चला फेरफटका मारू ऑस्ट्रेलियामधल्या भूमिगत असलेल्या ‘कुबर पेडी’ ला

तापमान १२० डिग्री फॅरनहाईट…

वाळूची चक्रीवादळं, विषारी साप, विंचू….

सगळं काही कल्पनेपलिकडलं… शुष्क वाळवंट. माणूस तिथे राहून जगू शकेल अश्या कुठल्याही गोष्टीचा तिथे मागमूस नाही.

पण माणूस नावाचा प्राणी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या प्रश्नांना ज्या पद्धतीने सोडवू शकतो तसे या ब्रम्हांडात इतर कुठे होत असेल याची शक्यता कमीच….

कुबर पेडी

हे सांगण्याचं कारण असं कि अशा वाळवंटी जागेवर सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करून, ऑस्ट्रेलियाच्या Adelaide शहरापासून ८४६ किलोमोटर अंतरावर असलेल्या कुबर पेडी Coober Pedy या १५०० घरांच्या गावात नुसतं सुसह्यच नाही तर चांगलं आयुष्य लोक जगता आहेत. कुशाग्र बुद्धी आणि तंत्रज्ञान वापरून वापरून हे मरुस्थळ राहण्यायोग्य कसं बनवलं गेलं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कुबर पेडी हे ठिकाण जमिनीखाली वसवलं गेलं आहे. या ठिकाणी मौल्यवान अश्या ओपलच्या खाणी आहेत आणि इथे लोक याच ओपलच्या खाणींमध्ये राहतात. बाहेरून हि घरं साधारण दिसतात पण आतून मात्र यांना खूप चांगलं रूप दिल जातं. ओपल हे दुधी रंगाचे मौल्यवान रत्न. जगातलं ओपलच्या खाणी असलेले हे सर्वात मोठं ठिकाण. या ठिकाणाला ओळखलं जातं ते “Opal capital of the world” म्हणून.

कुबर पेडी

१ फेब्रुवारी १९१५ पासून ‘कुबर पेडी’ च्या जन्माची कहाणी सुरु झाली. पहिल्या महायुध्दा नंन्तर या ठिकाणी मौल्यवान रत्न असल्याचा सुगावा इथल्या विश्वयुद्धाहून परतलेल्या सैनिकांना लागला आणि तिथे खोदकाम सुरु केले. हे ठिकाण शुष्क वाळवंट होतं. कमालीच्या गरम वातावरणात राहणं हे दिव्य होतं. खोदकाम करत असताना या लोकांनी तिथे राहता येईल याचीही सोय ठेवली. हळू हळू या खाणींमधलं ओपेलचं मायनिंग सम्पलं पण या लोकांनी इथेच राहण्यायोग्य जागा बनवून या गुहांमध्ये आलिशान म्हणता येतील अशी आपली घरं थाटली.

इथे जमिनीवर ठिकठिकाणी चिमणीसारखं दिसेल असं स्ट्रक्चर दिसतं. याला इथले लोक शाफ्ट्स म्हणतात. या घरांवर साइन बोर्ड सुद्धा लावले जातात ज्यावर असं लिहिलं जातं कि या जमिनीखाली घरं आहे. या घरांना डगाऊट्स म्हणतात. या उंडरग्राउंड घरांमध्ये उन्हाळ्यात ए. सी. ची गरज भासत नाही कि हिवाळ्यात हिटरची.

कुबर पेडी

या ठिकाणाचा मुख्य व्यवसाय ओपलच्या खाणी आणि पर्यटन आहे. पूर्ण जगात मिळणाऱ्या ओपल मधलं ९५ % ओपल हे या ठिकाणाहूनच उपलब्ध होतं. इथे खाणकाम सुरु झालं तेव्हा इथल्या भयंकर उष्म्यापासून वाचण्यासाठी आणि आरामासाठी या कामगारांनी जमिनीखाली हि डगाऊट्स बनवली. हळू हळू या कामगारांनी इथेच राहायला सुरुवात केली.

जमिनीखाली बनलेली हि घरं एखाद्या हॉटेलच्या अंतर्गत सजावटीला लाजवतील इतकी सुंदर असतात. इथे भूमिगत असलेली दुकाने, क्लब, हॉटेल, म्युझियम एवढंच नाही तर चर्च सुद्धा आहेत. या वैशिष्ट्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा राबता सुद्धा वाढला आहे. त्यामुळे ओपेलच्या खाणी जरी आता कमी होतं चालल्या तरी पर्यटन हा आता इथला दुसरा व्यवसाय बनला आहे. या ठिकाणच्या बाबतीत खूप कमी लोकांना माहिती आहे.

या ठिकाणची अर्थव्यवस्था हि ओपल च्या खाणींवरच अवलंबून होती. इथे कित्येक हॉलिवूड च्या सिनेमांच्या शुटिंगसुद्धा झालेल्या आहेत. ‘पीच ब्लॅक’ या हॉलवूड सिनेमाच्या शुटींगनंतर प्रॉडक्शनने बनवलेले स्पेसशिप इथेच ठेवले आणि ते आता पर्यटकांसाठी एक आवडीचे ठिकाण बनले आहे.

तर मित्रांनो आपण जमिनीवर फिरतो, जलपर्यटन करतो, हवाई यात्रा सुद्धा करतो आणि आता हि भूमिगत व्हायची आयडिया कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा.

धन्यवाद.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय