्हा बंद झाला. बाहेर अनेक लोक ताटकळत असताना आमच दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
एकतर बनेश्वरला जायचा कोणताही प्लान आमचा नव्हता. पण गुगलच्या गोंधळाने म्हणा किंवा कृपेने, पण आम्ही बनेश्वर कडे निघालो.
त्यात बाहेर असलेल्या कोणत्याही दुकानातून काही न घेता मंदिरात प्रवेश केला. थोडा वेळ समोरील कुंडात मासे बघताना अचानक देवळात आत जाऊन बघण्याचा आलेला विचार. त्या माणसाने आम्हाला त्याच्या मागे येण्याची केलेली खुण. देऊळ बंद असताना फक्त नैवैद्यासाठी उघडले असताना शंकराच्या पिंडीचं झालेल दर्शन अगदी मनोभावे!
बाहेर येताच बंद झालेलं मंदिर. सगळच अनपेक्षित! डेस्टिनी वर माझा विश्वास आहे. पण मनात कुठेही नसताना गोष्टी अश्या जुळून आल्या कि मी निशब्द झालो. म्हणजे त्याच वेळी तिकडे जाणं, त्याच वेळी मंदिरात प्रवेश करणं, पुजाऱ्याने मागे येण्याची खुण करणं आणि नंतर मनोभावे झालेल दर्शन सगळच अनपेक्षित.
अनेकदा आपल्या प्रत्येकाला असे अनुभव येतात कि जे निशब्द करणारे असतात. आपल्याला जाणीव होते कि त्या वेळेला आपण “चोझन वन” असतो.
गोष्टी अश्या तऱ्हेने समोर येत जातात कि जणू काही आपलीच वाट बघत अश्याव्यात. नियती गोष्टी अश्या फिरवते कि ज्या गोष्टींची उत्तरं विज्ञान पण देऊ शकत नाही. कधी चांगल्या तर कधी वाईट घटनांसाठी. अनेकदा आपण ऐकतो कि गोष्टी प्लान केलेल्या नसताना आपण त्या करत जातो.
अगदी मनात आलेल्या विचारापासून ते अगदी आपली वाट चुकेपर्यंत. आपण अस काही करत जातो जस काही कोणी आपल्याकडून करवून घेते आहे. आपण अचानक मृत्यू जवळ जातो.
आपण अचानक एक नवीन जन्म घेतो. कधी एखाद्या शक्तीचं दर्शन असो वा कधी आपल्याला मनापासून करावीशी वाटणारी गोष्ट असो. आपल्या सभोवती असणाऱ्या गोष्टी अनेपेक्षित असं वळण घेतात ज्याची आपण कधी कल्पना केलेली नसते.
श्रद्धा असावी का नसावी हा ज्याच्या त्याच्या विचारांचा भाग झाला. पण काही गोष्टीत विज्ञान तोकड पडते. तिकडे त्या गोष्टीच उत्तर हे श्रद्धेतून मिळते.
कोणी त्याला योगायोग म्हणो वा कोणी दैवी शक्ती पण ह्या सगळ्यात एक गोष्ट नक्की असते ती म्हणजे ह्या गोष्टींच अनपेक्षित असण! अश्या गोष्टी प्रचंड टोकाचे अनुभव आणि अनुभूती देऊन जातात.
एकतर टोकाचा हादरा अथवा टोकाचा आनंद. कारण अनपेक्षित गोष्टीतला तो “सरप्राईज एलिमेंट” नेहमीच अश्या घटनांना वेगळ करतो.
देव आहे का नाही हा भाग वेगळा. पण कुठेतरी अनामिक शक्तीचा वावर आपल्या सोबत असतो. ह्याचा अनुभव आपल्यापेकी प्रत्येकाने घेतलाच असेल.
म्हणून विज्ञान जिकडे थांबते तिकडे ह्या शक्तींचा उगम होतो ज्या अनंतात विलीन झाल्यानंतरहि जाणवत रहातात. अश्या घटना आपल्याला अनेक प्रश्न पाडून जातात. का? कसे? केव्हा?
अश्या का चा बाराखडी मधील सगळे प्रश्न विचारून जातात. कधी उत्तरं मिळतात तर कधी अजून प्रश्न निर्माण होतात. पण शेवटी एकच गोष्ट आपल्या सोबत असते ती म्हणजे त्या घटनांच अनपेक्षित असणं!
आणि हो तुमचेही असेच अनपेक्षित अनुभव असतील तर नक्कीच अभिप्रायात सांगा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
तुमची तीव्र इच्छा असल्यास ही वैश्विक शक्ती तुम्हाला तिचे अगम्य रूप नक्की दाखविते ! या दर्शनाचा उद्देश काहीही असू शकतो, जास्त करून तुम्हांला हुरूप आणण्यासाठी, प्रोत्साहनात्मक किंवा सावधगिरीची सूचना म्हणून !
वेगळा अनुभव