“पौष्टिक आणि लज्जतदार मशरूम्स” आणि त्याचे ९ प्रकार

मशरूम ही एक आरोग्याला फायदेशीर, चविष्ट, आणि पौष्टिक डिश आहे. शाकाहारी, मांसाहारी सर्वांसाठी, मग काय? या लेखात माहित करून घ्या मशरूम्सचे विविध प्रकार आणि फायदे. मग होऊन जाऊद्या की एक टेस्टी मशरूम डिश. आणि हो जस्तीत जास्त प्रकारांच्या रेसिपी शेअर करायला विसरू नका…

“खाण्यासाठी जन्म आपुला” असं म्हणून आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांची चव घेण्यासाठी जात असतोच. फक्त निमित्त पाहिजे.

आपण कधी कधी २० किलोमिटर कार चालवून संध्याकाळी चविष्ट भेळ खाण्यासाठी जाऊन आपल्या जिभेची तृप्ती करायला मागेपुढे पाहत नाही.

काही ठिकाणी मिसळ टेस्टी मिळते म्हणून अर्धातास नंबर लावून ती खायला जाणारे आपण सारे खवैये आहोत, असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही पण खाण्यातली असली गम्मत कधी अनुभवलीय का?

महाराष्ट्रीय पदार्थ पण खूप लोकांना आवडायला लागलेत हे त्या ठिकाणी होणाऱ्या तुफान गर्दीवरून आपल्या लक्षात येतं.

मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक १० फुटांवर खाण्याचे पदार्थ मिळणारी अनेक प्रकारची दुकाने, स्टॉल्स, हॉटेल्स आपल्याला दिसतात.

नुसती दिसतात नाही, तर तिथं जाऊन आपण चव पण चाखून येतो आणि आपल्या मित्रांना किंवा नात्यातल्या लोकांना सांगतो, खरंय की नाही??

आता वेगवेगळ्या देशातले विविध प्रकारचे पाश्चात्य खाण्याचे पदार्थ सुद्धा मिळणारी रेस्टोरंट्स आपल्याकडे दिसतात. त्या पदार्थांवर सुद्धा आपले भारतीय लोक चांगला ताव मारताना दिसतात.

फक्त पदार्थ लज्जत आणणारा असला पाहिजे. भरपूर खाऊगल्ल्या ह्या वेगवेगळ्या पदार्थांसाठी प्रसिद्ध झाल्या आहेत.

बरीच हॉटेल्स अशी आहेत की तिथे मिळणाऱ्या व्हेज किंवा नॉनव्हेज पदार्थांसाठी खास नाव घेऊन आपण लोकांना सांगत असतो. आणखी एक पदार्थ आपल्या खाण्यात आता सारखा यायला लागलाय तो म्हणजे “मशरूम”.

“मशरूम” हा आता भारतीयांच्या आवडीचा पदार्थ झाला आहे. अनेक रेस्टोरेन्ट्स मध्ये मशरूम चे विविध प्रकार आपल्याला मिळायला लागलेत.

भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मशरूमचं उत्पादन व्हायला लागलं आहे. आपल्याकडच्या हवामानामुळे सगळे मशरूम चे प्रकार आपल्याकडे तयार होत नाहीत.

पण त्याचे सुद्धा बरेच प्रकार आहेत जे आपण अजून पाहिले पण नाहीत. पण पोषक हवामान असलेल्या काही पाश्चात्य देशात मशरूमच्या सगळ्या प्रकारांची शेती होते.

एक अतिशय लज्जतदार पदार्थ म्हणून मशरूमलाही आता मराठी माणूस चवीनं चाखायला लागलाय. नुसतं लज्जतदार म्हणून नाही तर आपल्या शरीराला आवश्यक पोषण मूल्य, व्हिटॅमिन्स, ह्या मशरूम मध्ये अगदी खच्चून भरलेली असतात म्हणून त्याला रोजच्या खाण्यात स्पेशल डिश म्हणून मानली जाते.

मग बघू तरी ह्या मशरूमचे वेगवेगळे प्रकार आणि त्यातून आपल्या शरीराला आवश्यक असं काय काय मिळतं ते….

१- क्रिमिनी मशरूम्स

हा एक सगळीकडे मिळणार बटन मशरूम चा प्रकार आहे, आकार छत्री सारखा, रंग फिकट ब्राऊन, खायला अतिशय चविष्ट. त्याच्या देठाची बाजू चांगली गुबगुबीत असते आणि वर छत्री सारखा गोल.

हे मशरूम एक प्रकारच्या बुरशी पासून बनवतात. खाण्यासाठी वापरले जाणारे मशरूम्स हे काही प्रकारचे धान्य धुवून, उकळून घेऊन विशिष्ट तापमानात ठेऊन त्याला बुरशी आणली जाते.

ते मशरूम चे ‘बी’ म्हणून वापरले जाते. हे बी सुक्या गवताच्या निर्जंतुक केलेल्या पेंढ्यामध्ये पेरून एकावर एक थर तयार केले जातात. पाण्याच्या साहाय्याने अगदी तजेलदार मशरूम काही दिवसात तयार होतात.

अशी काळजी घेऊन तयार केलेले मशरूम्स खाण्या योग्य असतात. त्यातला “क्रिमिनी मशरूम्स” हा एक प्रकार आहे. आपल्याकडे ह्या मशरूम्सना आळंबी म्हणतात.

मशरूम आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असा पदार्थ आहे, पौष्टिक कसा?

तर त्यात शरीराला पोषक असे कोणकोणते घटक असतात ते आपण पाहिलं की आपल्याला मशरूम खाण्याची आवश्यकता का आहे हे कळेल.

मग पहाच, पोषक काय आणि किती प्रमाण:

  • सेलेनियम – ३७%
  • रिबोफ्लेविन – २९% (व्हिटॅमिन- बी-२)
  • कॉपर – २५%
  • पॅन्टओथेनिक ऍसिड – १५%(व्हिटॅमिन बी-५)
  • पोटॅशियम – १३%
  • फॉस्फरस – १२%.

इतक्या मोठ्या प्रमाणावर ह्या मशरूम मध्ये शरीरासाठी पोषक द्रव्य असतात. म्हणून हे मशरूम खाणं पौष्टिक मानलं जातं. आणि हे धान्यापासून बनलेलं असतं म्हणून एक भाजी म्हणून ह्याचा जेवणात उपयोग केला जातो.

२- मोरेल मशरूम्स

हा एक असामान्य मशरूम चा प्रकार आहे. हा प्रकार आपल्याला सहज उपलब्ध नाही. कारण मोरेल मशरूम्स ची मोठ्या प्रमाणावर शेती करता येत नाही. म्हणजे ह्याचा व्यापार होत नाही. कोणत्याही स्टोअर मध्ये हे सहज मिळत नाहीत.

हे मशरूम्स दाट जंगलात उगवतात. ह्याचे आकार फार आकर्षक असतात. मधमाशांनी बनवलेलं मधाचं पोळं जसं दिसतं तसे हे मशरूम दिसतात.

काठीवर वेगवेगळ्या आकाराची स्ट्रॉबेरी लावल्या सारखे दिसतात, पण रंग चॉकलेटी असतो. खूप चवदार असतात. नॉनव्हेज खाणाऱ्यांना ही चव नॉनव्हेज प्रमाणे लागेल.

पण हे सहज विकत मिळत नाहीत. एक तर जंगलात जाऊन आणायला लागतात नाहीतर स्वतः पिकवायला लागतात. पण हे आपल्या भारतात मिळत नाहीत. पश्चमात्य देशात जंगलात मिळतात.

म्हणून ह्याला जंगली मशरूम म्हणतात. पण ह्या मशरूम्स मध्ये जे पोषक घटक सापडतात तेवढे इतर कोणत्याच मशरूम प्रकारात नसतात.

पोषक काय आणि किती प्रमाण:

  • लोह- ६८%
  • व्हिटॅमिन डी – ५२%
  • कॉपर – ३१%
  • मंगेनिज -२९%
  • फॉस्फरस – १९%
  • झिंक – १४%
  • रिबोफ्लेविन – १२% (व्हिटॅमिन बी- २)

३- शिताके मशरूम्स (Shiitake)

हा प्रकार जगामध्ये सगळीकडे मिळतो आणि ह्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जातं. विशेष म्हणजे जपान, चीन भागात ह्याचं मोठं उत्पादन होतं. आणि इथल्या खवैय्यांची ही एक आवडती डिश आहे.

जपानमध्ये लोक सकाळच्या नाश्त्यासाठी शिताके मशरूम्स चे विविध प्रकार करतात. जपानी लोक शिताके मशरूम्स त्यातल्या औषधी गुणधर्मामुळे जास्त प्रमाणात खातात.

कॅन्सर विरोधी गुणधर्म ह्या मशरूम्स मध्ये आहेत, आणि प्रति जैविक म्हणून सुद्धा हे मशरूम्स उत्तम काम करतात, म्हणजे शरीरातल्या सूक्ष्म जंतूंचा नाश करण्याची ताकत ह्या मशरूम्स मध्ये आहे.

भारताचे हवामान ह्या प्रकारच्या शेतीसाठी अनुकूल नाही म्हणून भारतात ह्या प्रकारचे उत्पादन होत नाही. पण हे मशरूम्स वाळवून ते विक्रीसाठी मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असतात.

ह्या मशरूम्स मध्ये

  • कॉपर -४५%
  • पँटोथेनिक ऍसिड -३६%
  • मँगेनीज -१०%
  • व्हिटॅमिन बी-६ – ८%

हे पोषक घटक मिळतात. शिवाय त्याचे औषधी गुणधर्म ह्यामुळे ह्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. आपल्या जपनमधल्या मित्राला जरूर आणायला सांगा.

४-ऑयस्टर मशरूम्स (Oyster)

ऑयस्टर मशरूम्स चे सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. भारतामध्ये सगळ्यात जास्त ह्या मशरूम्स ची शेती केली जाते.

ही शेती जमिनीवर केली जात नाही. ही घरामध्ये, टेरेसवर, व्हरांड्यात किंवा एखाद्या शेड मधे केली जाते. म्हणजे कमी जागेत जास्त उत्पादन देणारी ही शेती आहे.

ऑयस्टर मशरूम चा उपयोग मुख्य म्हणजे मेडिकल क्षेत्रात जास्त होतो. ह्या ही मशरूम्स मधे औषधी गुण आहेत त्यामुळे काही आजारांवर खूप मोठ्या प्रमाणात ह्याचा वापर होतो. ह्या मशरूम्सना जगात सगळीकडून खूप मागणी आहे.

आरोग्यासाठी फायदेशीर असे हे मशरूम्स मुख्य म्हणजे आपल्या शरीरात ट्रायग्लिसराईड्स चा स्तर वाढला असेल तो सुरळीत करण्याचं काम ह्या मशरूम्स मधले पोषक घटक करतात. आणि LDL/ HDL ratio योग्य ठेवण्याचं काम ह्या मशरूम च्या सेवनामुळे होते.

बटन मशरूम प्रमाणेच अतिशय चविष्ट, स्पंज सारखे गुबगुबीत असणारे हे मशरूम्स खाणे किती फायद्याचे आहे हे तुम्हा आम्हाला आधी माहिती नव्हते. मग आता वाट कोणाची बघताय? घेऊन या ताजे ताजे मशरूम्स आणि बनवा चविष्ट नाश्ता.

५- लायन्स मेन मशरूम्स

सिंहाच्या आयाळी सारखे दिसणारे हे मशरूम्स, म्हणून त्याचं नाव सुद्धा तसंच आहे. हे जरा वेगळे रूप असलेले मशरूम्स युरोप, उत्तर अमेरिका, आणि आशिया ह्या भागात जास्त प्रमाणात होतात.

हे मशरूम्स जंगलात, वन्य भागामध्ये तयार होतात. म्हणजे जशा औषधी वनस्पती जंगलात आपोआप उगवतात तसेच ह्या मशरूम ची निर्मिती होते. भारतामध्ये ह्याचे उत्पादन होत नाही. पण चीन च्या पाककृती मध्ये ह्या मशरूम्सचा भरपूर वापर होतो.

हे मशरूम्स शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत, म्हणजे कॅन्सर सारख्या दुर्धर आजारात शरीराची दाहकता कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो.

हृदयाच्या रक्तवाहिन्या सुरळीत करण्याचं काम, तसच कॅन्सर सारख्या मोठ्या रोगाला प्रतिबंध करण्याची ताकत ह्या मशरूमच्या पोषण घटकात आहे. आपलं जठर सुरक्षित ठेवण्यासाठी ह्याची मदत होते.

ह्यातून आणखी काही उत्पादने सुद्धा तयार केली जातात. हेल्थ सप्लिमेंट तयार करणाऱ्या इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात वापर केला जातो म्हणून ह्या मशरूमला वेगळं महत्व आहे.

६- एनोकि मशरूम्स

हे आणखी वेगळ्या प्रकारचे मशरूम्स. लांब, पातळ, तंतू किंवा दोरी सारखे, पांढरे आणि खूप आकर्षक दिसणारे मशरूम्स.

चवीला अगदी भारी. हे मशरूम्स पिकवणं अगदी सहज आणि सोपं. किंमत सुद्धा इतर मशरूम्स च्या मानाने फार कमी.

ह्या मशरूम्स चा वापर काही एशियन आणि इटालियन डिशेश मधे जास्त होतो. नूडल्स आणि स्पगेटी च्या जागेवर ह्या मशरूम्सना जास्त मागणी आहे, कारण कुररम… कुररम चावून खाताना एक वेगळी मजा येते. आणि दिसायला पण आकर्षक आणि नूडल्स सारखे लांब लांब….

७- बटन मशरूम्स

आपल्या सगळ्यांना माहिती असणारा, आणि आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणावर तयार होणारा, आणि इतर देशांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जाणारा मशरूम प्रकार म्हणजे बटन मशरूम.

पांढरा स्वच्छ, आकाराने शिताके आणि क्रिमिनी पेक्षा लहान. सतत ताजा तवाना दिसणारा हा प्रकार खायला सुद्धा अगदी मऊ, लुसलुशीत आणि लज्जतदार.

शरीरासाठी भरपूर पोषक द्रव्य देणारे हे मशरूम्स शरीरातल्या पेशींना मजबूत करण्याचं मोठं काम करतात. शरीराची रोग प्रतिकार शक्ती ह्या मशरूम्स च्या नेहमी खाण्यामुळे चांगली वाढते हे सिद्ध झालं आहे.

८- पोर्तोबेलो मशरूम्स

बटन मशरूम्स पेक्षा आकाराने मोठे, जाडी पण जरा जास्तच. पण बटन मशरूम सारखे अगदी पांढरे शुभ्र नाहीत. पण चवीला अगदी भन्नाट बरं का.

खवैय्ये लोकांसाठी एक मस्त पदार्थ. बनवताना त्यात चीज भरून जरा कुरकुरीत करून खाताना कधी संपले ते कळणार नाही. अशी मस्त चव जिभेवर बराच काळ राहते. प्रत्येक मशरूमची मजा वेगळीच आहे.

९- पोरसिनी मशरूम्स

हे सुद्धा चविष्ट मशरूम्स आहेत. ह्याचा वापर किचन मधल्या मशरूम्स च्या पाककृतीत नेहमी केला जातो. हे मशरूम्स कुठेही पिकवले जात नाहीत तर जंगलामध्ये, वनांमध्ये आपोआप येतात. ह्याचा उपयोग काही प्रमाणात औषध म्हणून सुद्धा केला जातो.

जंगलात उगवणारे मशरूम्स तोडून आणावे लागतात. आणि असे बऱ्याच प्रकारचे मशरूम्स जंगलात मिळतात पण सगळेच काही खाण्यासाठी योग्य नसतात. तुम्हाला जर खाण्यासाठी योग्य कोणते मशरूम्स असतात ह्याची चांगली माहिती असेल तरच तुम्ही ते आणू शकता.

काही मशरूम्स विषारी असतात. ते खाणं घातक ठरू शकतं. खाण्यासाठी लागणारे मशरूम्स एखाद्या चांगल्या स्टोअरमधून खरेदी करू शकता. म्हणून जंगलातले मशरूम्स हे माहिती असल्याशिवाय तोडून आणू नका. बाजारात सुकवलेले मशरूम्स पण मिळतात ते घेणं सुद्धा योग्य ठरेल.

तर मित्रांनो “मनाचेTalks” कडून ही आणखी एक नवी स्पेशल भेट मशरूम्सचे भन्नाट प्रकार, आणि त्यातून आपल्या शरीराला मिळणारे अफलातून फायदे.

म्हणून मशरूम ही एक आरोग्याला फायदेशीर, चविष्ट, आणि पौष्टिक डिश आहे. मग काय? होऊन जाऊद्या की एक टेस्टी मशरूम डिश. आणि हो जस्तीत जास्त प्रकारांच्या रेसिपी शेअर करायला विसरू नका…

टाटा… बाय… बाय!!! मस्त खा… चुस्त राहा

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on ““पौष्टिक आणि लज्जतदार मशरूम्स” आणि त्याचे ९ प्रकार”

  1. Nice ऑईस्टर मशरूम बद्दल आणखी माहिती पाहिजे

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय