संगीत देवबाभळी: एक विलक्षण अनुभव.

“आपण हे नाटक बघितलं का अनुभवलं?” नाट्यगृहातून हा प्रश्न पडणारं नाटक म्हणजे संगीत देवबाभळी.

नाटकात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत खूप टप्प्यांवरचे प्रवास मनाला घडत असतात. भावनिक, शाब्दिक, वैचारिक ह्या सगळ्या पातळींवर न्याय देऊन नाटकाच्या शेवटच्या पंधरा मिनिटात उरतो तो फक्त अनुभव.

तुकारामांची पत्नी, आवली, पांडुरंगाचा पराकोटीचा द्वेष करणारी. ह्या आवलीच्या पायात देवबाभळीचा काटा रुततो आणि साक्षात पांडुरंग तो काटा काढायला येतात, इतकंच नाही तर त्यांच्या पत्नीला, रखुमाईला, आवलीची जखम भरेपर्यंत तिच्या घरात राहायला पाठवतात अशी ही गोष्ट.

रखुमाई मग लखुबाय बनून तुकाराम व आवलीच्या घरी राहायला येते. ‘काळतोंड्या’ ‘पांड्या’ अशा शिव्या घालणाऱ्या आवलीचा रखुमाईला भयंकर त्रास होत असतो.

पण हळूहळू स्त्री म्हणून तिचं आवलीला समजून घेणं, दोघींचा एकमेकींशी होणारा संवाद फार ताकदीचा आहे. आवलीला होणारा त्रास, संसाराची झालेली आणि होत असलेली वाताहत, अलिप्त नवऱ्यामुळे अंगावर येणारं एकाकीपण हे सगळं लखुबायच्या रूपात रखुमाई बघते.

तिचा त्रास समजून घेते, कधीतरी अजाणतेपणी तिच्याजवळ स्वतःचं मन मोकळं करते. देवी असून सुद्धा आवलीची सेवा करते. स्वयंपाकाच्या कामात किंवा कपडे धुताना देवीच्या आणि आवलीच्या मैत्रीचा प्रवास घडत जातो.

त्रास होत असताना ही तुकारामांना सोडून न जायचं कारण सांगताना आवलीच्या तोंडून जिवनाचं सार ऐकून रखुमाईलाच जणू स्वतःची चूक उमगते आणि अशा अतिशय हळव्या ठिकाणी नाटक संपून पडदा पडतो.

गरोदरपणात देवबाभळीचा काटा रुतून लंगडणारी आवली, “आवं, आवं!” करून तुकारामांना हाक मारत डोंगर दऱ्यात फिरणारी आवली आणि बुडत चाललेल्या संसाराबद्दल हतबल झालेली आवली ‘शुभांगी सदावर्ते’ यांनी खूप ताकदीने उभी केली आहे.

लखुबायच्या भूमिकेत असलेल्या ‘मानसी जोशी’ यांनी ही त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. ‘प्राजक्त देशमुख’ यांच्या लिखाणात प्रचंड ताकद आहे. ह्याच लिखाणातली आर्तता यशस्वीपणे लेखकांपर्यंत पोहोचवण्याचं काम शुभांगी व मानसी ह्यांनी केलं आहे.

स्टेजवरच्या आवलीच्या स्वयंपाकघराची एकूण रचना, पितळी भांडी, चूल, लाडकी खिडकीतून येणारे कवडसे ह्या अतिशय सूक्ष्म गोष्टी नजेरेतून सुटत नाहीत. तसेच इंद्रायणी नदीत कपडे धुतानाचा पाण्याचा बदलत जाणारा आवाज देखील लक्षात येतो आणि इतक्या बारकाव्यांचं कौतुक वाटतं.

प्रत्यक्ष नाटकात तुकाराम नसले तरी ‘आनंद भाटे’ यांच्या आवाजातले त्यांचे अभंग ऐकून त्यांचं पात्र ही जिवंत वाटतं.

संगीत देवबाभळी, एकदा अनुभवावी अशीच कलाकृती.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय