आक्रमक लोकांना सामोरं कसं जायचं? (व्यक्तिमत्त्व विकासाचा मूलमंत्र)

या लेखामध्ये आपण अपमान म्हणजे काय? लोक दुसऱ्याचा अपमान का करतात? या परिस्थितीला कसा रिस्पॉन्स द्यायचा आणि आक्रमक लोकांची त्यांच्या तशा वागण्यामागची कारणं काय असू शकतात? या गोष्टी बघू.

यामुळे तुम्हाला स्वतःचा कोणी अपमान केला तर काय करायचं हे समजेलच पण त्याच बरोबर यात दिलेल्या तीन हस्यास्पद कॅटेगरीत आपण जायला नको हेहि वाटेल😍

काही लोकांना सवय असते दुसऱ्याचा अपमान करायचा आणि त्यातून आनंद घ्यायचा. मुळात हे लोक एवढ्यासाठीच दुसऱ्याचा अपमान करतात. तुम्ही पण कधीतरी अनुभव घेतला असेलच अशा प्रकारे कोणाच्या तरी वागणुकीतून विचलित झाल्याचा….

जगात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना हॅन्डल करणं तुम्हाला जमलं तर तुमच्या आयुष्याचे राजे तुम्हीच. तुमचा अपमान करणाऱ्या लोकांना कसं सामोरं जायचं त्यांचा प्रतिकार कसा करायचा, कसं रीस्पॉन्ड करायचं त्याबद्दल आपण या लेखात बोलू.

आक्रमक लोकांना सामोरं कसं जायचं?

जगात शांत, चांगले लोक जसे आहेत तसेच आक्रमकही आहेत. तसं सरसकट चांगलं किंवा वाईट असणं असा शिक्का कुणावरही लावता येणार नाही. पण साधारण शांत लोक हे पॉझिटिव्ह विचारसरणीचे असतात तर आक्रमक लोक हे अगदी त्याविरुद्ध असतात.

दररोजच्या आयुष्यात आपल्याला वेगवेगळे लोक भेटतात. प्रत्येकजण त्यांचा स्वभाव हा युनिक असतो. आणि याच यूनिकनेस मध्ये काही लोकांचा वेगळेपणा हा दुसऱ्याचा आक्रमकतेने अपमान करून आनंद मिळवण्यात असतो.

या लोकांच्या मते ते सर्वात्तम असून इतर लोक हे गौण असतात. म्हणजे त्यांनी स्वतःचा तसा समज (खरंतर गैरसमज) करून घेतलेला असतो. एवढंच नाही तर स्वतःच्या अहंकाराला (इगोला) गोंजारत दुसऱ्याची खिल्ली उडवण्यात या लोकांना भारी मजा येते.

एक मठातला पुजारी आणि दुराभिमानी माणसाची गोष्ट:

एका मठात एक पुजारी राहत असतो. त्याला नेहमी समोरच्या माणसात असलेल्या चांगल्याच गुणांकडे लक्ष देण्याची सवय असते.

मठाच्या नियमांनुसार शुक्रवार हा उपवासाचा दिवस असतो आणि त्या दिवशी फक्त कपभर चहा पिण्याची अनुमती असते.

तेव्हा हा पुजारी जवळच असलेल्या एका हॉटेलसारख्या ठिकाणी चहा घेण्यासाठी जातो. तेव्हा त्याला आपल्या मठातलाच एक तरुण सहकारी मांसाहार घेताना दिसतो.

तेव्हा हा तरुण सहकारी काहीसं डिफेन्सिव्ह होऊन आक्रमकपणे स्वतःच म्हणतो, “मांसाहार करतोय मी!! काही आक्षेप आहे का तुमचा?”

पुजारी: “तुम्ही विसरले असाल, आज उपवासाचा दिवस आहे.”

तरुण सहकारी: “नाही….”

पुजारी: “कदाचित तुमची तब्बेत बरी नसेल. डॉक्टरने तुम्हाला ‘असे जेवण करणेचे सक्तीने गरजेचे आहे’ असे काही सांगितले असेल”

तरुण सहकारी: “नाही, तसं काही नाही…”

तेव्हा पुजारी एक स्माईल देऊन शांतपणे म्हणतो, “खरंच तुम्हा तरुणांची हि खोटं न बोलण्याची सवय मला आवडते.”

या छोट्याशा गोष्टीत तुम्हाला काय प्रकर्षाने जाणवलं?

तरुण सहकाऱ्याचा प्रयत्न असतो कि आपल्या प्रश्नांमधून पुजाऱ्याचा अपमान करावा. खरंतर तो स्वतःच काहीसा घाबरलेला असतो. याने इतरांना आपण नियम तोडल्याबद्दल सांगितलं तर काय होईल, याची त्याला भीती असते.

आणि यामुळे डिफेन्सिव्ह होऊन तो तरुण आपल्या सिनियर सहकाऱ्याला म्हणजे पुजाऱ्याला अपमान झाल्यासारखे वाटेल असा आक्रमक पवित्र घेतो.

पण पुजारी असा पावित्रा घेईल, असं रिस्पॉंड करेल हे त्याच्यासाठी अनपेक्षित असतं. रागावून काहीही बोलण्याऐवजी तो शांतपणे तरुणांचा खरं बोलण्याचा गुण मला आवडतो असं सांगून विषय दुर्लक्षित करतो.

सांगायचा मुद्दा काय तर असाच पवित्र घ्या, कुणी जाणून बुजून अपमान केला तर….

कोणी आक्रमकपणे तुमचा अपमान केला तर तुम्ही काय करता?

१) वाद घालून समोरच्या व्यक्तीचा पुन्हा अपमान करता.
२) खचून जाऊन दुःखी होता, आपल्या कोशात जात.
३) त्या व्यक्तीकडे आणि त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करता.

लोक आक्रमक होऊन तुमचा अपमान का करता?

तुम्ही कधी नोटीस केली का कि आक्रमक होऊन अपमान करणारे लोक मुळात नकारात्मक विचारसरणीचे असतात. पॉझिटिव्ह विचार करणारे लोक हे कधीच खवचटपणे दुसऱ्याचा अपमान करत नाहीत.

असे लोक तुमची चूक दाखवून ती सुधारण्याचा चांगला प्रयत्न करतील पण कधीच अपमान करून दुसऱ्याला दुखावणार नाहीत. सकारात्मक विचारसरणीचे लोक कधीच सत्य परिस्थिती माहित नसताना दुसऱ्याला जज करण्याची चूक करत नाहीत.

या परिस्थितीला तोंड देण्यासाठी समोरच्या व्यक्तीने आपला अपमान का केला असेल? हे नीट ऍनलाईझ करणं गरजेचं आहे. आक्रमक लोकांची त्यांच्या अशा वागण्यामागे हि तीन मूळ करणं असतात…

१) असुरक्षितता
२) जलसी
३) समज कमी असणे

आता याबद्दल सविस्तर बोलू….

१) असुरक्षितता – काही लोकांना स्वतःबद्दल जी असुरक्षितता असते त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपल्यापेक्षा हीन दाखवण्याच्या प्रयत्नात ते आक्रमक होतात आणि दुसऱ्याचा अपमान करतात.

त्यामुळे अशा असुरक्षित लोकांकडून आक्रमक कमेंट येणं हे स्वाभाविकच असतं.

२) जलसी – काही लोकांमध्ये दुसऱ्यांबद्दल जलसी असण्याची जन्मजात सवयच असते. ते दुसऱ्यांचं काही चांगलं होताना पाहू शकत नाही.

समोरच्या माणसाकडे आपल्यापेक्षा काहीतरी चांगलं आहे जे आपल्याकडे नाही या एका विचाराने हे लोक वेडेपिसे होतात. आणि आक्रमकपणे दुसऱ्याचा अपमान करतात. त्यांचा हेतू हा फक्त दुसऱ्याला हीन दाखवण्याचा असतो.

३) समज कमी असणे: बरेचदा दुसऱ्याचा अपमान करणारे लोक हे निव्वळ त्यांची समज कमी असल्याने तसं वागतात. हि कॅटेगरी इतरांपेक्षा कमी तापदायक असते एवढं नक्की.😅

या लेखामध्ये आपण अपमान म्हणजे काय? लोक दुसऱ्याचा अपमान का करतात? या परिस्थितीला कसा रिस्पॉन्स द्यायचा आणि आक्रमक लोकांची त्यांच्या तशा वागण्यामागची कारणं काय असू शकतात? या गोष्टी बघितल्या.

यामुळे तुम्हाला स्वतःचा कोणी अपमान केला तर काय करायचं हे समजेलच पण त्याच बरोबर या वर दिलेल्या तीन हस्यास्पद कॅटेगरीत आपण जायला नको हेहि वाटेल😍

या विषयी आपण यापूर्वीही काही लेखात चर्चा केलेली आहे. ज्यांना हे नीट समजून घ्यायचं त्यांच्यासाठी या लेखांच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत. फुरसतीची काढून ते वाचता येईल… 👇

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “आक्रमक लोकांना सामोरं कसं जायचं? (व्यक्तिमत्त्व विकासाचा मूलमंत्र)”

  1. प्रथमतः ध्यन्यवाद खरच तुमचे लेख़ वाचून समजत की आपण जीवनातील नैराश्य सोडून आपले धेय साध्य करू शकतो.

    Reply
    • मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी👆वरती दिलेले ग्रुप लिंक क्लिक करून त्यामध्ये जॉईन व्हा. या ग्रुपमध्ये फक्त ऍडमिन पोस्ट करू शकणार असल्याने ग्रुपमध्ये अपडेट्स शिवाय काही इतर असणार नाही.

      https://chat.whatsapp.com/HZrrJaEmF2J9sM5RJml8U2

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय