आत्मविश्वास वाढवण्यासाठी या सहा सूत्रांचं पालन करा (मराठी प्रेरणादायी)

how-to-boost-Confidence-marathi

मागे एका लेखात आत्मविश्वासाची कमतरता असलेल्या लोकांच्या काही सवयींबद्दल आपण बोललो होतो. तेव्हा आत्मविश्वास कसा वाढवता येईल याबद्दल काही लिहिण्यासाठी बरेच जणांनी सांगितले.

या लेखात मी तुम्हाला अशा काही सहा गोष्टी सांगणार आहे ज्या करून बघितल्या आणि फ्रिक्वेंटली त्या करण्याचा सराव केला तर तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल.

गाडी चालवताना हात सतत ब्रेकवर ठेवायची सवय आहे का तुम्हाला? असेल तर ती सवय का लागली?

हि तर झाली फक्त एक सवय कारण काहीही असू शकतं…

तसंच काहीसं असतं आत्मविश्वासाचं…

कोणीच दुर्दम्य आत्मविश्वास घेऊन जन्माला आलेलं नसतं. आणि जर कोणामध्ये खूप आत्मविश्वास असेल तर त्याने किंवा तिने वर्षानुवर्षे केलेल्या कामातून किंवा अनुभवातून तो आत्मविश्वास कमावलेला असतो.

हो आत्मविश्वास जन्मजात नसतो…

तो वाढवता येतो!!!

आणि या स्पर्धेच्या युगात आत्मविश्वास वाढवायला शिकणं हे तुम्हाला जमलंच पाहिजे. मागे एका लेखात (लेखाच्या शेवटी त्या लेखाची लिंक दिलेली आहे) आत्मविश्वासाची कमतरता असलेल्या लोकांच्या काही सवयींबद्दल आपण बोललो होतो.

तेव्हा आत्मविश्वास कसा वाढवता येईल याबद्दल काही लिहिण्यासाठी बरेच जणांनी सांगितले. या लेखात मी तुम्हाला अशा काही सहा गोष्टी सांगणार आहे ज्या करून बघितल्या आणि फ्रिक्वेंटली त्या करण्याचा सराव केला तर तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल.

या गोष्टी आपल्यासाठी तर कराच पण जे पालक असतील म्हणजे ‘आई, वडील’ असतील त्यांनीहि आपल्या मुलांच्या वयानुसार या गोष्टी त्यांच्यात कशा आणायच्या, उतरवायच्या याचा विचार करायला काही हरकत नाही.

बरेचदा असं होतं कि तुमच्या कामाबद्दल कोणी काहीतरी निगेटिव्ह अभिप्राय देतं किंवा बिजनेसमध्ये एखादं काम अगदी पूर्ण होण्याच्या मार्गावर असत पण ग्राहक कुठेतरी असमाधानी होऊन चक्क रिफन्ड मागतो. किंवा घरातली माउली छानसा स्वयंपाक करते पण खाणारे, जेवणात काहीतरी उणिवा दाखवून मोकळे होतात.

अगदी छोटछोट्या गोष्टींपासून मोठमोठ्या गोष्टी अशा होत जातात. हे तर झाले बाहेरून होणारे वार, त्यापेक्षा जास्त घातक असतो तो तुमच्या आतला स्वतःला सतत दोष देणारा तो ‘इनर क्रिटिक’. या सगळ्यांचा आक्रोश खूप वाढायला लागला कि आत्मविश्वास डळमळायला लागतो.

कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, आनंदी, समाधानी आयुष्य जगण्यासाठी गरज असते पोलादासारखे हे असे सगळे वार झेलण्याची. म्हणजेच दुर्दम्य आत्मविश्वासाची….

आत्मविश्वास वाढवण्यासाठीची सहा सूत्रं:

१) स्वतःला ग्रुम करा : ऐकायला हि गोष्ट खूप साधी आणि बाळबोध वाटेल. स्वतःला ग्रुम करा म्हणजे अगदी सहज तुमचं राहणीमान बदला. याने इतरांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण जसा बदलेल तशीच तुमची स्वतःची बदललेली प्रतिमा तुमचा स्वतःचा मूडसुद्धा चमत्कारिकरित्त्या बदलून टाकेल. आत्मविश्वास वाढवायच्या रस्त्यावरचा प्रवास सुरु करताना सुरुवात इथून करा.

स्वतःच्या विचारांकडे लक्ष देऊन याची सुरुवात करा. यासाठी खूप काही करायची गरज नाही रोज दिवस संपताना डायरी नोंदवण्याची सवय इथे तुमच्या कामाला येईल. यामध्ये दिवसभराच्या कामातले अडथळे ठरलेले निगेटिव्ह विचार अगदी पॉईंट वाईझ लिहा.

हा निगेटिव्ह विचार कुठे बदलता आला तर बिघडलेल्या कामात सुधारणा करता आली असती हेही नमूद करून ठेवा. बरेचदा तुम्हाला हे पण जाणवेल कि बरेच अडथळे हे नुसते आपल्या विचारांमुळेच आलेले असतात.

३) सकारात्मक विचारांबरोबर सकारात्मक कृती सुद्धा करा : पॉझिटिव्ह विचार करण्याबद्दल आपण बरेचदा बोलतो. पण आत्मविश्वास वाढवायचा असेल तर पॉझिटिव्ह विचारांबरोबर कृती सुद्धा पॉझिटिव्ह असू द्या.

आता सकारात्मक कृती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? यात अगदी छोटछोट्या गोष्टी करता येतील अगदी पोस्टात किंवा बँकेत रांगेत उभं असताना एखाद्या आजोबांना किंवा गरोदर स्त्रीला आपली जागा देऊन सुद्धा हे करता येईल.

सकारात्मक विचारापेक्षा सकारात्मक कृतीतून समाधान आणि स्वतःबद्दलचा अभिमान तुम्हाला जास्त सुखावून जाईल. करून बघा.

४) स्वतःला तयार ठेवा : जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी पूर्णपणे तयार नसाल तर ती गोष्ट, ते काम तुम्ही नीट करू शकाल याबद्दलचा कॉन्फिडन्स तुमच्यात येणं शक्य नाही. या फिलिंगला छेद देण्यासाठी जेवढे शक्य आहेत तेवढे प्रयत्न करून ठरवलेल्या कामासाठी स्वतःची तयारी करा.

बघा लहानपणी परीक्षेला जाताना जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर नुसताच आत्मविश्वास ठेऊन फायदा नाही. कारण हा आत्मविश्वास न ठरता ओव्हर कॉन्फिडन्स ठरेल. म्हणून या मार्गात प्रयत्नपूर्वक स्वतःला तयार करणं हेही तितकंच महत्त्वाचं.

५) छोटी छोटी ध्येय्य ठेवत सुरुवात करा: बरेचदा चूक हि होते कि खूप मोठं ध्येय ठेवलं जातं आणि ते पूर्ण न झाल्याने आत्मविश्वास डळमळीत होतो. अगदी जाणीवपूर्वक आत्मविश्वास वाढवण्यासाठी जेव्हा तुम्ही प्रयत्न करत असाल तेव्हा छोटी छोटी ध्येय्य ठेऊन ती पूर्ण करण्याकडे आधी कल ठेवा.

छोटी छोटी मजल मारत आत्मविश्वासाला तुमच्या सवयीचा भाग बनू द्या.

६) स्वतःला स्पेशल असल्यासारखी वागणूक द्या: स्पेशल असण्याची वागणूक देणं म्हणजे आपल्या स्वतःची इतर कोणाबरोबरही तुलना न करणं.

इतरांबरोबर स्वतःची तुलना करणं जेव्हा तुम्ही बंद कराल तेव्हा आपण स्वतः जसे आहात तसे स्वीकारणं तुम्हाला जमेल. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकाराल तेव्हा तुमचं स्वतःला युनिक समजण्याचं फिलिंग तुमच्यातला आत्मविश्वास वाढवेल.

आत्मविश्वास वाढवण्यासाठी या गोष्टींचं पालन करून बघा. या गोष्टी एकदाच न करता यांना आपल्या सवयीचा भाग बनवा. कारण आत्मविश्वास हा सवयिंतून, प्रयत्नांतून अनुभवांतून येत जाईल. पण एवढं मात्र नक्की कि या गोष्टी तुमच्या सवयीचा भाग जशा बनतील तसा तुमच्या व्यक्तिमत्त्वातून आत्मविश्वास झळकेल.

आत्मविश्वासाची कमतरता असलेल्या लोकांच्या चार सवयी

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

2 Responses

  1. प्रमोद रा. नाईक says:

    आत्मविश्वास वाढवण्यासाठी या लेखात मनाचे talks टीमने अतिशय उत्तम अशा सहा टिप्स सांगितलेले आहेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद व खूप साऱ्या शुभेच्छा.

  2. Shrikrishna Andana Gurav says:

    Very very nice & good inspirational thought about confidence boost.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!