एक विलक्षण व्यक्तिमत्व- आजीबाई बनारसे (कहाणी लंडनच्या आजीबाईंची)

कहाणी लंडनच्या आजीबाईंची

१९३० च्या दशकात म्हणजेच भारत पारतंत्र्यात असताना लंडनच्या टेलेफोन डिरेक्टरीत “आजीबाई बनारसे ” अशा घरगुती नावाने एक टेलिफोन नंबर छापला जातो आणि त्यांनंतरच्या दोन-तीन वर्षातच एका टेलिफोनचे चार टेलीफोन नंबर त्याच नावाने छापले जातात.

लंडनच्या स्टेशनवर किंवा विमानतळावर उतरणारा नवखा भारतीय माणूस डिरेक्टरी उघडतो ती “आजीबाई” हे परिचित नाव शोधण्यासाठी!!

aajibai-banarse-manachetalksआजीबाईच्या घरच्या एखाद्या कार्यक्रमाला लंडनमधील भारताच्या राजदूताला जरी हजेरी लावायची असेल तरी त्यांचा स्वीय सहाय्यक “व्हिजिट टू आजीबाई” अशी कार्यक्रम पत्रिका तयार करायचा 🙂

राणी एलिझाबेथच्या राज्यारोहणाच्या सोहळ्यासाठी बकिंगहॅम पॅलेसला  हजेरी लावणाऱ्या आजीबाईचा थाट हाही अविश्वास वाटावा असाच होता.

ऐकून  विश्वास बसत नाही. या आजीबाईंची म्हणजेच राधाबाई बनारसेंचि जीवनगाथा काहीशी अद्भुत आणि चक्रावून टाळणारीच आहे. लिहिता  वाचता न येणाऱ्या या आजीबाईंना एक ते दहा आकडे तेवढे मोजता येत होते.

येणाऱ्या दहा आकड्यांची पट वाढवीत  वाढवीत आणि इतर विलक्षण गुणांच्या आधारावर या भारतीय आजीबाई लंडनमधल्या प्रख्यात “लॅण्डलेडी” झाल्या होत्या.

विदर्भातल्या एका छोट्याशा गावात १९१० साली जन्माला आलेल्या राधाबाईला बालपणीच आईवडिलांचे छत्र हरवल्यामुळे कष्टात दिवस काढावे लागले पण हळू हळू तिचे जीवन एक दंतकथाच बनून गेले.

तिच्या हाताने बनलेल्या जेवणाची चव तिला लंडनमध्ये स्वतःचे अतित्व सिद्ध करण्याच्या कमी मदतीला आली. लहानपणापासूनच राधाबाई अतिशय कामसू आणि उत्साही.

तसेच सगळ्यांच्या मदतीला धावून जाण्याचा तीचा स्वभाव या साऱ्यामुळे ती सातासमुद्रापार जाऊन सगळ्यांची आजीबाई होऊन त्यांचा खंबीर आधारसुद्धा झाली.

kahani-londonchya-aajibaichi-ManacheTalks

माणसाचे आयुष्य त्याला कुठून कुठे नेऊन ठेवेल याचा अंदाज त्याला स्वतःला सुद्धा लावता येत नाही.

राधाबाई बनारसेंचि जीवनकथा हि अशीच नशीब आणि त्यांची कर्तबगारी यातून कशी फुलात जाते हे रोमहर्षक तसेच प्रेरणादायी सुद्धा आहे.

लंडनच्या आजीबाईचा जीवनपट कहाणी लंडनच्या आजीबाईंची या सरोजिनी वैद्य लिखित पुस्तकातून आपण वाचू शकतो.

 

 

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.