डेन्मार्क मध्ये निवडणूक प्रचारासाठी उमेदवाराने लढवली नवी शक्कल

अब होगा न्याय… फिर एक बार मोदी सरकार …
अब होगा न्याय… फिर एक बार मोदी सरकार …
असा धडाका सध्या आपल्या टी. व्ही. वर सुरु आहे. फेसबुक, गुगल वर आपल्या राजकारणी पक्षांच्या जाहिराती सुरु आहेत. फरक एवढाच कि ज्यांच्याकडे जास्त निधी गोळा होतो ते जाहिरातबाजी करण्यात पुढे असतात.
पण जर तुम्ही एखादी प्रसिद्ध (प्रसिद्ध च्या पुढे ‘सु’ लावायचं कि ‘कु’ लावायचं ते तुमचं तुम्ही ठरवा) पॉर्न साईट उघडली आणि त्यावर तुम्हाला “अब होगा न्याय… फिर एक बार मोदी सरकार” हे दिसायला लागलं तर कसं वाटेल.
आता आपल्या भारतात पॉर्न साईटवर बॅन असल्याने हे शक्य नाही. नाहीतर आपल्या राजकीय पक्षांनी तेही केलं असतं. पण डेन्मार्क मध्ये येत्या ५ जूनला निवडणूका आहेत. आणि तिथल्या एका उमेदवाराने हि शक्कल लढवली आहे.

जॉकिम बी. ऑल्सन असं या उमेदवाराचं नाव आहे. ऑल्सन हे नुसते राजकारणीच नसून ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल मिळवलेले खेळाडू सुद्धा आहेत. १९६९ साली डेन्मार्कने पोर्नोग्राफीवरील सेन्सॉरशिप हटवली होती.
या महाशयांनी आपल्या प्रचाराचं कॅम्पेन केलं ते दररोज १० करोड इंटरनेट युजर्स व्हिजिट करतात अश्या एका पॉर्न वेबसाईटवर. या पॉर्न वेबसाईटच्या वापरकर्त्यांमध्ये २८ व्या नम्बरवर डेन्मार्कचे लोक आहेत. आणि ऑल्सन यांचं म्हणणं आहे कि जिथे माझे मतदार असू शकतात तिथे मी पोहोचलंच पाहिजे.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा