थाॅमस आल्वा एडिसन व स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनातील यशाचे गुपित (प्रेरणादायी विचार)

प्रेरणादायी विचार

यश म्हणजे नुसते जिंकणे नव्हे तर त्या यशाचा निखळ आनंद घेता आला तर ते खरे यश.

यशस्वी होणे ही अनपेक्षितता किंवा निव्वळ योगायोग नव्हे, मनाची निश्चितता व त्या अनुशंगाने केलेले प्रयत्न व प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे यश.

निश्चित व उचित मार्गाने साध्यकृतीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश. एखाद्या यशामागे अनेक प्रयत्न व त्या प्रयत्नातली अनेक अपयश असतात.

लोकांना प्रकाश देण्यासाठी एडिसनने विजेच्या बल्बचा शोध लावला. त्यांना त्यात यश मिळवण्यासाठी हजारो वेळेस प्रयोग करावे लागले. अनेक अपयश त्यांना सहन करावे लागले. शेवटी प्रयत्नांचे प्रकाशमय यश त्यांना मिळाले.

यश हे नक्कीच अनेक अपशातून मिळालेले फलित असते. एखादाच माणूस असा असतो की नियमित त्याच त्या चुका करत यशाकडे जाऊन पोहोचतो. काही लोक पहिल्याच प्रयत्नात थकून जातात. निरुत्साही होतात. मग अपयश त्यांच्या मागे मागे येत असते.

अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थाॅमस जाफर्सन यशाबद्दल म्हणतात, “अपयशानंतर अपयशाचा सामना करत तेवढ्याच उत्साहाने नियमित वाटचाल करत राहणं हाच यशप्राप्तीचा सरळ मार्ग असतो.

यशस्वी माणसं ही प्रत्येक अपयशानंतर अगीतून फिनिक्स पक्षासाठी भरारी घेतात.

वयाच्या सदुष्टाव्यावर्षी एडिसन यांचा कारखाना जळून खाक झाला. लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले. त्या वेळेस एडिसन उद्गारतात, “सर्वच चुका जळून खाक होतात म्हणून विनाश ही मौल्यवान असतो.”

असा विनाश घडल्यानंतर अवघ्या वीस दिवसातच वृध्द एडिसनने फोनोग्राफचा शोध लावला.

स्टीव्ह जॉब्स आईवडीलांचे पैसे वाचवण्यासाठी कॉलेजमधून बाहेर पडतो. रोज कोकच्या रिकाम्या बाटल्या देऊन तो ५ सेंट्स जमा करत त्यातून जेवणाची तजवीज असतो.

तो प्रत्येक रविवारी ‘हरे राम हरे कृष्ण मंदिरात सात मैल चालत जात. तेथे ते व्यवस्थित जेवण करत. सुरुवातीच्या जीवनात ह्या सर्व संकटाचा सामना करत स्टीव्ह जॉब्स यांनी एका गॅरेजमध्ये ऍपल कंपनीची सुरूवात केली.

प्रयत्न आणि संकटाचा सामना करत यश संपादन करत त्यांनी त्यांच्या कंपनीस यशोशिखरावर नेऊन पोहचवले.

स्टीव्ह जॉब्स एक अचाट व सामर्थ्यवान माणूस, आज जरी तो आपल्यात नसेल तरी त्यांचे यशस्वी विचार जिवंत आहेत.

स्टीव्ह जॉब्स यांचे प्रेरणादायी विचार :

इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका.

तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. तो पुरेपूर सत्कारणी लावा.

दुसऱ्याचे आयुष्य जगणे सोडा.

आजचा दिवस माझा जीवनाचा शेवटचा दिवस असेल असं म्हणून दिवसाची सुरूवात करा.

अतिशय उत्कंटता असणारेच लोक जगाला बदलून आणखी चांगले बनवण्याचा प्रयत्न करतात .

शिकण्याची भूख नियमित बाळगा. काही तरी करण्यासाठी वेडाने झपाटून जा व धडपड करा.

कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल व अपयश घेऊन येईल तरीही, स्वतः वरचा विश्वास ढळू देऊ नका.

आपण आज काही अदभुत केलं आहे का ही जाणीवच यशस्वी होण्यासाठी रोज खूप महत्त्वाची असते .

नवीन शोधच एक लीडर आणि एक अनुयायी या मध्ये अंतर दाखवते.

पैश्यासाठी काही करू नका जे मनाला पटते ते करा .

मनात एक एखादे ध्येय निश्चित करा व त्याविषयीची कल्पना ठरवा. तुमचं सारं आयुष्य त्या कल्पनेच्या पूर्ततेसाठी झोकून द्या. मनात फक्त तिचाच विचार आणत राहा.

स्वप्नी, ध्यानी व मनी तेच ते दिसू द्या. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात तेच ध्येय असू द्या. साऱ्याचा विचारही सोडून द्या. यशाचा हाच खरा धोपट मार्ग आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!