ती शांत वाहत होती…

तळाशी साचलेले लपवत होती
अडथळे वाटेतील चुकवत होती
चांगले वाईट सामावून स्वतःमध्ये
आजही ती….शांत वाहत होती.
माता म्हणून कधी मिरवायची ती
अभक्षासही सहज जिरवायची ती
कुणीही यावे अंतरंग ढवळावे,
पाण्यात आसवांना वाहवायची ती.
किती अतिक्रमणे किती बांध
लुटले किती परी फुटला ना बांध.
सहज सोसते आल्या महापूरा
स्मरूनि शिक ‘सुख समजून नांद’
अलिकडे जरासा कोरडेपणा मनात
अंतरी उमाळा परी तिष्ठावे किती उन्हात?
तिही शिकलीय बांध घालाया परी..
वळीव एखादा घेऊन घुसते अंगणात…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.