कोण होती झाशीची वीरांगना झलकारीबाई?

झलकारीबाई

लेखन : निलेश सोनावणे

जा कर रण में ललकारी थी,
वह तो झांसी की झलकारी थी।
गोरों से लड़ना सिखा गई,
है इतिहास में झलक रही,
वह भारत की ही नारी थी।

१८५७… स्वतंत्र संग्रामातला पहिला उठाव.

जनरल रोज आपली विशाल सेना घेऊन २३ मार्च १८५७ ला झासी वर चाल करून आला. राणी लक्ष्मीबाईला आपल्या उपलब्ध सैन्याला घेऊन ब्रिटिशांनी केलेली ती चाल थोपवायची होती.

पेशव्यांकडून मदत येईल हि आशा राणीला होती. पण जनरल रोज कडून तात्या टोपेंचा हि पराभव झाला होता.

लवकरच इंग्रज फौजा झासीत येऊन दाखल झाल्या. तात्या टोपेंचा पराभव करून जनरलने पुढे चाल केली होती.

लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे…

राणीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावली ती वीर झलकारीबाई. राणीची जागा घेऊन झलकारीबाई इंग्रज सैन्याशी लढत राहिली. तिने इंग्रज सैन्याचं लक्ष आपल्यावर एकवटलं आणि दुसरीकडून राणी लक्ष्मीबाई सुरक्षित बाहेर निघू शकली. दिवसाच्या अंताला इंग्रज सैन्याला समजलं कि आपण जिच्याशी लढतो ती राणी लक्ष्मीबाई नसून झाशीची एक स्त्री सैनिक आहे.

कोण होती झलकारीबाई…

बुंदेलखंडाच्या एका गरीब कोळी परिवारात झलकारीचा जन्म झाला. वडील सदोबा आणि आई जमुनाबाई…

लहानपणापासून गुरांची देखरेख करणे, जंगलातून सरपणासाठी लागणारा लाकूड फाटा आणणे अशी मेहनतीची कामे करण्याची झलकारीला सवय होती.

झाशीच्या सैन्यात सैनिक असलेल्या पुरण सिंह बरोबर झलकारीचा विवाह झाला आणि ती झासीत दाखल झाली. पुरण सिंहने झलकारीची ओळख राणीबरोबर करून दिली आणि शूर झलकारी राणीच्या सेनेत सामील झाली. राणीच्या मार्गदर्शनाखाली युद्धासाठी लागणारा अभ्यासही तिने घेतला.

झलकारीबाई

झलकारीबाईच्या शौर्याच्या कहाण्या आजही बुंदेलखंडाच्या लोकगीतांमध्ये गेल्या जातात. २००१ मध्ये झलकारीबाईच्या सन्मानार्थ टपाल तिकीट सुद्धा प्रसिद्ध झालं. झलकारीबाईचा इतिहासातला उल्लेख तसा कमीच पाहायला मिळतो पण एवढ्यातच येऊन गेलेल्या कंगना रानावटच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटामुळे ‘झलकारीबाई यांचे इतिहासातले योगदान काय?’ हे पाहण्यासाठी लोक इंटरनेटवर बरेचदा सर्च करत असल्याचे माझ्या बघण्यात आले म्हणून आजचा हा लेखन प्रपंच.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!