आपल्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे सात नियम लक्षात ठेवा!!

न जाणो ह्या बदलांमुळे आजूबाजूला चाललेल्या स्पर्धेच्या युगात आपण खूप पुढे निघून जाऊ.

तुम्हाला तर माहीतच आहे मनाचेTalks नेहमी तुमच्यासाठी नवनवीन निन्जा टेक्निक्स आणत असतं. आज आपण प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याबद्दल बोलू.

मोनोटोनस हा इंग्रजी शब्द तुम्ही ऐकला आहे का..?? मोनोटोनस म्हणजे सोप्या भाषेत तोचतोचपणा..

आपण कित्येक गोष्टीत एकदम सराईत असतो नाही का..? रोजची हाताखालून जाणारी कामं आपण ठरलेल्या वेळेत करतो त्यात कधी एक मिनिट इकडचे तिकडे होत नसते.

तरीही आणखी काहीही करायची मनातली सुप्त इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही. ठरलेल्या कामांमध्ये आख्खा दिवस कुठे जातो आणि कधी संपतो ते लक्षातच नाही. असं तुमच्या बाबतीत सुद्धा होतच असेल ना..?

अगदी ऑफिसच उदाहरणच घ्या. बॉस आपल्या कामावर नेहमीच खुश असतो. तरीही बढतीच्या वेळेला मात्र आपली प्रोडक्टिव्हिटी जरा संथच वाटल्यामुळे आपण मागे राहिलेलो असतो.

सगळी कामं तर आपण वेळच्या वेळी करतो. पण आणखी काय अपेक्षित असावं? तर रोजच्या कामांबरोबर आणखी काहीतरी अगदी ‘आऊट ऑफ द बॉक्स’ करता यावं..

बरं इच्छा खूप असली असली तरी रोजची कामंच कुठे संपतात.. मग हा कामाचा वेग, प्रोडक्टिव्हिटी वाढवायची तरी कशी बुवा..?

आयुष्यातला तो तोचतोचपणा घालवायचा तरी कसा..?

आपल्या रोजच्या नित्यक्रमात थोडासा बदल करून बघूया का..? कदाचित त्यामुळे आपल्याला जरा तरतरी येईल. नवीन क्लृप्त्या, कल्पनांना वाट मोकळी होईल.

न जाणो ह्या बदलांमुळे आजूबाजूला चाललेल्या स्पर्धेच्या युगात आपण खूप पुढे निघून जाऊ. तुम्हाला तर माहीतच आहे मनाचेTalks नेहमी तुमच्यासाठी नवनवीन निन्जा टेक्निक्स आणत असतं. आज आपण प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याबद्दल बोलू.

प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठीचे सात नियम!!

१. आपल्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कोणाला तरी द्या: कसं आहे ना आपल्यावर सतत लक्ष ठेवणारं कोणी असेल तर आपल्याला ते आवडत नाही.

पण आपल्या काही गोष्टींकडे लक्ष ठेवण्यासाठी का होईना आपल्या बहिणीला, भावाला, मैत्रिणीला किंवा अगदी बायको-नवऱ्याला कोणाला तरी आपल्या कामात लुडबुड ठेवायला सांगाच.

म्हणजे सोबत व्यायाम करा किंवा सकस आहार एकत्र घ्या. आपल्या नव्या प्रोजेक्टची इत्यंभूत माहिती त्या व्यक्तीला द्या. तिला तुमच्या कडून सतत आढावा घ्यायची मुभा द्या. त्या व्यक्तीच्या संपर्कात राहा. आयुष्यातल्या सुंदर गोष्टींना एकत्र अनुभवा. बघा खूप काही बदलेल अशाने..

२. मनाला सकारात्मक व्हायला शिकवा: नकारात्मक विचार करणारी माणसे आजूबाजूचा परिसरही नकारात्मक करतात. त्यामुळे नाकारात्मकतेला आपल्या मनातून, बुद्धीतून काढून टाका.

सकारात्मकता म्हणजे पॉझिटीव्हीटी असे ज्याला आपण म्हणतो तिच्याशी मैत्री करा. कोणतेही काम हाती घ्याल तर त्याचे ‘बिग पिक्चर’ मनात बनवा आणि ते पूर्ण होईल असाच निश्चय मनाशी बाळगा.

अशाने कधी अपयश आलेच तरी आपण खचणार नाही आणि सतत सकारात्मक भावना ठेवली तर नवीन नवीन कल्पना आपल्या साथीदार बनतील. पण एवढं लक्षात ठेवा कि हे सगळं करताना त्याच त्याच चुका आपल्याकडून होणार नाहीत.

म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याच्या प्रयत्नात ऍक्यूरसी आपोआपच वाढत जाईल. आणि आमिर खान सारखं ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ हे बिरुद कधी आपल्या नावामागे लागून जाईल, ते कळणार पण नाही.

रोजचे काम झट की पट संपवून नवीन काहीतरी करण्याची लालसा आपल्याला सकारात्मक विचारसरणीच देऊ शकेल हे मात्र नक्की.

३. तुमचे यश साजरे करा: लहान असो व मोठे यश हे साजरे करण्यासाठीच असते. अहो नव गायकाला सुरेख तान घेता आली तरी त्याचा आनंद गगनात मावत नाही. मग तुम्ही सुद्धा एक कलाकारच आहात.

जे काही नवीन शिकू, ज्यात प्राविण्य मिळवू त्याचा आनंद द्विगुणित करायलाच हवा आणि त्याने तुम्हालाच खूप प्रेरणा मिळणार आहे हो.

ऑफिस मध्ये एखादा प्रोजेक्ट जरी उत्तमरीत्या संपवला गेला तर निदान छोटासा कॉफी ब्रेक तो बनता है ना.. घ्या कॉफी आणि लागा पुढच्या प्रोजेक्टच्या कामाला..

४. थोडीश्या मजा मस्तीला जागा द्या: शाळा कॉलेजात कट्ट्यावर, वर्गातल्या शेवटल्या बाकावर जी धमाल असायची ती आपण कमवायला लागल्यावर जणू विसरूनच जातो.

ऑफिसचे रुटीन आपले आयुष्य मोनोटोनस करून टाकतो. ५ दिवस काम २ दिवस आराम, टीव्ही, मोबाईल, सिनेमा, हॉटेल ह्या व्यतिरिक्त काही वेगळे आपण का करत नाही..?

कधी ऑफिसमध्येच लन्च ब्रेकला काही बैठे पण मजेदार खेळ खेळून पहा. वीकएंड ला मित्रांसोबत, कुटुंबासोबत वेगळा प्लॅन बनवा. ह्यामुळे आपले मन ताजेतवाने होईल आणि पुढच्या ५ दिवसाच्या कामाची नवीन ऊर्जा येईल.

५. वास्तववादी ध्येय ठेवा: ‘थिंक पॉसिटीव्ह बट थिंक रिअलिस्टिक’ म्हणजे काय तर साहेबांकडून असे काम घ्या जे तुम्ही आरामात करू शकाल आणि नंतर एखादा असाही प्रोजेक्ट घ्या की ज्यामुळे तुमच्या माहितीत भर पडेल.

पण भलतेच प्रयोग स्वतःवर आणि कम्पनीवरही करू नका. त्यातली माहिती आहे अशा कामात हात घाला.. व्यायामाचं देखील असेच असते. अतिउत्साह आपल्याला नडतो. त्यामुळे जपून.

६. बहाणे लांब ठेवा: आपल्यातली कमतरता आपल्याला कायम मागे ठेवते. म्हणजे व्यायाम करायचा म्हटला तर तो जानेवारीच्या १ तारखेला सुरू तर होतो पण नव्या नावलाईचे नऊ दिवस झाले की.. अगदी पुढच्या नवीन वर्षाच्या १ जानेवारीलाच आपण जिम चे तोंड बघतो.

हे म्हणजे आळसाचे अगदी चपखल उदाहरण आहे. आळशीपणा, माहिती नसणे, उत्साह नसणे, कंटाळा वाटणे ही सगळी भुतं आपल्याला भारी नाचवतात बरं का..!

आपल्याला ह्यांच्या तालावर नाचायचे असल्यास प्रोडक्टिव्हिटी तर विसरूनच जा पण साधे रोजचे काम सुद्धा अपल्याच्याने पूर्ण होत नाही बघा..

तर ही भुतं आपल्या वाट्याला जाणार नाहीत असा बंदोबस्त करा…. त्यासाठी ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब कर’ ह्याचा अवलंब केला तर बढिया..

७. रोज एखादा प्रेरणादायी सुविचार वाचा आणि आचरणात आणायचा प्रयत्न करा: शाळेत आपण फळ्यावर सुविचार लिहायचो. कारण शिक्षकांना आपण त्या विचारांच्या मार्गावर चालू अशी अपेक्षा होती.

आणि म्हणूनच मनाचेTalks वर आम्ही रोज चांगले, प्रेरणादायी सुविचार, रोजच्या जगण्यातले फॅक्टस, सकारात्मक गोष्टी आणि व्यक्तिमत्व विकासाचे लेख घेऊन येत असतो.

अशाच भन्नाट गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येताना आम्ही सुद्धा खूप काही शिकत असतो हे वेगळे सांगायलाच नको.

या सगळ्यामुळे आपल्यातली नकारात्मकता, चलबिचल काहीशी कमी होऊ लागते. मन प्रसन्न तर शरीर प्रसन्न आणि मग मेंदू तरतरीत!!

बघा तर कामांना कसा वेग मिळतो. प्रेरणा देणारी अनेक माणसं ह्या जगात आहेत. प्रेरणा घेऊन बघाच..!

तर मित्रांनो, हे सगळेच जमेल असे नाही तरी सुद्धा एखादा मुद्दा लक्षात घेऊन आत्ताच सुरुवात करा. बदल बरेच काही घडवू शकतो. एखादा छोटासा बदल मोठे मोठे अडचणींचे डोंगरही पार करवून देतो. आपल्या हातून काही लक्षणीय पार पडले तर पुढ्च्यांसाठी आपण एक उदाहरण तर नक्कीच ठरू शकतो नाही का..!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “आपल्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे सात नियम लक्षात ठेवा!!”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय