हिरकणी कथा

जागतिक मातृदिना निमित्त दिवसभर खूप सुंदर संदेश वाचायला मिळतील. यामध्ये तर अनेकांनी आपल्याच माते बद्दल लिहिले होते.

सहज आज जिजाऊमातेची आठवण झाली. लगेच डोळ्यासमोर स्वराज्याची राजधानी रायगड आली.

मन चक्षूंपुढे रायगडाचा परीसर दिसू लागला. टकमक टोक, दरबार आणि पुढे दिसला हिरकणी बुरुज. . .

नकळत मन त्या माते बद्दल विचारात रमू लागले. रायगडा बद्दल माहित नाही अशी व्यक्तीच दुर्मीळ.

प्रत्यक्ष जाऊन आलेले कमी असतील ही, पण ऐकून वाचून आम्ही सर्व रायगडाला पाहून आलो आहोतच. आणि हिरकणीची कथा सर्वांनी ऐकली असेलच….

रायगडाच्या पायथ्याखाली असणारे एक वाळेसर नावाचे छोटेसे गाव…. त्या गावातील एक धनगर कुटूंब. कुटूंबाचा उदरनिर्वाह घरातील गुरांचे दुधावर चाले….

घरातील दुध गडावर घेऊन जाण्याचे काम ह्या घरातील स्त्री हिरा करायची….

हिरा ही एका तान्हुल्याची माता. त्या दिवशी पण ती गडावर पोहचली दुध विकायला.

पण संध्याकाळ होऊन गेली. आता तिच्या लक्षात आले की गडाचे दरवाजे बंद झाले असणार. रायगडावर जाण्यायेण्यासाठी फक्त मुख्य दरवाजा….

रायगडाचे दरवाजे बंद झाले की फक्त वारा आणि पाऊसच गडावर पोहचायचा. हिरा जाऊन दरवाज्या जवळ असणार्‍या शिपायांना विनवणी करू लागली.

पण काही उपयोग झाला नाही. तिला गडावरून घरी जाणं गरजेच होतं. तिचा तान्हुला तिची वाट पाहत होता. तान्ह बाळ आई शिवाय किती वेळ राहणार होते…

ह्या मातेला आता डोळ्यासमोर फक्त बाळाचा चेहरा दिसत होता…. आता कुठल्याही परिस्थतीत घरी पोहचायचं आहेच. आणि ह्या मातेचा निर्णय इतिहासाला दखल घ्यायला लावणारा होता…

आता ती एकटीच गडावर फिरू लागली. खाली उतरण्यासाठी रस्ता शोधू लागली. ४४०० फुट उंचावरून आता ह्या मातेने खाली उतरायला सुरवात केली….

रात्रीची वेळ सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरलेले. रातकिड्यांचा शांतता भंग करणारा आवाज. त्याच आवाजामध्ये एखाद्या हिंस्त्र जंगली पशूचा आवाज. सगळी झाडे झुडपं पसरलेली.

त्या सार्‍यामधून ही माता वाट काढत घराकडे निघाली. आता तिला ह्या घनदाट जंगलाचे भय वाटत नव्हते. कुठल्याही पशुपक्ष्यांचे किंवा इतर कुणाचे भय वाटत नव्हते.

कारण आता ती एक सामान्य स्त्री नव्हती. तर ती आता वात्सल्याने भरलेली फक्त माता होती. आता तिच्या चेहर्‍यासमोर भूकेने व्याकूळ, रडणारे तिचे बाळ दिसत होते…

ज्या गडाच्या मुख्य दरवाजा खेरीज कुणाला जाणं येणं शक्य नाही.

आजूबाजूने गडावरून उतरणं किंवा गडावर चढणं अशक्यच पण ते अशक्यप्राय काम ह्या मातेने केले होते… ती घरी पोहचली त्या वेळेस तिच्या सर्वांगावर जखमांचे साम्राज्य पसरले होते…

घरी पोहचल्यावर तिने बाळाला उचलून घेतले आणि तिला तिच्या जखमांचा विसर पडला… दुसर्‍या दिवशी महाराजांना ही बातमी समजली.

गड उतरून जाणं ही अशक्यप्राय गोष्ट होती…. महाराजांनी बोलवून त्या मातेचा सन्मान केला…

ती उतरली त्या ठिकाणी बुरुज बांधला त्याला हिरकणी बुरुज नाव दिले….

आज जागतिक मातृदिना निमित्त या मातेचे स्मरण होणं हे मी माझे भाग्य समजतो.

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय