निक व्युजेसिक – हात पाय नसून सुध्दा आयुष्याला कवेत घेणारा मोटिवेशनल स्पीकर

निक व्युजेसिक

वयाच्या एकोणाविसाव्य्या वर्षी निक मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून ओळखला जाऊ लागला. २००९ साली The Butterfly Circus या शॉर्ट फिल्मसाठी निकला बेस्ट ऍक्टर म्हणून पारितोषिक सुद्धा मिळाले. २००८ साली त्याचे प्रेरणादायी भाषण ऐकण्यासाठी आलेली Kanae Miyahara हिच्याशी झालेली ओळख प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न केले. आज निक कॅलिफोर्नियामध्ये आपली पत्नी आणि मुलांसमवेत समाधानी आयुष्य जगतो आहे.

४ डीसेम्बर १९८२ ला ऑस्ट्रेलिया मधल्या एक मध्यमवर्गीय घरात एक मुलाने जन्म घेतला.

जन्म झाला आणि नर्स बाळाला जेव्हा त्याच्या आईकडे घेऊन आली तेव्हा तिने आईला आपल्या बाळाला घ्यायलाच नाही तर बघायला सुद्धा मज्जाव केला होता.

पण पुढे हळूहळू व्युजेसिक दाम्पत्याने परिस्थितीला सामोरं जाण्याचा धीर एकवटला. बाळाचं नाव आई वडिलांनी मोठ्या उत्साहात निक व्युजेसिक ठेवलं.

निक इतर मुलांसारखाच होता पण जन्मतः च टेट्रा अमेलिया सिंड्रोम या एका दुर्लभ आजाराने त्याला घेरले होते. यामुळे त्याला हात आणि पाय दोनीही नव्हते. या आजाराचे जगभरात दहा पेक्षा कमी लोक आहेत आणि त्यातला एक निक.

आजार दुर्लभ असल्याने यासाठी योग्य तो उपचार मिळणे कठीण होते. आणि खरं तर हात आणि पाय दोन्ही जन्मतःच नसल्याने या मुलाला अपंगत्वावर विजय मिळवून जगणे शिकवणे हे मोठे आव्हान आई वडिलांसमोर होते.

जन्माच्या वेळी निकच्या एका पायाच्या ठिकाणी दोन जोडलेली बोटं तेवढी होती. डॉक्टरांनी ऑपरेशन करून ती बोटं अलग केली जेणेकरून त्या बोटांच्या साहाय्याने निकला काही वस्तू पकडणे शक्य होईल.

अडी अडचणी धडधाकट माणसाला हतबल करतात. निक तर जन्मापासूनच हे भोग भोगत होता. अभ्यास, खेळ इतकंच काय रोजची कामं करणं सुद्धा निकसाठी सोपं नव्हतं.

असं जगणं नको म्हणून त्याने दहा वर्षांचे असतानाच आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण निकची आई धीराची होती. तीने निकला प्रेम आणि जगण्याची उर्मी देऊन निराशेच्या गर्तेतून बाहेर काढलं.

निकच्या आई वडिलांना त्याला पूर्णपणे स्वावलंबी करायचे होते. लहान असतानाच त्यांनी त्याला पोहायला शिकवले.

पायाच्या ठिकाणी असलेल्या भागाला सर्जरी करून बेटांचे रूप दिले त्याच्या मदतीने टाईप करणे, पेन पकडणे, पान उलटणे या गोष्टी त्याला शिकवल्या.

निकच्या आई वडिलांनी त्याला स्पेशल मुलांच्या शाळेत टाकायला विरोध केला. आणि सामान्य मुलांच्या शाळेत त्याला शिकवायला सुरुवात केली. यामुळे त्यांना टीकेचं धनी सुद्धा व्हावं लागलं.

पण निकच्या भविष्यासाठी जणू त्यांनी आपलं आयुष्यच आता पणाला लावलं होतं. सामान्य मुलांच्या शाळेत टाकल्याचा फायदा असा झाला कि निक सामान्य मुलांसारखंच सगळं काही करण्याचा प्रयत्न करत राहिला. आणि त्याला ते जमलं सुद्धा.

पंज्या सारख्या बोटांच्या मदतीने निकने केवळ लिहिणे, वाचणेच नाही तर फुटबॉल, गोल्फ खेळणे अशा अशक्यप्राय गोष्टी सुद्धा केल्या. ड्रम वाजवणं, पेंटिंग करणं, स्काय डायविंग करणं… कशातच निक मागे नाही राहिला.

आज तोंडाच्या मदतीने गियर बदलून निक कार सुद्धा चालवतो.

निक व्युजेसिक
निकच्या आयुष्याला कलाटणी केव्हा मिळाली?

प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक घटना घडते तिच्यापासून तिला उठून उंच उडण्याची प्रेरणा मिळते. तसेच निक तेरा वर्षांचा असताना त्याच्या आईने त्याला वर्तमानपत्रातला लेख वाचून दाखवला.

त्यात एका अपंग माणसाच्या संघर्षाची आणि यशस्वी होण्याची कहाणी होती. तेव्हा निकला जाणवलं कि जगात असा तो एकटाच नाही. यातून सुद्धा तो स्वतःला घडवू शकतो.

त्याने मनाशी निश्चय केला कि लोकांची निराशा, निरुत्साह घालवण्यासाठी त्याला आता लोकांसमोर जायचं आहे. तशी त्याची निराशा झटकून तो उत्साहाने आयुष्य जगायला शिकला तसंच लोकांनासुद्धा जगायला शिकवायची उर्मी त्याच्या ठायी जागी झाली.

निक व्युजेसिक

वयाच्या एकोणाविसाव्य्या वर्षी निक मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून ओळखला जाऊ लागला. अकौंटिंग फायनान्समध्ये त्याने पदवी सुद्धा घेतली.

२००७ मध्ये त्याने Attitude is Altitude नावाने कम्पनी चालू केली. आणि मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून तो नावाजला जाऊ लागला. Life without limb नावाची सामाजिक संस्था सुद्धा त्याने चालू केली.

२००९ साली The Butterfly Circus या शॉर्ट फिल्मसाठी निकला बेस्ट ऍक्टर म्हणून पारितोषिक सुद्धा मिळाले.

२००८ साली त्याचे प्रेरणादायी भाषण ऐकण्यासाठी आलेली Kanae Miyahara हिच्याशी झालेली ओळख प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न केले. आज निक कॅलिफोर्नियामध्ये आपली पत्नी आणि मुलांसमवेत समाधानी आयुष्य जगतो आहे.

ज्या निकला आई वडील बघू शकतील कि नाही अशी भीती नर्सला होती, त्या निकला बघायला, ऐकायला आज जगभरातले लोक आतुर असतात. त्याच्या प्रेरणादायी भाषणासाठी हॉल खचाखच भरलेला असतो.

धडधाकट माणसं सहजासहजी जे करू शकत नाहीत ते निकने करून दाखवलं याच्या मागे होती त्याची प्रचंड इच्छाशक्ती. निक त्याच्या भाषणात सांगतो,

जर तुमच्याबरोबर चमत्कार होतं नसेल तर तुम्ही स्वतःच चमत्कार होऊन जा.

येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून मार्ग निघूच शकतो, हे सांगताना निक सांगतो

शक्यता आहे कि आलेल्या अडचणीतून निघण्याचा मार्ग तुम्हाला दिसत नसेल पण असं नाही कि तो मार्ग अस्तित्वातच नाही.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.