कामवाल्या मावशींच्या व्हायरल व्हिजिटिंग कार्डचा पॉजिटीव्ह इम्पॅक्ट

हातातला मोबाईल अंगठ्याने स्क्रोल करत असताना असंच कोणाचंतरी भलं आपण पण करू शकतो. अशीच कुठली चांगली, एखाद्याचं भलं करणारी गोष्ट जर तुम्हाला व्हायरल करायची असेल तर तुमच्या मनाचेTalks आहेच. ‘टीम मनाचेTalks’ ला संपर्क करून ती माहिती तुम्हाला आमच्याकडे पाठवता येईल. कोणासाठी काही चांगले करून तर बघा. आणि पहा कोणालातरी “हम है ना!!” असं सांगून तुमचा पण आत्मविश्वास किती वाढतो. अशीच हि गीता मावशींची गोष्ट बघा.

सोशल मीडियाचा परिणाम म्हणून काही महिन्यांपूर्वीच रानू मंडल यांचा ‘फर्श से अर्श तक’ असा तुफान प्रवास आपण सर्वांनी पहिला. रेल्वे सटेशनवर गाणं गाऊन पोटाची खळगी भरणाऱ्या रानू यांचा गाणं गातानाचा साधासा व्हिडीओ कुणीतरी उपलोड करतं काय आणि तो व्हायरल होऊन रातोरात रानू यांचं आयुष्य बदलून जातं काय, हा आहे सोशल मीडियाचा पॉजिटीव्ह इम्पॅक्ट.

आता हा विषय काढण्याचं कारण म्हणजे साधारण तीन-एक दिवसांपूर्वी वावधानच्या घरकाम मावशी गीता काळेंच्या व्हिजिटिंग कार्डने सोशल मीडियाने असाच धुमाकूळ घातला होता. आणि त्याचा चांगला परिणाम म्हणजे गीता यांच्यावर हातचं काम गेल्यामुळे अचानक आलेलं संकट तर टळलंच पण त्याचबरोबर त्यांना हजारो फोन कॉल्स येऊन कामाच्या कित्येक ऑफर्स सुद्धा मिळाल्या.

धनश्री शिंदे यांच्याकडे गीता गेली दोन वर्षे घरकाम करतात. गीता यांच्या हातचे काम गेल्याने घरात, मुलांच्या शिक्षणात होणाऱ्या ओढाताणीमुळे त्या चिंतेत होत्या. आणि म्हणून धनश्री यांनी गीताचं व्हिजिटिंग कार्ड बनवून, बिल्डिंगचा वॉचमन, आपल्या मैत्रिणी असं जमेल तिकडे हे व्हिजिटिंग कार्ड पोहोचवलं. आणि यातच ५ नोव्हेंबरला हे कार्ड सोशल मीडियावर व्हायरल व्हायला जी सुरुवात झाली, दिवसभरात अडीच हजारावर फोन कॉल्स, एक हजार मेसेज येऊन गीतावर कामाच्या ऑफर्सचा अक्षरशः सडाच पडला.

एवढंच नाही हे कार्ड पाहून गीता यांच्या जुन्या मालकाने त्यांना त्यांचं सुटलेलं काम सुद्धा पुन्हा दिलं. कार्डावर गीता करतं असलेली कामं आणि त्यांचे रेट सविस्तर दिलेले असल्याने आणि त्याबरोबरच त्यांचा नम्बर सुद्धा असल्याने दिवसभर त्यांचा फोन खणखनत होता. शेवटी गीता यांना फोन बंद सुद्धा करावा लागला.

आता गीता, यासाठी धनश्री आणि व्हायरल करणाऱ्या सर्वांचे आभार मानून मला मिळालेल्या कामात आता मुलांचे शिक्षण बघणे शक्य होईल तर नवीन काम आता नको, असे सांगतात.

तर मित्रांनो, हातातला मोबाईल अंगठ्याने स्क्रोल करत असताना असंच कोणाचंतरी भलं आपण पण करू शकतो. अशीच कुठली चांगली, एखाद्याचं भलं करणारी गोष्ट जर तुम्हाला व्हायरल करायची असेल तर मनाचेTalks आहेच. ‘टीम मनाचेTalks’ ला संपर्क करून ती माहिती तुम्हाला आमच्याकडे पाठवता येईल. कोणासाठी काही चांगले करून तर बघा. आणि पहा कोणालातरी “हम है ना!!” असं सांगून तुमचा पण आत्मविश्वास किती वाढतो.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचेफेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय