संकटांवर हसत हसत मात करणाऱ्या अवघ्या ८३ वर्षाच्या जिगरबाज सीताबाई…

सीताबाई

नाशिकच्या पंचवटीच्या अन्नपूर्णेची हि कहाणी…

वयाची चाळीस पंचेचाळीशी ओलांडल्या नंतर अनेक तरुण तरुणींना विविध व्याधी, मधुमेह बीपी हृदयविकार आणि अनेक असंख्य असे आजार जडलेले आपल्याला दिसून येतात.

घरच्या जबाबदाऱ्या आणि नोकरी सांभाळत महिला तर वयाच्या पस्तिशीतच पन्नाशीच्या आजीबाई दिसू लागतात. त्यातच घरचा कर्ता नसेल आणि महिलेला ती जबाबदारी पार पडावी लागत असेल तर कुटुंबाची परवड होते. मात्र ८३ वर्षाच्या सीताबाईंना बघितलं तर त्यांचा उत्साह आपल्या तरुण तरुणींना नक्कीच लाजवेल..

वय वर्ष ८३ असलेल्या सीताबाई नाशिक शहरात एक हॉटेल चालवितात.

सीताबाई

सिताबाईची मिसळ या नावाने त्या नाशिकच्या भद्रकाली आणि पंचवटी परिसरात प्रसिध्द आहेत.. स्वातंत्र्यापूर्वी लग्ना नंतर सीताबाई यांच्या पतीला मोठ्या आजाराने ग्रासले होते आणि शरीराची लाहीलाही होत असल्याने त्याच्या पतीला काम करणे शक्य नव्हते.

नंतर पतीचा मृत्यू झाल्याने घरातील सर्व जबाबदारी सीताबाई यांच्यावर आली. घर खर्चासाठी दुध व्यवसाय सुरु करण्यात आला. सीताबाई यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सीताबाईवर असल्याने त्यांनी मुलांना सांभाळत असताना दुध व्यवसायही केला आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी मुलांचे शिक्षण केले.

काही वर्षा नंतर सीताबाई यांनी दुध व्यवसाय करताना स्वतःचे हॉटेलही सुरु केले. या हॉटेलमध्ये सुरवातीला ग्राहकांसाठी शेव तयार करण्यात आली. नंतर मिसळ मिळू लागली आणि सीताबाईची मिसळ या नावाने प्रसिद्धही झाली. सीताबाई दररोज पहाटे पाचला उठून अकरापर्यंत हॉटेल चालवतात आणि नंतर घरकाम आणि पुन्हा संध्याकाळी व्यवसाय असा दिनक्रम गेल्या पन्नास वर्षांपासून सातत्याने सुरु आहे.

सीताबाईं यांचा एक मुलगा महापालिकेत नोकरीला आहे तर दुसरा नासिक करन्सी प्रेसमध्ये काम करतोय. सिताबाईंचे जावई पोलीस उपनिरीक्षक आहे. नातू पणतू झाले तरी तितक्याच हिरीरीने त्यांचं काम आजही अव्व्याहतपणे सुरुच आहे. मिसळव्यतिरिक्त त्यांची शेवप्रसिध्द आहे.

आजही कुठला कामगार हाताशी न घेता त्या या वयात स्वतः गरम तेलात शेव काढण्याचं काम करतात. जबाबदारीचं भान आजही त्यांचे हात थरथरु देत नाहीत. त्यांची मिसळीची चव आज ही तशीच आहे आणि अजूनही मिसळ खाण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात रांग लागलेली असते. त्यांच्या हातावरील चेहऱ्यावरील सुरकुत्या त्यांच्या या अपार कष्टाचं द्योतक आहे.

सीताबाईची स्पेश्यल मिसळ

आतापर्यन्त आलेल्या सर्व संकटावर हसत हसत मात करणाऱ्या सीताबाई यांनी आपला व्यवसाय उभा केलाय. कितीही संकटे आली तरी अपार कष्ट आणि जिद्दीने त्याच्यावर यशस्वीपणे मात करता येते हे सीताबाईंनी आपल्या मेहनतीने दाखवून दिले आहे. महिला व्यवसायिकांनो नाशिकच्या दंडकारण्यातील सीतेला नक्की भेट द्या आणि सीताबाईच्या मिसळीची चव चाखून तर पहा.

सीताबाईची स्पेश्यल मिसळ’… जुने नाशिक चव्हाठा
भद्रकाली..
नाशिक


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.