चिंता, काळजी, भीती, तणाव आपल्यापासून दूर ठेवण्याचे तीन उपाय

चिंता, काळजी, भीती, तणाव आपल्यापासून दूर ठेवण्याचे तीन उपाय

“चिंता सोडा सुखाने जगा” हे डेल कार्नोजी नावाच्या लेखकाचे पुस्तक आपल्याला अशी काही तंत्र सांगतं ज्याने चिंता, काळजी, भीती, तणाव या भस्मासुरांना आपल्यापासून कोसो दूर ठेवणं आपल्याला अगदी सहज शक्य वाटायला लागेल.

आम्हाला बऱ्याच वाचकांचे मेसेजेस येत असतात, त्यात कुणी सांगतात आर्थिक कारणांमुळे मी स्ट्रेसमध्ये आहे, कुणी सांगतं सगळं ठीक असून सुद्धा ओव्हरॉल परिस्थितीमुळे कुठेतरी भीती दबा धरून असते, कुणी सांगतं नात्यांच्या गुंत्यामुळे आयुष्यात तणाव आहे. एक नाही, दोन नाही बरीच करणं…

अशातच “चिंता सोडा सुखाने जगा” हे डेल कार्नोजी नावाच्या लेखकाने लिहिलेले बेस्ट सेलर पुस्तक वाचनात आले. या पुस्तकात दिलेली काही तंत्र आज या लेखात मी तुम्हाला सांगणार आहे. हि तंत्र वापरली तर तुम्हालापण तुमच्या आयुष्यात १००% बदल घडवून आणता येईल.

१) परिस्थितीचा स्वीकार करा

आता यामध्ये तीन टप्प्यांनी परिस्थिती हाताळली तर सगळं बघा कसं सोप्प होऊन जाईल.

पहिला टप्पा: परिस्थितीचे ऍनालिसिस म्हणजेच आकलन करा

ज्या गोष्टीची जास्तीत जास्त चिंता, स्ट्रेस आहे तिचे विश्लेषण करा. परिस्थिती नीट सविस्तर समजून घ्या. त्याचे परिणाम काय होऊ शकता याचा विचार करा. त्यातूनही वेळ आलीच तर जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकते याचा विचार करा.

दुसरा टप्पा : जी सर्वात वाईट परिस्थिती होऊ शकते मनामध्ये तिचा स्वीकार करा.

तिसरा टप्पा : आता मानसिकदृष्ट्या ती परिस्थिती तुम्ही स्वीकारली की मग ती सुधारण्यासाठी काय केले पाहिजे यासाठी तुम्हाला तटस्थपणे विचार करता येईल.

चिंता, काळजी, भीती सोडून शांतपणे विचार केल्याशिवाय परिस्थितीला हाताळण्याचे मार्ग तुम्हाला मिळणार नाहीत.

आता यात बरेचदा परिस्थिती अशी असते कि एखाद्या माणसाला भयंकर चिंता, भीती असते कारण ती परिस्थिती त्या माणसाने त्याच्या चुकीमुळे निर्माण केलेली असते.

वरती दिलेले तीन टप्पे हे सरळमार्गी माणसासाठी आहेत असे सांगून एका चर्चेतून एकदा माझ्या मित्राने मला थांबवले.

हे सांगण्यासाठी त्याने एक किस्सा ऐकवला. त्याच्या माहितीतल्या एका व्यक्तीने विवाहबाह्य संबंध ठेऊन एका स्त्रीची प्रतारणा केली.

आणि विशेष म्हणजे यात तिला त्याच्या कुकर्मांची काहीही कल्पना त्याने येऊ दिली नाही. या सर्व गोष्टींमुळे आता तो भयंकर भीती, चिंता, काळजी यात गुरफटून गेला आहे.

यावर माझ्या मित्राचं म्हणणं असं होतं कि आता सांगा या पुस्तकी गोष्टी या महाशयांच्या चिंता मिटवू शकतील का?

खरंतर परिस्थिती हाताळताना आणि परिस्थितीचे आकलन करताना त्या परिस्थितीत स्वतःकडून झालेल्या चुकांची जवाबदारी स्वीकारून त्यातून मार्ग काढला तरच ते सोपे होईल.

२) स्वतः कडून अवाजवी अपेक्षा ठेऊ नका

बरेचदा स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेऊन माणूस शक्य नसलेल्या गोष्टी मिळवण्याच्या किंवा करण्याच्या महत्त्वाकांक्षा बाळगतो. महत्त्वाकांक्षा बाळगणे, काहीतरी गोल सेट करणे हे कधीही चांगले.

पण बरेचदा या अपेक्षा अवाजवी होऊन त्या पूर्ण करण्यासाठी माणूस कुठलेही मार्ग अवलंबतो म्हणजे येन केन प्रकारेण स्वतःला जे हवे ते करण्याच्या पाठी माणूस लागला तर भीती, चिंता यापासून त्याची सुटका होणे शक्य होत नाही.

हे सांगताना लेखक डेल कार्नोजी वाळूच्या घड्याळाचं उदाहरण देतात. सॅण्ड क्लॉकमध्ये जशी वरच्या भागातली वाळू हळू हळू आपला वेळ घेऊन खालच्या भागात साचते तसेच प्रत्येक गोष्टीला योग्य तितका वेळ दिला पाहिजे. आणि तसे केले तर तणावाचे नियोजन करणे शक्य होईल.

३) आलेल्या संकटाचा नीट अभ्यास करा

बरेचदा आपल्याला वाटणारी चिंता हि आपल्या अज्ञाना मुळे असते. एकदा आमच्या ओळखीच्या एका काकांचे बायपासचे ऑपरेशन होणार होते. या ऑपरेशनच्या आधीच काय होईल, ऑपरेशन सक्सेसफुल होईल का? या चिंतांमुळे त्यांची तब्बेत खालावली होती.

तेव्हा त्यांना भेटायला गेले असता त्यांनी जेव्हा त्यांची हि भीती बोलून दाखवली तेव्हा त्यांना सहज मोबाईलवर गुगल करून दाखवले कि बायपासच्या ऑपरेशनचा सक्सेस रेट हा ९८ % आहे. आणि तेव्हा त्यांना बराचसा धीर आला.

तर परिस्थिती कुठलीही असो तिचा नीट अभ्यास केला तर त्या परिस्थितीला तोंड देण्याचे बळ येऊन चिंता, भीती, स्ट्रेस यांचे नियोजन करणे सोपे जाते. या काही सोप्या पद्धतींचा अवलम्ब केला तर चिंतांना १००% दूर ठेवणे हे आपल्याच हातात आहे. बरोबर ना!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.