आनंदानं जगायला हवं (बोधकथा)

बोधकथा

चार सर्वसामान्य परिस्थितीतील मित्र एकदा दूर जंगलात फिरायला निघाले. दाट झाडे, सुंदर फुले, पिवळी-हिरवी पाने पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले.

आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. हा निसर्ग एवढा समृद्ध आहे आणि आपल्याकडे काहीही नाही.

एक जण म्हणाला

यावर त्या सर्वांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. शेवटी प्रत्येकाने आपण आयुष्यात निराश असल्याचे सांगितले. तोपर्यंत दुपार झाली होती. त्यामुळे सर्वांना भूक लागली. एवढ्यात जंगलात काहीच मिळणार नाही म्हणून ते केवळ पाण्याचा शोध घेऊ लागले.

पाण्याचा शोध घेता घेता त्यांना घनदाट जंगलात एक झोपडी दिसली. त्यांनी झोपडीत डोकावून पाहिले. आत एक वृद्ध स्त्री होती. तिला पाहून सर्वांना आश्‍चर्य वाटले.

आजी, आम्हाला थोडे पाणी मिळेल का?

एकाने विचारणा केली

मी पाणी फार दूरवरून आणते. इथे जवळपास पाणी नाही. तरीही माझ्याकडे पुरेसे पाणी आहे. पण ते पाणी देण्यासाठी काही नाही. फक्त नारळाच्या छिद्र पडलेल्या करवंट्या आहेत. त्यात तुम्हाला पाणी चालेल का?

वृद्ध स्त्री बाहेर आली आणि म्हणाली

हो, हो अगदी चालेल की!

तहान लागल्याने चौघांनी एकदमच होकार दिला

वृद्धेने वेगवेगळ्या आकाराच्या तीन कवट्यांमध्ये पाणी दिले. त्यामुळे एकाने शेवटी पाणी पिले. पाणी पिऊन तृप्त झाल्यावर एक जण सहज म्हणाला.

आजी तुम्हाला इथं जंगलात छान प्रसन्न वाटत असेल ना? आम्हाला तर शहरात राहायचा आणि जगायचा कंटाळा आला आहे. रोज काहीतरी नव्या समस्या असतातच हो!

एकाने नाराजीचा सुरात माहिती दिली

बाळांनो, आयुष्यात कधीही नाराज होऊ नको. आता हेच बघा ना तुम्हाला आता मी ज्या करवंट्यामध्ये पाणी दिले होते. त्यापैकी तीनही करवंट्या एकसारख्या नव्हत्या. एकाला तर करवंटी मिळालीच नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्याने वापरलेली करवंटी नंतर वापरावी लागली. दोन करवंट्यांना छिद्रे पडली होती. तरीही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून पाणी पिऊन तहान भागविलीतच ना? आयुष्याचंही असंच आहे. जे नाही त्यापेक्षा जे आहे त्यात समाधानी व्हायला हवं. अर्थात पुढे काहीच मिळवायचं नाही असं नाही. पण नाराजीचा, नकारात्मकतेचा सूर शक्‍यतो आपल्यापासून दूर ठेवावा. आनंदानं जगायला हवं. पुढं जायला हवं.

आजी म्हणाल्या

वृद्धेचा संदेश ऐकून तिघांनाही बोध झाला.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 Response

  1. siddhesh khanvilkar says:

    अतिशय छान लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!