संघबांधणी आणि यशस्विता याचे उत्तम उदाहरण, म्हणजेच नाशिक मॅरेथॉन… नव्हे “नाशिक उत्सव”

हे यश अर्थातच संघशक्तीचे, या संघाचा कप्तान, कदाचित मी असेनही, परंतु पोलीसदलासमवेत समस्त नाशिककरांचा सहभाग अत्यंत महत्वाचा ठरतो. या संघाची बांधणी करतांना नाशिकमधील ‘विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक व महिलावर्ग’ या सर्वांचे उत्साही योगदान, अत्यंत महत्वाचे ठरते.

Nashik Marathon‘कायदा आणि सुव्यवस्था’ हे पोलीसदलाचे प्रमुख कर्तव्य असल्याने ‘समाज आणि पोलीस’ यांच्यातील नाते अतूट असते. किंबहुना समाजाच्या एकुणात जडणघडणीत पोलिसांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. ‘कम्युनिटी पोलिसिंग’ अंतर्गत परस्परविरोधी विचारसरणीचा बिमोड करून समाज व पोलीस यांच्यामध्ये ‘एकतानता, सलोखा व समन्वय’ प्रस्थापित करण्यात ‘नाशिक शहर पोलीस’ यशस्वी झाले आहे. म्हणूनच गत १ ते १.१/२ वर्षात नाशिक शहरात पोलिसांनी अनेक ‘नवनवीन, उत्तमोत्तम व यशस्वी’ संकल्पना मूर्त स्वरूपात आणून, एक नवीन पायंडा पाडलेला आहे. एक ‘विचार, दिशा, धेय्य व एकसंघता’ यांच्या बळावर ‘नो हॉर्न डे, हेल्मेट अवेअरनेस, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, वाहतूक सुरक्षा, सायबर क्राईम अवेअरनेस सारख्या योजना यशस्वीपणे राबवून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. यातील ‘नो हॉर्न डे’ या नवीन संकल्पनेची सुयोग्य दखल घेऊन ‘महाराष्ट्र सरकारने’ ही योजना संपूर्ण राज्यात राबवण्याची घोषणा ‘नाशिक पोलीस व समाज’ यांच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरते.

हे यश अर्थातच संघशक्तीचे, या संघाचा कप्तान, कदाचित मी असेनही, परंतु पोलीसदलासमवेत समस्त नाशिककरांचा सहभाग अत्यंत महत्वाचा ठरतो. या संघाची बांधणी करतांना नाशिकमधील ‘विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक व महिलावर्ग’ या सर्वांचे उत्साही योगदान, अत्यंत महत्वाचे ठरते. कारण या सर्वांच्या ‘सहभाग, सहकार व सहयोग’ या त्रिबळांशिवाय आम्ही कोणतीच योजना राबवू शकलो नसतो. शिवाय ही संघबांधणी या शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरली आहे, हे विशेष!

नाशिक शहराला ‘उत्तम हवामान व विपुल जलस्त्रोत’ हे निसर्गदान लाभल्याने येतील प्रकृतीमान इतर शहराच्या मानाने खूपच उत्तम आहे. त्यामुळे ‘नाशिक शहर पोलीस’ यांच्या पुढाकाराने ‘नाशिक मॅरेथॉन’ ची संकल्पना २०१६ मध्ये राबवली गेली. मागील वर्षीच्या अभूतपूर्व सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या ‘नाशिक मॅरेथॉन’ च्या आयोजनात नाशिक शहरातील सर्वच स्तरातून ‘उत्साह, आपुलकी व मदत’ याचा ओघ सुरु आहे. आमचे संघसदस्य शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, कारखाने, निमा-आयमा सारख्या संस्था व कार्पोरेट कंपन्याना भेटी देऊन ‘वाहतूक सुरक्षा व सामाजिक एकोपा’ यासाठी जनजागृती करतांनाच ‘नाशिक मॅरेथॉन’ मध्ये सहभागी होण्यासाठी उद्युक्त करत आहेत आणि त्यांना उत्तम प्रतिसादही लाभत आहे.

Nashik Marathon

शहरातील सर्व मान्यवर डॉक्टर्स व हॉस्पिटल्स एकत्र येऊन ‘नाशिक मॅरेथॉन’ मधील ‘धावपटू’ उत्साही, तंदुरुस्त व सुरक्षित’ रहावे या उद्देशाने ‘अॅम्ब्यूलन्स व मेडिकल स्टाफ’ च्या पूर्वतयारीत गुंतले आहेत. तसेच चार्टर्ड अकौंटंट संघटनांनी आम्हाला सहभागाचा व मदतीचा मोठा हात दिला आहे. बहुतांशी कार्पोरेट कंपन्यांनी ‘पाणी, सरबत व खानपान’ व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुक आहेत. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरी, लायन्स व महिलासंस्था, विविध शाळा व शिक्षक  स्वयंसेवकाची जबाबदारी घेत असल्याने एकुणात कामांचा भार बरचसा हलका होण्यास सहाय्यभूत ठरतो आहे.

या वर्षीच्या मॅरेथॉनचा मार्ग जाणीवपूर्वक ‘नो मॅन्स लॅन्ड’ ऐवजी शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असल्याने नाशिककरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर मार्गावरील ‘घर, शाळा व इस्पितळ व स्वयंसेवीसंघटना’ यांनी उस्फुर्त सहभागाचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शहरातील विविध भागातून नागरिक गटागटाने आम्हाला भेटून ‘वॉटर स्टेशन, मेडिकल एड, रिफ्रेशमेंट व चिअरअप’ साठी स्वयंसेवा देण्यासाठी उत्साही आहेत. सोबतच नाशिक शहरातील गायन, वादन, नृत्य, नाट्य व तंत्र’ यातील कलाकार आपली कला वैविध्यपूर्ण संकल्पनांसह सादर करून सर्वांचे मनोरंजन करणार असल्याने आता ही केवळ एक स्पर्धा राहिली नसून संपूर्ण नाशिक शहरात सणासुदीचे वातावरण तयार झाले आहे.

ही सर्व पूर्वतयारी बघता, हा आनंद सोहळा नेत्रदीपक व संस्मरणीय इतिहास घडवणार याबाबत याची खात्री आम्हा सर्वांनाच होत आहे. तरी परंतु बाहेरील ‘गाव, जिल्हा, राज्य व देश’ यातून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतांनाच ‘पोलीस व समाज यांच्यातील ‘समन्वय, शिस्त व शहराची सुंदरता’ याचं उत्तम दर्शन घडवण्याची संधी व जबाबदारी आपल्या सर्वांवर आलेली आहे, याचा विसर पडता कामा नये, हीच इच्छा! गत केवळ दीड दोन वर्षांच्या कालावधीत नाशिक शहर पोलीस व नाशिककर यांच्यातील सातत्याने दृढ होणारे आपुलकीचे नाते इतरांना स्फूर्तीदायी ठरो, हीच इच्छा! हा कर्तव्यपूर्तीचा आनंद विरळाच ठरणार आहे, याज साठी केला होता अट्टाहास!

Nashik Marathon 2018 – साजरा करूया एका “कार्निव्हल” सारखा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

1 Response

  1. Vijay Shivaji Kakad says:

    Thats really Unbelievable atmosphere overall in Nashik City…
    Now we can really say Nashik is not only known for Grapes/Wines or Onions & etc . But this Nashik Marathon will give new identity to the City..Sporty Nashik as all we can call it… all the best .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!